Railway Ticket : दुसऱ्या प्रवाशाच्या तिकिटावर पण करा रेल्वे प्रवास, असा आहे पर्याय

Railway Ticket : दुसऱ्या प्रवाशाच्या तिकिटावर तुम्हाला रेल्वे प्रवास करता येतो. ही सुविधा मिळते तरी कशी? त्यासाठी काय सुविधा मिळते, रेल्वे विभागानेच याविषयीची माहिती दिली आहे.

Railway Ticket : दुसऱ्या प्रवाशाच्या तिकिटावर पण करा रेल्वे प्रवास, असा आहे पर्याय
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 5:45 PM

नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा देते. पण त्याविषयीची माहिती फार कमी प्रवाशांना असते. दुसऱ्या प्रवाशाच्या तिकिटावर तुम्हाला रेल्वे प्रवास करता येतो. पण त्याची माहिती कमी प्रवाशांना आहे. त्यासाठी एक नियम पण आहे. या नियमानुसार, कन्फर्म तिकीट दुसऱ्या प्रवाशाच्या नावावर हस्तांतरीत (Ticket Transfer) करता येते. रेल्वे विभाग (Indian Railway) तुम्हाला तिकीट ट्रान्सफरची सुविधा देते. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की? ही सुविधा मिळते तरी कशी? रेल्वे विभागानेच याविषयीची माहिती दिली आहे.

काय आहे सुविधा

रेल्वेने तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा दिली आहे. प्रवाशी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र यांच्या नावावर तिकीट हस्तांतरीत करु शकतात. प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असेल आणि त्याला प्रवास करता येत नसेल, अडचण असेल तर तिकीट हस्तांतरीत करता येते. त्यासाठी काही नियम आहेत.

हे सुद्धा वाचा

कसा करता येईल बदल

  1. प्रवाशी तिकीट खिडकीवरुन अथवा ऑनलाईन पद्धतीने तिकीट खरेदी करतात.
  2. पण नावात बदल करण्यासाठी रेल्वेच्या तिकीट काऊंटरवरच जावे लागेल.
  3. तिकीटाची प्रिंट आऊट आणि ज्याच्या नावावर तिकीट हस्तांतरीत करायचे त्याचे ओळखपत्र लागेल.
  4. प्रवाशाच्या ओळखपत्राची फोटो कॉपी सोबत घेऊन जावे लागेल.
  5. काऊंटरवर तिकिटावरील प्रवाशाचे नाव बदलविण्यात येईल.

वेटिंग वा RAC वर नाही मिळणार सुविधा

पॅसेंजरचे नाव बदलण्यासाठी नियम आहेत. IRCTC प्रवाशांना ही सुविधा देत आहे. तिकीटावरील प्रवाशाचे नाव बदलता येत असले तरी ही सुविधा एकदाच मिळते. एकदाच प्रवाशाचे नाव बदलता येते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिकीट कन्फर्म हवे. वेटिंग वा आरएसी तिकीटावर ही सुविधा मिळणार नाही.

24 तासांपूर्वीच बदलता येते नाव

तिकीटावर प्रवाशाचे नाव बदलता येते. तुमच्या नावाऐवजी दुसऱ्या प्रवाशाचे नाव नोंदविता येते. पण त्यासाठी आणखी एक नियम आहे. ट्रेन सुटण्यापूर्वी 24 तासांपूर्वीच नाव बदलता येते. विशेष म्हणजे एक दिवसांपूर्वी आरक्षणासाठी राखीव खिडकीवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर ही सुविधा मिळत नाही. कन्फर्म तिकीटावर आई-वडील, भाऊ-बहिण, मुलगा-मुलगी, पती-पत्नी, मित्र यांना तिकीट हस्तांतरीत करुन प्रवास करता येईल.

बोर्डिंग स्टेशन पण बदला

प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर बोर्डिंग स्टेशनचे नाव बदलविता येते. त्यासाठी प्रवाशांना IRCTC च्या संकेतस्थळावर जावे लागेल. त्या ठिकाणी बोर्डिंग स्टेशनचे नाव बदलविता येते. बोर्डिंग स्टेशनचे नाव बदलविण्यास तेव्हाच मंजुरी देण्यात येते, जेव्हा ऑनलाईन तिकीट बुक करण्यात येते. ऑफलाईन मोड, आरक्षण खिडकीवरुन तिकीट बुक केले असेल तर ही सुविधा मिळत नाही.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.