Small Saving Scheme : मोठी अपडेट! अल्पबचत योजनेत नाही केले हे काम तर खातेच गोठवणार

Small Saving Scheme : अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणुकीचा फायदा सर्वांनाच माहिती आहे. पण आता हा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला हे काम अगोदर करावे लागेल. नाहीतर योजनेचा लाभ मिळणार नाही.

Small Saving Scheme : मोठी अपडेट! अल्पबचत योजनेत नाही केले हे काम तर खातेच गोठवणार
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 8:40 PM

नवी दिल्ली : सार्वजनिक भविष्य निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), पोस्ट ऑफिसची बचत योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यासारख्या अल्पबचत योजना देशात लोकप्रिय आहेत. या योजनांवरील व्याजदर चांगले असल्याने नागरिक या योजनांमध्ये मोठी रक्कम गुंतवतात. या योजनांमधील गुंतवणूक तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक तर देतातच पण चांगल्या परताव्याची हमी पण देतात. त्यामुळे या योजनांमध्ये देशभरातील नागरिक गुंतवणूक करतात. पारंपारिक गुंतवणूकदार याच योजनांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात.अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणुकीचा फायदा सर्वांनाच माहिती आहे. पण आता हा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला हे काम अगोदर करावे लागेल. नाहीतर योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे काम अनिवार्य

केंद्रीय अर्थमंत्रालयाने अल्पबचत योजनांसाठी एक नियम लागू केला आहे. त्यानुसार, आता या योजनांमधील गुंतवणूकदारांना केवायसी (KYC) पूर्ण करणे अनिवार्य आहे. या योजनांमध्ये आता आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 31 मार्च 2023 रोजी अर्थमंत्रालयाने याविषयीची अधिसूचना काढली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार आता अल्पबचत योजनांमध्ये आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल. तर एका निश्चित मर्यादेसाठी गुंतवणूकदारांना पॅन कार्ड जोडणे (Aadhaar PAN Link) आवश्यक आहे. नाहीतर ग्राहकांना त्याचा फटका बसेल.

हे सुद्धा वाचा

अल्पबचत योजनांसाठी एक नियम

केंद्रीय अर्थमंत्रालयाने याविषयीची अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधार क्रमांक जमा करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पीपीएफ, एसएसवाय, एनएससी, एससीएसएस वा इतर अल्पबचत योजनांचे खाते उघडले असेल आणि आधार कार्ड क्रमांक अथवा पॅनकार्ड जोडले नसेल तर हे काम त्यांनी त्वरीत करुन घ्यावे. तसेच नवीन खाते उघडण्यासाठी पण हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, खाते उघडल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांच्या आत केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

तर खाते गोठवणार

अल्पबचत योजनांसाठी आता नवीन नियम लागू झाला आहे. जर तुम्ही अल्पबचत योजनांच्या खात्याशी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाहीतर तुम्हाला एका कालावधीसाठी संधी देण्यात आली आहे. सहा महिन्यात तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पण त्यानंतर तुम्ही आधार कार्ड आणि पॅनकार्डच्या नियमांचे पालन केले नाही तर तुमचे खाते गोठवण्यात येईल. सध्याच्या ग्राहकांना 1 ऑक्टोबर 2023 रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या ग्राहकांचे खाते पण गोठवण्यात येईल.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.