Buy or Rent : घर घेण्याची नेमकी कोणती आहे योग्य वेळ, जेणेकरून भविष्यात टॅक्स वाचू शकतो?

फाइनांशियल एक्सपर्ट्स यांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही एखाद्या शहरांमध्ये नोकरी करत आहात आणि जर त्या शहरांमध्ये जास्त दिवस राहण्याचे कोणतेच प्लॅन नसेल तर अशावेळी होम लोनच्या आधारे घर विकत घेणे चुकीचा निर्णय ठरू शकतो.

Buy or Rent : घर घेण्याची नेमकी कोणती आहे योग्य वेळ, जेणेकरून भविष्यात टॅक्स वाचू शकतो?
होम लोन
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 10:59 PM

मुंबई : अनेकदा आपण मध्यम वर्गातील लोकांकडून अनेकदा ऐकले असेल की जीवनात सर्वात आवश्यक अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये राहत असाल तर एक मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला समाधान लाभते खरेतर टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट (Investment Expert) यांचे याबद्दल मत पूर्णपणे वेगळे आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर फक्त टॅक्स वाचवण्याच्या (Tax Saving) अनुषंगाने जर तुम्ही घर खरेदी (Homebuyers) करत असाल तर ही आयडीया अजिबात चांगली नाहीये. घर विकत घेताना आधी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे, त्याचबरोबर आपल्या पॉकेट मधून आपल्याला भविष्यात किती खर्च करावा लागणार आहे, याचा अंदाज सुद्धा तुम्हाला बांधावा लागेल त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या शहरांमध्ये राहत असाल आणि भविष्यात तुम्ही किती काळ राहणार आहात याबद्दल काही प्लॅन नसेल तर अशा वेळीसुद्धा शहरांमध्ये घर घेऊन काही उपयोग नाही. या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेण्याआधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, बँक साधारणतः 80 टक्के पर्यंत होम लोन (Home Loan) देतात तसेच उरलेली 20 टक्के रक्कम तुम्हाला तुमच्या खिशातून द्यावी लागते आणि त्यासाठी आवश्यक तेवढा फायनान्स बँक सुविधा पुरवतात याशिवाय सुद्धा अन्य मेंटेनेसचा खर्च आपल्याला करावा लागतो. ही रक्कम तुम्हाला आपल्या सेविंग मधून खर्च करावी लागते.

फायनान्शियल एक्सपपर्ट यांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही एखाद्या शहरांमध्ये नोकरी करत आहात आणि त्या शहरांमध्ये जर जास्त कालावधीसाठी थांबणार नसाल तर अशावेळी होम लोनच्या सहाय्याने घर घेण्याचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. अशा परिस्थितीमध्ये भाड्याच्या घरात राहणे जास्त चांगले ठरते, ही एक चांगली आयडिया ठरू शकते. जसे की आपण सगळे जाणतोच घर खरेदी केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिशनल चार्जेस द्यावे लागतात म्हणजेच यात अनेक असे काही चार्जेस असतात ते आपल्याला माहिती नसतात यामध्ये स्टॅम्प ड्युटी , ब्रोक्ररेज चार्ज, रजिस्ट्रेशन चार्ज यांचा समावेश असतो. हे चार्ज रिफंडेबल नसतात. अशातच कमी कालावधीसाठी जर आपण एखादे घर खरेदी केले आणि ते जर लगेच विकले तर आपल्याला खूप मोठे नुकसान सहन करावा लागू शकतो.

होम लोन कॅलक्युलेर इन्वेस्टमेंट मध्ये असायला हवे

मिंटमध्ये पब्लिक झालेल्या रिपोर्टनुसार PropertyPistol.com चे सीईओ आणि फाउंडर आशीष अग्रवाल यांनी सांगितले की होम लोन हे एकंदरीत कॅलक्युलेटेड इन्वेस्टमेंट मध्ये असायला हवे. तुमचं वय किती आहे? तुमच्यावर एकंदरीत किती जबाबदारी आहे? तुमची सॅलरी किती आहे? भविष्यात तुमची इनकम काय असणार आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घर खरेदी करण्याचा निर्णय घ्यायला हवा याशिवाय बाजाराची स्थिती काय आहे ?या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करायला हवा.

