Home Loan : मोठी बातमी! सध्यापेक्षा मिळू शकते जादा होम लोन, RBI वर खिळल्या नजरा

Home Loan : गृहकर्जाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. सध्याच्या गृहकर्जापेक्षा अधिक कर्ज ग्राहकांना मिळू शकते. त्याविषयी कायद्यात, तरतुदीत मोठा बदल होऊ शकतो. असे झाले तर ग्राहकांना सध्या कर्जासाठी असणारे बंधन, मर्यादा बदलेल. ग्राहकांना अधिक कर्ज मिळेल. मोठ्या घराचे स्वप्न साकारता येईल.

Home Loan : मोठी बातमी! सध्यापेक्षा मिळू शकते जादा होम लोन, RBI वर खिळल्या नजरा
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 5:18 PM

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ग्राहकांना लवकरच खुशखबर मिळू शकते. घर खरेदी करताना मिळकतीवर एका ठराविक रक्कमेपर्यंत बँका गृहकर्ज (Home Loan) देतात. त्यापेक्षा अधिकच्या रक्कमेची खरेदीदारांना नातेवाईक, मित्र अथवा एखाद्या सावकाराकडून तजवीज करावी लागते. तेव्हा कुठे घराचं स्वप्न साकार होतं. कारण घर खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन शुल्क, डाऊन पेमेंट (Down Payment) द्यावे लागते. त्याची दुसरीकडून तजवीज करावी लागते. पण सध्या एक वेगळीच चर्चा समोर येत आहे. गृहकर्जासाठी सध्याची जी मर्यादा ती वाढविण्याची मागणी होत आहे. डाऊन पेमेंट सोडून स्टॅम्प ड्युटी (Stamp Duty) आणि रजिस्ट्रेशन शुल्क यांचा समावेश गृहकर्जात करण्याचा एक प्रस्ताव समोर येत आहे. त्यामुळे गृह खरेदीदारांना अधिक कर्जाऊ रक्कम मिळेल. त्यासाठी त्यांना इतर कोणाकडे मदत मागण्याची गरज उरणार नाही.

गृह खरेदीला मिळेल चालना

हा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास गृहखरेदीला वेग येऊ शकतो. तसेच मोठ्या रक्कमेची तरतूद होऊन त्यात स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस पण बसत असल्याने गृह खरेदीला चालना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

बँकांना पण प्रतिक्षा

इकोनॉमिक टाईम्समध्ये याविषयीच्या वृत्तानुसार, गृहकर्जात स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेसचा अंतर्भाव केल्यास कर्ज परतफेडीचा अथवा कर्ज बुडीचा धोका नसेल. कारण बँकाकडे ही संपत्ती तारण असते. त्यामुळे अतिरिक्त जोखीम वाढणार नाही. बँकांना आशा आहे की, आरबीआय या प्रस्तावाबाबत अनुकूल धोरण ठरवेल. त्यामुळे ग्राहकांना जास्त कर्जाऊ रक्कम मिळेल.

असा होईल फायदा

  1. रिझर्व्ह बँकेने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर घर खरेदीदारांना मोठा फायदा होईल. समजा, एखाद्या घराची किंमत स्टॅम्प ड्युटी अथवा रजिस्ट्रेशनसह एक कोटी रुपये आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचा वाटा 20 लाख रुपये आहे. सध्या आरबीआयकडून लोन-टू-व्हॅल्यू रेशो (LTV) अंतर्गत घरी खरेदीसाठी 60 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.
  2. सध्याच्या लोन-टू-व्हॅल्यू रेशोनुसार मालमत्तेच्या मूल्यानुसार, कर्जदाराला 75 ते 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यात येते. ही रक्कम 75 लाखांपेक्षा अधिक असेल तर वरील रक्कम देण्यात येत नाही. पण नवीन प्रस्ताव स्वीकारल्यास रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचा खर्च पण कर्जातच मिळेल.
  3. आरबीआयने बँकांचा स्टॅम्प ड्युटीसह रजिस्ट्रेशन चार्ज होम लोनमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास ग्राहकांचा फायदा होईल. पूर्वी ग्राहकांना 60 लाख कर्ज मिळत असेल तर आता ते 75 लाख रुपये मिळेल.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....