Pension : पेन्शनधारकांसाठी गुडन्यूज! मोदी सरकारने करुन दाखवले, बँकेच्या पासबुकमध्ये झाला हा मोठा बदल

Pension : निवृत्तीधारकांना मोदी सरकारने असा मोठा दिलासा दिला आहे.

Pension : पेन्शनधारकांसाठी गुडन्यूज! मोदी सरकारने करुन दाखवले, बँकेच्या पासबुकमध्ये झाला हा मोठा बदल
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 11:04 PM

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी निवृत्तीधारकांसाठी (Pensioners) मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता निवृत्तीधारकांच्या बँकेतील पेन्शन पासबुकमध्ये पीपीओ (Pension Payment Order) क्रमांक नोंद केल्या जाणार आहे. पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक नोंदवल्यानंतर देशातील कोट्यवधी निवृत्तीधारकांना मोठा दिलासा आहे. फेडरेशन ऑफ कोल इंडस्ट्री रिटायर्ड एम्प्लाईज असोसिएशनचे(FCEREA)संयोजक बिमान मित्रा यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, अनेक दिवसांच्या संघर्षानंतर पेन्शनर्सच्या बँक पासबुकमध्ये पीपीओ क्रमांकाची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यांच्या मते अनेक निवृत्तीधारकांना याविषयीची अद्याप माहितीच नाही.

बिमान मित्रा यांनी पेन्शन पासबुकमध्ये पीपीओ क्रमांक टाकण्याचा आग्रह धरला होता. 2021 मध्ये त्यांच्या निदर्शनास सदर बाब आली होती. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने बँकांना पेन्शनधारकांचा पीपीओ क्रमांक नोंदवण्याचा आदेश दिला होता.

पण बँकांनी या आदेशाचे पालन केले नसल्याचे मित्रा यांच्या लक्षात आले. त्यांनी याविरोधात संघर्ष केला. या संघर्षामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अन्य सार्वजनिक क्षेत्रातील 5 कोटी पेन्शनर्सला पीपीओ क्रमांक त्यांच्या बँकेत खात्यात नोंदवावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

पेन्शन पेमेंट ऑर्डर काय आहे, हे आता समजून घेऊयात. निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी दर वर्षी ईपीएफओमार्फत पीपीओ क्रमांक देण्यात येतो. पीपीओ क्रमांक 12 अंकी असतो. पेन्शनसाठी अर्ज करताना दरवर्षी हयात प्रमाणपत्र आणि पीपीओ क्रमांक देणे आवश्यक असते. पीपीओ क्रमांक मिळविणे सोपे काम नक्कीच नाही.

जर तुम्हाला पीएफ खाते एका बँकेतून दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करायचे असेल तर पीपीओ क्रमांक आवश्यक असतो. पेन्शनसंबंधीची एखादी तक्रार करायची असेल तर पीपीओ क्रमांक देणे आवश्यक आहे. ऑनलाईन पेन्शन ट्रॅक करण्यासाठी ही पीपीओ क्रमांक आवश्यक असतो.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.