हेच राहिलं होतं! सकाळचा नाष्टा महागला; ब्रेडच्या किंमतीत 2 ते 5 रुपयांची वाढ, जिभेच्या चोचल्यांना महागईचे चटके

सकाळचा नाष्टा महाग झाला आहे. ब्रेडच्या किंमतीत 2 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे वडा पाव, दाबेली, मिसळपाव, सॅडविच यासह सकाळच्या नाष्टयासाठी सर्वसामान्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

हेच राहिलं होतं! सकाळचा नाष्टा महागला; ब्रेडच्या किंमतीत 2 ते 5 रुपयांची वाढ, जिभेच्या चोचल्यांना महागईचे चटके
सकाळचा नाष्टा महागला, ब्रेडच्या किंमतीत वाढ Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 3:31 PM

महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झाले आहे. सामान्य नागरिकांसमोर रोजच्या Bread and Butter अर्थात जगण्यासाठी त्यांची धडपड सुरु असतानाच आता ब्रेडच्या किंमती (Bread Price) वाढल्या आहेत. 2 ते 5 रुपयांनी ब्रेडच्या किंमती वाढल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात दुस-यांदा ब्रेड महाग झाला आहे. मॉडर्न, ब्रिटानिया आणि विब्ज (Modern, Britannia, Wibs) कंपनीने ब्रेडच्या किंमतीत वाढ केली आहे. विशेष म्हणजे ब्रेड उत्पादकांनी मे महिन्यांतच ब्रेडच्या किंमतीत वाढीचा अंदाज वर्तवला होता आणि त्यामागील कारणं ही स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने खुल्या बाजारातील गहु विक्रीवर नियंत्रण न ठेवल्याने हा परिणाम ओढावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खुल्या बाजारातील विक्री योजना (Open Market Sale Scheme-OMSS) ही बाजारातील पुरवठा आणि किंमती नियंत्रीत करते. परंतु, सरकारने उत्पादकांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याने वाढता उत्पादन खर्च भरुन काढण्यासाठी उत्पादकांनी किंमती वाढवल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे सकाळचा नाष्टा महाग झाला आहे. ब्रेडसाठी ग्राहकांना 2 ते 5 रुपये जादा द्यावे लागतील. त्यामुळे वडा पाव, दाबेली, मिसळपाव, सॅडविच यासह सकाळच्या नाष्टयासाठी सर्वसामान्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

डिसेंबरपासून किंमतीत 5 ते 10 रुपयांची वाढ

300 ते 400 ग्रॅमचा व्हाईट ब्रेड आता 35 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी तो 33 रुपयांना मिळत होता. या किंमती जानेवारी महिन्यातील आहेत. तर 800 ग्रॅमच्या विब्जच्या लादीसाठी जी सॅडविचसाठी वापरण्यात येते, त्यात पाच रुपयांची वाढ झाली आहे. 65 रुपयांचा हा पुडा आता 70 रुपयांना मिळणार आहे. तर रोजच्या वापरातील साध्या ब्रेडच्या किंमतीत 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी या ब्रेडसाठी 45 ते 50 रुपये मोजावे लागत होते. या जानेवारी महिन्यात सर्वात अगोदर 3 ते 5 रुपयांनी ब्रेडच्या किंमती वाढल्या होत्या. डिसेंबर 2021 नंतर ब्रेडच्या किंमतीत दोनदा वाढ झाली आहे आणि 5 ते 10 रुपयांनी या किंमती वाढल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

दरवाढीचे खापर फुटले सरकारवर

मे महिन्यांपासून ब्रेडच्या दरात वाढीचे संकेत मिळत होते. केंद्रीय अन्न महामंडळाने कच खाल्याने या किंमती वाढल्याचे खापर फोडण्यात येत आहे. खुल्या बाजारात विक्री योजनेत गव्हाविषयी महामंडळाने काहीच घोषणा केली नाही. ही योजना खुल्या बाजारात गव्हाचा पुरवठा आणि किंमत नियंत्रीत करते. गहुआधारीत उत्पादने उत्पादित करणा-या कंपन्यांनी यापूर्वीच पीठ, ब्रेड आणि बिस्काटाच्या किंमती वाढण्याची भीती व्यक्त केली होती. गव्हाचा तुटवडा आणि दरवाढीचे कारण त्यांनी दिले होते. त्यानुसार जून महिन्यात पुन्हा ब्रेडच्या किंमतीत वाढ झाली.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.