Insurance : मोठी बातमी! आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारचा धडाकेबाज निर्णय

Insurance : आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा भारतातील नागरिकांना होणार आहे. आयुष्यमान कार्ड योजनेमुळे अनेकांचे आयुष्यमान वाढणार आहे. काय घेतलाय सरकारने निर्णय..

Insurance : मोठी बातमी! आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारचा धडाकेबाज निर्णय
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 8:18 PM

नवी दिल्ली : आयुष्यमान भारत योजनेविषयी केंद्र सरकारने धडाकेबाज निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा भारतातील नागरिकांना होणार आहे. आयुष्यमान कार्ड योजनेमुळे (Ayushman Bharat Yojana) अनेकांचे आयुष्यमान वाढणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला (IRDAI) याविषयीचे निर्देश दिले आहेत. आयुष्यमान भारत योजनेमुळे भारतातील मोठ्या वर्गाला आरोग्य सोयी-सुविधा मिळाल्या आहेत. त्यांना 5 लाखांपर्यंतच्या आरोग्य विम्यात मोठी ऑपरेशन पण होत असल्याने गरिबांच्या खिशावरील भार हलका झाला आहे.

विमा कंपन्यांना दिले हे निर्देश भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कंपन्यांना आयुष्यमान योजनेविषयी मोठी अपडेट दिली आहे. नवीन विमाधारकांना आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट (ABHA) ID अंतर्गत आयुष्यमान कार्ड तयार करण्यात येणार आहे. या युनिक आयडीमुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित सर्व माहिती सहज उपलब्ध होईल आणि त्याचा लाभ घेऊन त्यांना उपचार घेता येईल.

हेल्थ डेटा जतन या आयडीमुळे नागरिकांची आरोग्यविषयीची माहिती जतन राहिल. या माहितीच्या आधारे रुग्णालय आणि डॉक्टरांना रोगाची, उपचाराची पार्श्वभूमीवर माहिती उपलब्ध होईल. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची विमाधारकाला निवड करता येईल. रुग्णालयात उपचारासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत कार्डधारकाचा मोठा वेळ वाचेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण(NHA) ही योजना राबवत असून आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा हा एक भाग आहे.

हे सुद्धा वाचा

सर्व भारतीयांना मिळणार सुविधा आतापर्यंत 402.6 दशलक्ष ABHA आईडी तयार करण्यात आल्या आहेत. वर्ष 2022 पासून भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन संयुक्तपणे हा उपक्रम राबवित असून देशातील प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आयडी देण्याची तयारी आहे. विमा दाव्यांचा जलद निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

विमा घेतानाच अर्ज आता विमा कंपन्यांना नवीन विमा काढताना सर्व विमाधारकांना आयुष्यमान भारत योजनेचा अर्ज भरुन घ्यावा लागणार आहे. हा अर्ज विमाधारकाला भरावा लागेल. त्याच्याकडून आरोग्याविषयक माहिती आरोग्य सेवा प्राधिकरणासोबत शेअर करण्याची परवानगी घेण्यात येईल. त्याची परवानगी घेतल्यानंतर या ऑनलाईन अर्जानंतर विमाधारकाला आयुष्यमान भारत आयडी देण्यात येईल.

डिजी लॉकरचा उपयोग आरोग्य योजनांरचा ही ते लाभ घेऊ शकता. डिजीलॉकरचा (Digilocker) उपयोग करुन त्याठिकाणी तुम्हाला दस्तावेज जतन करुन ठेवता येतील. आरोग्य मंत्रालयानुसार, डिजीलॉकरच्या वापरकर्त्यांना आता आरोग्य रेकॉर्ड डिजिटल रुपात सुरक्षित ठेवता येणार आहे. ते आयुष्यमान भारत आरोग्य खाते (ABHA) डिजीलॉकरला जोडू शकतात. डिजीलॉकर मुळे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन(ABDM) सोबतच इतर कागदपत्रेही जोडता येतात. शी जोडलेल्या सदस्यांचा हेल्थ रेकॉर्ड डिजिटल रुपात सुरक्षित करण्यात येणार आहे.

अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.