Car insurance policy : अ‍ॅड ऑन कव्हर म्हणजे काय?, कार विमा घेताना काय काळजी घ्यावी

तुम्ही जेव्हा कार विमा घेता, तेव्हा अशा अनेक बाबी असतात ज्या कार विम्यामध्ये समाविष्ट होत नाहीत. नुकसान झाल्यास तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यासाठी तुम्ही अ‍ॅड ऑन कव्हरचा उपयोग करू शकता.

Car insurance policy : अ‍ॅड ऑन कव्हर म्हणजे काय?, कार विमा घेताना काय काळजी घ्यावी
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 5:30 AM

सुभाष यांनी नवीन कार खरेदी केली आणि कार डीलरकडून (Car dealer) विमा पॉलिसीही (Insurance policy) घेतली. काही महिन्यांनंतर एका किरकोळ अपघातात त्यांच्या कारचं नुकसान झालं. अपघातामुळे इंजिनमधून (Engine) तेल गळू लागलं. त्यांनी विमा योजना घेतल्याने इतर प्रकारच्या नुकसानीची दुरुस्ती कव्हर केली गेली. मात्र इंजिनचे झालेले नुकसान भरून निघाले नाही. कार विम्यामध्ये अशा नुकसानीचा खर्च भरून निघत नाही, असं विमा कंपनीनं सुभाषला सांगितले. त्यानंतर इंजिनच्या दुरुस्तीचा खर्च सुभाषला स्वत: करावा लागला. वाहनाच्या अशा अनेक बाबी असतात, ज्याचे झालेले नुकसान कोणतीही विमा कंपनी कव्हर करत नाही. कार विम्यामध्ये टायर, इंजिन आणि यांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल बिघाडामुळे होणारे नुकसान भरून येत नाही. यात कारचे तुटणे, ब्रेकेज किंवा कारचे मूल्य कमी होणे, ठराविक कालावधीत तुमच्या कारचा घसारा म्हणजेच डेप्रीसिएशन होणे इत्यादी गोष्टींचा देखील समावेश होत नाही. तुम्ही यापैकी काही बाबींसाठी अ‍ॅड ऑन कव्हर घेऊ शकता.

अ‍ॅड ऑन कव्हरची गरज

कार विमा डेप्रीसिएशनचा खर्च कव्हर करत नाही. तुम्ही कार खरेदी करताच तिची किंमत कमी होत असते. वाहनाच्या मूल्याचे हे डेप्रीसिएशन विमा कंपनी कव्हर करत नाही. क्लेम सेटलमेन्टच्या वेळी तुमच्या कार आणि तिच्या पार्ट्सची किंमत जेवढी कमी झाली असेल तेवढी रक्कम भरपाईमधून वजा करण्यात येते. हे टाळण्यासाठी, तुम्ही अ‍ॅड ऑन म्हणून शून्य डेप्रीसिएशन कव्हर घेऊ शकता. सर्वसमावेशक वाहन विमा पॉलिसी अंतर्गत इंजिन आणि टायर संरक्षण समाविष्ट नाही. टायर्समुळे होणारी झीज हे वाहनाला ठराविक कालावधीत झालेले नुकसान म्हणून गणलं जातं. इंजिनमध्ये तेल गळती किंवा ओलावा वाढणं देखील पॉलिसीमध्ये समाविष्ट नाही. या समस्यांसाठी देखील तुम्हाला अ‍ॅड ऑन कव्हर घेता येते. तुमच्याकडे अ‍ॅड ऑन कव्हर असेल तर संबंधित कंपनीकडे तुम्ही नुकसान भरपाईचा दावा करू शकता.

विमा पॉलिसीमध्ये अपघात कव्हर नाही

अपघातात कारमध्ये अनेक प्रवासी असू शकतात. कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यास गाडीच्या नुकसानाबरोबरच गाडी चालवणारी व्यक्ती आणि वाहनातील इतर प्रवासीही जखमी होऊ शकतात. दुर्दैवाने, कार विमा पॉलिसीमध्ये कारमधील इतर प्रवाशांना वैयक्तिक अपघात कव्हर मिळत नाही. यासाठी तुम्ही पॅसेंजर कव्हर अ‍ॅड ऑन कव्हर म्हणून घेऊ शकता.कार विम्यामध्ये सहसा तुम्ही कारच्या देखभालीसाठी वापरत असलेल्या गोष्टींची किंमत कव्हर करत नाही. उदाहरणार्थ, वंगण, वॉशर, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, स्क्रू-बोल्ट इत्यादी. अशा वस्तूंवर होणारा खर्च वाहन मालकाला करावा लागतो. तसेच हा खर्च टाळण्यासाठी पाच वर्षांपेक्षा कमी जुन्या कारसाठी इतर वस्तूंचे  अ‍ॅड ऑन कव्हर  घेतले जाऊ शकते. कारची चावी हरवली असेल तर बदलण्याची किंमत विमा पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केली जाणार नाही. तसेच यासाठी वेगळे ‘की रिप्लेसमेंट’ कव्हर खरेदी करू शकता आणि खर्चात बचत करू शकता. थोडक्यात काय तर कार विमा खरेदी करताना, काय समाविष्ट आहे आणि काय समाविष्ट नाही ते तपासा. महत्त्वाच्या वाटणाऱ्या अशा वस्तूंसाठी तुम्ही अ‍ॅड ऑन कव्हर घ्या.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.