घोषणा तर झाली, पण कसा असेल रुपयाचा डिजिटल अवतार अन् कसा करता येईल व्यवहार ?

क्रिप्टो करन्सीला खरं तर डिजिटल चलन म्हणणे अयोग्य ठरेल. तो खरा तर नफेखोरीचा बाजार आहे. मग भारतीय रुपयाचा डिजिटल अवतार कसा असेल ?असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. अर्थात व्यापक हित लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित, सुरक्षित आणि वेगाने व्यवहार करता येण्यासाठी भारतीय डिजिटल रुपयाचे चलन बाजारात आणले जात आहे.सीबीडीसी हे मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या चलनासारखेच आहे, परंतु त्याचे स्वरूप कागद अथवा पॉलिमर पेक्षा भिन्न आहे.

घोषणा तर झाली, पण कसा असेल रुपयाचा डिजिटल अवतार अन् कसा करता येईल व्यवहार ?
Budget-modi-nirmala
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 9:21 AM

मुंबई : सध्या प्रत्यक्ष चलनाऐवजी जगभरात डिजिटल चलनाची (Digital Currency) चर्चा आहे. अनेक देश डिजिटल चलन प्रणाली स्वीकारत आहेत. 1 एप्रिलपासून भारतही या देशांच्या यादीत फक्त सहभागीच होत नसून तो पदार्पणातच विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं की, रिझर्व्ह बँक स्वत:चं डिजिटल चलन आणेल, ज्याला डिजिटल रुपया (Digital Rupee) म्हटलं जाईल. याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा सीबीडीसी (CBDC) असे म्हटले जाईल. भारताचे डिजिटल चलन हे रुपयाचे आभासी रूप असेल. मात्र डिजिटल चलनाचे नियमन कसे होईल, याबाबत सरकारने अद्याप काहीही सांगितलेले नाही. क्रिप्टो करन्सीला खरं तर डिजिटल चलन म्हणणे अयोग्य ठरेल. तो खरा तर नफेखोरीचा बाजार आहे. मग भारतीय रुपयाचा डिजिटल अवतार कसा असेल ?असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. अर्थात व्यापक हित लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित, सुरक्षित आणि वेगाने व्यवहार करता येण्यासाठी भारतीय डिजिटल रुपयाचे चलन बाजारात आणले जात आहे.सीबीडीसी हे मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या चलनासारखेच आहे, परंतु त्याचे स्वरूप कागद अथवा पॉलिमरपेक्षा भिन्न आहे.

बेकायदा नाही पण कायदेशीर पण कुठये ?

सीबीडीसी हे रिझर्व्ह बँकेने आणलेले आभासी चलन आहे, परंतु त्याची तुलना क्रिप्टोकरन्सीशी केली जाऊ शकत नाही. गेल्या दशकभरात जगात बिटकॉइन आणि इथरियमसारख्या हजारो क्रिप्टोकरन्सी प्रचलित झाल्या आहेत. या अभासी चलनात लाखो भारतीयांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. दररोज या बाजारात अरबो-खरबोची उलाढाल करण्यात येते. मात्र भारताने हे चलन अद्यापही कायदेशीररीत्या वैध घोषीत केलेले नाही. कारण या चलनाचा व्यवहार कायद्याच्या कसोटीवर उतरत नाही. पण सरकारने ते बेकायदेशीर ही घोषीत केलेले नाही. गुंतवणुकदारांची आणि स्वतःच्या फायद्यासाठी सरकारने क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर 30 टक्के कर लावला आहे. परिणामी बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टोकरन्सी आहेत ते खरेदी किंवा विक्रीवर गुंतवणुकदारांना 30 टक्के कर भरावा लागेल.

बिटकॉइन हे चलन नाही

सरकारचे म्हणणे आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणी कसलीही जबाबदारी घेत नाही. या व्यवहारांचा कोणीही नियंत्रक नाही. बँकेकडे कोणाला रक्कम दिली आणि कोणाकडून रक्कम यायची आहे, या व्यवहाराचा सर्व ताळेबंद ठेवल्या जातो. क्रिप्टोबाबत ही बाब कोसो दूर आहे. त्यामुळे क्रिप्टो करन्सीला सरकारने चलन म्हणून मान्यता दिली नाही. व्यवहाराच्या पातळीवर त्याला चलनही म्हणता येऊ शकत नाही. रिझर्व्ह बँक सुरुवातीपासूनच क्रिप्टोकरन्सीला विरोध करत आहे. खासगी क्रिप्टोकरन्सीमुळे देशाची सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. पण जगातील डिजिटल चलनाचा वाढता कल आणि मागणी लक्षात घेता डिजिटल चलन मध्यवर्ती बँकेने जाहीर केले आणि त्याला डिजिटल रुपया असे नाव दिले आहे.

सीबीडीसी कसे असेल?

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी नुकत्याच केलेल्या भाषणानुसार, “सीबीडीसी हे मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या चलनासारखेच आहे, परंतु त्याचे स्वरूप कागद अथवा पॉलिमर पेक्षा वेगळे आहे. हे एक इलेक्ट्रॉनिक चलन असून, ज्याच्याविषयी मध्यवर्ती बँकेच्या ताळेबंदावर व्यवहार दिसेल. सीबीडीसीचे तंत्रज्ञान, फॉर्म आणि वापर त्याच्या स्वत: च्या गरजेनुसार अनुकूलित केले जाऊ शकते. सीबीडीसीची देवाणघेवाण रोख रकमेच्या बरोबरीने केली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सीबीडीसीमुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. 2022-23 पासून ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल रुपया सादर करण्याचा प्रस्ताव आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय?

कोणतेही डिजिटल चलन चालविण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान आवश्यक आहे. ब्लॉकचेन प्रत्यक्षात एक डिजिटल लेजर आहे जो व्यवहारांचा मागोवा ठेवतो. . डिजिटल चलनाचा खर्च कुठे आणि किती झाला आहे, हे लेझरमुळे दिसेल. जगभर डिजिटल चलनाचा ट्रेंड फोफावतोय. अनेक देशात डिजिटल चलन प्रणाली प्राथमिक अवस्थेत आहे. मात्र याठिकाणी प्रत्यक्ष व्यवहारात डिजिटल चलनाचा म्हणावा तसा वापर होत नाही. त्यामुळे 1 एप्रिलपासून भारतीय रुपया जेव्हा डिजिटल अवतारात बाजारात दाखल होईल, तेव्हा अनेक विश्वविक्रम काही दिवसात तयार होतील हे नक्की.

संबंधीत बातम्या :

Gold Price Today : सोन्याच्या भावात घसरण, मुंबईतले दर 450 रुपयांनी गडगडले; जाणून घ्या आजचे भाव

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 14 टक्के योगदानावर करकपातीचा लाभ 

7th Pay Commission Updates: केंद्र सरकारचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘महाग’डे गिफ्ट ! 1 कोटींहून अधिक कर्मचा-यांना होणार फायदा

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.