Aadhaar Card बाबत मोठी अपडेट, सर्वसामान्यांसाठी वार्ता काय?

Free Aadhaar Card Update : ज्या नागरिकांना त्यांच्या आधार कार्डमधील माहितीत बदल करायचा आहे, त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आधार कार्डमधील माहितीत बदल करण्यासाठी 14 डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करता येत होते. आता ही विंडो बंद झाली आहे. पण सरकारने अजून एक निर्णय घेतला आहे.

Aadhaar Card बाबत मोठी अपडेट, सर्वसामान्यांसाठी वार्ता काय?
आधार कार्ड
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 8:35 PM

आधार कार्ड मोफत अपडेट, अद्ययावत करण्याची अखेरच्या तारखेत सरकारने बदल केला आहे. 14 डिसेंबर ही त्यासाठीची अंतिम मुदत होती. पण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ही अंतिम मुदत पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना मोफत ऑनलाईन दस्तावेज अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2025 रोजी पर्यंत वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला ही मोफत सुविधा 14 जून, 2024 अशी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर ती 14 सप्टेंबर, 2024 रोजीपर्यंत आणि या 14 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

या पोर्टलवर करा आधार कार्ड अपडेट

नागरिकांना myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ च्या माध्यमातून 14 जून 2025 रोजीपर्यंत मोफत बदल करता येईल. कागदपत्र अपलोड करता येतील. आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाईन अपडेशनसाठी आहे. पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांआधारे आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी 25 रुपये शुल्क अदा करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

असे करा आधार कार्ड अपडेट

UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा

अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा

12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा

ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा

आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल

ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा

‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा

राजपत्राआधारे नावात बदल

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गॅझेट आवश्यक आहे. याविषयी UIDAI ने नवा निर्णय घेतला आहे. नावातील बदलाविषयी आता कडक भूमिका घेण्यात आली आहे. नावातील बदलाआधारे मोठा घोटाळा होण्याची शक्यता लक्षात घेत राजपत्र आवश्यक करण्यात आले आहे. आता नावात बदलासाठी राजपत्र सादर करावं लागणार आहे.

10 वर्षें झाल्यास करा बदल

आधार कार्ड अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्ड दाखवावे लागते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर आधार कार्डमध्ये अपडेट मोफत करता येते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.