दोन प्रकारच्या डिडक्शनने आपल्याला मिळतो फायदा

सेबी रजिस्टर्ड टॅक्स आणि इन्वेस्टमेंट एक्सपर्ट जीतेंद्र सोलंकी यांच्या मते ,होम लोनचे EMI भरल्याने आपल्याला दोन प्रकारच्या टॅक्स डिडक्शनचा फायदा मिळतो. आपल्या होम लोनची ईएमआयवर प्रिन्सिपल पार्ट वर सेक्शन 80 सी अंतर्गत डिडक्शनचा फायदा मिळतो जसे की ज्याची लिमिट एक आर्थिक वर्षामध्ये 1.5 लाख रुपये असते. इंट्रेस्ट रीपेमेंटवर सेक्शन 24(B) अंतर्गत एका आर्थिक वर्षात 2 लाख रुपयांचा आपल्याला फायदा मिळतो. सेक्शन 80 सी ची कक्षा अरुंद आहे. जर तुम्ही 5 वर्षासाठी फिक्स्ड डिपॉजिट म्हणून एखादि रक्कम गुंतवणूक करत असाल तर, इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करत असाल, एखाद्या प्रोविडेंट फंड बरोबर अनेक ठिकाणी जर गुंतवणूक करत असाल तर अशा वेळी तुम्हाला सेक्शन 80 अंतर्गत डिडक्शनचा लाभ प्राप्त होतो. अनेक घटनांमध्ये असे पाहिले गेले आहे की ,होम लोन बॉरोवर ला सेक्शन 80 सी चा फारसा फायदा लोन ईएमआय मध्ये होत नाही. अशामध्ये मुख्य स्वरूपामध्ये आपल्याला फक्त 2 लाख रुपयाचे डिडक्शन मिळते.

30 टक्के लोकांसाठी होम लोन ही एक चांगली आयडीया ठरते

फाइनेंशियल एक्सपर्ट्स यांचे म्हणणे असे आहे की, जर तुम्ही 30 टक्के टॅक्स स्लॅब मध्ये येतात आणि नवीन घर खरेदी करून टॅक्स वाचवण्याची तुमची आयडीया चांगली आहे परंतु 20% टॅक्स स्लॅब वाल्यांसाठी टॅक्स वाचवण्यासाठी नवीन घर कधीच विकत घ्यायला नाही पाहिजे. जर तुम्ही 10 टक्के किंवा 20 टक्केच्या स्लॅब मध्ये येत असाल तर अशावेळी तुमच्या आई वडिलांसाठी इन्शुरन्स खरेदी करू शकतात.

अशावेळी मेडिकल इन्शुरन्स अवश्य खरेदी करा

इन्शुरन्स विकत घेतल्यावर स्वतः आणि कुटुंबासाठी 25000 रुपयांचे डिडक्शन मिळते. तुमचे आई-वडील जर सीनियर सिटीजन आहेत तर त्यांच्यासाठी ही मर्यादा 50 हजार रुपये एवढी असते अशा प्रकारे एकंदरीत 75 हजार रुपये तुमचे सहजरीत्या वाचतात. जर टॅक्स पेयर सुद्धा सीनियर सिटीजन आहे तर त्याच्यासाठी ही लिमिट 50 हजार रुपये एवढी असते अशा घटनांमध्ये 1 लाख रुपये पर्यंत आपल्याला डिडक्शन मिळते.

इतर बातम्या :

Supreme Court : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना चाप बसणार; सुप्रीम कोर्ट तातडीने सुनावणी घेण्याच्या तयारीत

WFH SURVEY : घर की ऑफिस, जगातील 82 टक्के कर्मचाऱ्यांनी ‘या’ पर्यायाला पसंती!

Video| भरसभेत सिगारेटचे झुरके; नागपूर महापालिकेच्या नगरसेवकाचा प्रताप

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.