Gold Akshaya Tritiya : याठिकाणी खरेदी करा सोने, सरकारकडून शुद्धतेची 100 टक्के गॅरंटी!
Gold Akshaya Tritiya : आज अक्षय तृतीया मोठ्या हर्षोल्लासात साजरी होत आहे. सोबतच ईद ही साजरी होत आहे. जर तुम्ही या शुभ दिवशी सोने खरेदी करण्याची योजना आखली असेल तर शुद्ध सोने खरेदीची एक संधी तुम्हाला मिळणार आहे. या सोने खरेदीवर सरकार शुद्धतेची हमी देत आहे.
नवी दिल्ली : आज अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) मोठ्या हर्षोल्लासात साजरी होत आहे. सोबतच ईद ही साजरी होत आहे. जर तुम्ही या शुभ दिवशी सोने खरेदी करण्याची योजना आखली असेल तर शुद्ध सोने खरेदीची एक संधी तुम्हाला मिळणार आहे. या मोठ्या शहरात तुम्ही राहत असाल तर आज संध्याकाळी तुम्हाला शुद्ध सोने खरेदी करता येईल. तुम्हाला थेट सरकारकडून शुद्ध सोने खरेदी (Guarantee of Purity) करता येईल. तर ज्यांना हे शक्य नाही, ते भारतीय घरबसल्या ऑनलाईन (Online Shopping) शुद्ध सोने खरेदी करु शकतात. केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर सोने खरेदीची प्रक्रिया दिली आहे. त्यामाध्यमातून तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करता येईल. या सोने खरेदीवर सरकार शुद्धतेची हमी देत आहे.
टाकसाळीतून खरेदीची संधी देशात केंद्र सरकारच्या टाकसाळ आहेत. याठिकाणी केवळ नाणीच पाडली जात नाहीत, तयार होत नाहीत तर या टाकसाळीतून तुम्हाला सोने आणि चांदीचे शिक्के पण खरेदी करता येतात. तुम्हाला या टाकसाळीतून 5 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 50 ग्रॅम सोन्याची नाणी खरेदी करता येतात.
ऑनलाईन करा खरेदी सरकारी टाकसाळीतून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोने आणि चांदीची नाणी खरेदी करु शकता. www.indiagovtmint.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सरकारी सोने आणि चांदीची नाणी खरेदी करु शकता.
India Government Mint Wishes you a very happy Akshaya Tritya. On this auspicious day of Akshaya Tritiya, don’t forget to purchase some gold and pray to Lord Vishnu.
Buy now- https://t.co/DcRBC0Ukya#akshayatritiya #BuyGold #auspacious pic.twitter.com/V0HJYLKHLm
— India Government Mint (@SPMCILINDIA) April 22, 2023
दिल्ली, नोएडा, मुंबई आणि याठिकाणी संधी
- देशातील 5 मोठ्या शहरातील टाकसाळीतून तुम्हाला शुद्ध सोने-चांदीची नाणी खरेदी करता येतील.
- दिल्लीतील जनपथ येथील जवाहर व्यापार भवनात सरकारी टाकसाळीचे सेल्स आऊटलेट आहे.
- नोएडाच्या सेक्टर-1 मध्ये सरकारी टाकसाळ आहे. या ठिकाणी सोने-चांदीचे शिक्के खरेदी करता येतील.
- मुंबई येथील फोर्ट भागातील शहिद भगत सिंह रोडवर सरकारी टाकसाळ आहे. याठिकाणी सोने-चांदीचे शिक्के खरेदी करता येतील.
- हैदराबाद येथील चेरापल्लीमध्ये आईडीए फेज-2 मध्ये सरकारी टाकसाळ आहे.
- कोलकत्ता येथील अलिपूरमध्ये सरकारी टाकसाळ आहे. याठिकाणी सोने-चांदीचे शिक्के खरेदी करता येतील.
किती कॅरेटचे सोने शुद्ध
- 24 कॅरटचे सोने 24 कॅरेट सोने 99.99 टक्के शुद्ध असते. यामध्ये इतर कोणत्याच धातूचा समावेश नसतो. हे सोन्याचे सर्वात शुद्ध रुप मानण्यात येते. याचा दर्जा आणि गुणवत्तेमुळे या सोन्याची किंमत जास्त असते. 24 कॅरेट सोन्याचा उपयोग सोन्याची शिक्के, तुकडे, बिस्किट तयार करण्यासाठी करतात. तसेच औषध, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सुद्धा याचा वापर करण्यात येतो.
- 22 कॅरेट सोने 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोने असते. इतर 8.33 टक्के अन्य धातूंचे मिश्रण असते. या धातूंमध्ये प्रामुख्याने चांदी आणि तांब्याचा वापर होतो. 22 कॅरेट सोने पण शुद्ध मानण्यात येते. पण हे सोने 24 कॅरेट सोन्यापेक्षा कमी शुद्ध असते. सोन्याची दागिने, आभुषणे तयार करण्यासाठी याच सोन्याचा अधिक वापर होतो. हे दागिने महत्वाच्या कार्यक्रमात, फंक्शन यासाठीच घालण्यात येतात. हे दागिने वजनाने हलके आणि नरम असतात.
- 18 कॅरेट सोने 18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने आणि 25 टक्के चांदी आणि तांब्याचा वापर करण्यात येतो. 18 कॅरेट सोन्यात इतर धातूंचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने हा धातू कठोर होतो. हे दागिने, आभुषणे, आंगठी, गळ्यातील चैन रोजच्या वापरासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे रोजच्या वापरासाठी जे सोन्याचे दागिने तयार होतात, ते शक्यतोवर 18 कॅरेट सोन्याचेच असतात.
- 14 कॅरेट सोने 14 कॅरेट सोन्यात इतर धातूंची संख्या अधिक असते. यामध्ये केवळ 58.3 टक्के शुद्ध सोने असते. इतर 41.7 टक्के निकेल, चांदी, जस्त या धातूंचे मिश्रण असते.