Rupees : 2000 रुपयांच्या नोटांचे झाले तरी काय? बाजारातून का झाल्या गायब ? सर्वात मोठा खुलासा..
Rupees : 2000 रुपयांच्या नोटा कुठे गायब झाल्या भावा..उत्तर तर शोधुयात..
नवी दिल्ली : ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’ या सवालाने जो तो भांडावून गेला होता. त्याचे उत्तर मिळाले. पण गेल्या अनेक दिवसांपासून 2,000 रुपयांच्या नोटा (Note) अचानक कुठे गायब (Disappear) झाल्या? याचे समाधानकारक उत्तर काही केल्या मिळत नव्हते. अखेर या मोठ्या प्रश्नाचे उत्तर एका माहिती अधिकार (RTI Activist) मिळवलंच..
आता तुम्ही म्हणाल काळा पैसा आणण्यासाठी नोटबंदी काळात तर ही नोट होती. त्यासोबतच 200 रुपयांची नोट सुद्धा होती. पण 2,000 रुपयांच्याच नोटेची चर्चा कशामुळे होते आहे. कारण नोटबंदीच्या काळात ही नोट चलनात होती. सरकारने ही नोट कायम असेल असे म्हटले होते.
मग अचानक ही नोट बाजारातून, चलनातून, व्यवहारातून कशी गायब झाली? याची चर्चा रंगली. ही नोट लांब असल्याने एटीएम मशीनमध्ये ही बदल करण्यात आला होता. पण अचानक ही नोट गायब झाल्याने चर्चा रंगली.
दरम्यान एका माहिती अधिकारात मागितलेल्या प्रश्नात नोट का गायब झाली, ती कुठे गेली. सध्या काय स्थिती आहे, या कुतुहलाचे उत्तर मिळाले. कारण देशभरात कटप्पानंतर सर्वात विचारला गेलेला हा दुसरा प्रश्न होता. त्यासंबंधीचा एकदाचा खुलासा झाला.
तर आरटीआयत मिळालेल्या उत्तरानुसार, 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन वर्षांच्या काळात एकही 2,000 रुपयांची नवीन नोट छापण्यात आलेली नाही. त्यामुळे सहाजिकच जेवढ्या नोटा चलनात आलेल्या आहे. तेवढ्याच व्यवहारात आहे. त्यांचा नवीन स्टॉक बाजारात आलाच नाही.
भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण (पी) लिमिटेडने आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 2,000 रुपयांच्या 3,5429.91 कोटींच्या नोटा छापल्या. 2017-18 मध्ये हे प्रमाण कमी झाले. या वर्षी 1115.07 कोटी रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या.तर 2018-19 मध्ये हे प्रमाण अजून कमी झाले. त्यावर्षी केवळ 466.90 कोटी रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या.
म्हणजे सलग तीन वर्षे तर 2,000 रुपयांची एकही नोट छापण्यात आली नाही.तर त्यापूर्वी नोटबंदीच्या काळातही सर्वाधिक नोटा छापण्यात आल्या. त्यानंतरच्या दोन वर्षात ही संख्या अर्ध्यावर आली.
8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्याची मध्यरात्रीपासून अंमलबजावणी ही झाली. काळे धन बाहेर येण्यासाठीचे हे पाऊल फार उपयोगी पडले नाही, हे नंतर आकडेवारीवरुन सिद्ध झाले.
दरम्यान ज्या वर्षी 2,000 रुपयांची नोट केंद्र सरकारने व्यवहारात आणली. त्या वर्षी 2,000 रुपयांच्या 2,272 नकली नोटा पकडण्यात आल्या. तर 2017 मध्ये ही संख्या 74,898 इतकी झाली. 2018 मध्ये 2,000 रुपयांच्या 54,776 नकली नोटा सापडल्या होत्या.
2019 मध्ये 2,000 रुपयांच्या 90,566 नकली नोटा सापडल्या. तर पुढील वर्षी तर नकली नोटांनी सर्व रेकॉर्ड मोडून काढले. 2020 मध्ये 2,000 रुपयांच्या 2,44,834 नोटा सापडल्या होत्या.