Cardless Cash Withdrawal: डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढाल? फॉलो करा या पाच सोप्या स्टेप

सध्या अनेक बँका या आपल्या ग्राहकांना डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यालाच कार्डलेस कॅश विड्रॉल (Cardless cash withdrawal) असे म्हणतात. या सुविधेचा मुख्य फायदा असा असतो की जर तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरले किंवा हरवले तरी देखील पैसे काढू शकता.

Cardless Cash Withdrawal: डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढाल? फॉलो करा या पाच सोप्या स्टेप
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 5:30 AM

सध्या अनेक बँका या आपल्या ग्राहकांना डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यालाच कार्डलेस कॅश विड्रॉल (Cardless cash withdrawal) असे म्हणतात. या सुविधेचा मुख्य फायदा असा असतो की जर तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरले किंवा हरवले आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला पैशांची खूप गरज आहे, तर तुम्ही कार्डलेस कॅश विड्रॉलचा पर्याय वापरू शकता. कार्डलेस कॅश विड्रॉलसाठी प्रत्येक बँकेचे आपले वेगळे नियम आहेत. जर तुम्हाला आयसीआयसीआय (ICICI Bank) बँकेच्या एटीएममधून डेबीट कार्डशिवाय पैसे काढायचे असल्यास तुम्हाला सर्वप्रथम आयसीआयसीआय बँकेच्या मोबाइल अ‍ॅपवर रिकवेस्ट पाठवावी लागते, त्यानंतर तुम्हाला एक क्रमांक प्राप्त होतो, तो एटीएम मशीनमध्ये टाकून तुम्ही पैसे काढू शकता. एचडीएफसी (HDFC Bank) बँकेच्या एटीएममधून जर तुम्हाला या पद्धतीने पैसे काढायचे झ्याल्यास तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येतो, तो एटीएममध्ये टाकल्याशिवाय तुम्हाला पैसे काढता येत नाहीत.

पैसे काढण्याचे लिमिट

कार्डलेस कॅश विड्रॉलसाठी प्रत्येक बँकेचे आपले एक ठरावीक लिमिट आहे. तुम्ही त्यापेक्षा अधिक पैसे काढू शकत नाहीत. तुम्ही 24 तासांच्या कालावधीत सामान्यपणे दहा हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत कॅश काढू शकता. डेबीट कार्ड वापरण्याचे जसे फायदे आहेत, तसेच अनेक तोटे देखील आहेत. कार्ड क्लोनिंग आणि स्किमिंग सारखे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे असा पद्धतीने फसवणूक टाळण्यासाठीच आता बँका आपल्या ग्राहकांना कार्डलेस कॅश विड्रॉलचा पर्याय उपलब्ध करून देत आहे.

कार्डलेस कॅश विड्रॉल कसे कराल?

कार्डलेस कॅश विड्रॉलसाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. जर समजा तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला त्या बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेच्या अ‍ॅपमधील सर्व्हिस या पर्यायावर जा, तिथे गेल्यानंतर कार्डलेस कॅश विड्रॉल या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला पैसे किती काढायचे, तुमचा डेबीट कार्डचा पीन नंबर काय आहे, तुमचे खाते कोणत्या प्रकारचे आहे, म्हणजे करंट आहे की, सेव्हिंग? असे काही प्रश्न विचारण्यात येतात. तुम्ही सर्व माहिती पूर्ण भरली की तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल. हा ओटीपी तुम्ही एटीएम मशीनमध्ये टाकून पैसे काढू शकता.

संबंधित बातम्या

Sri Lanka झाली आता नेपाळवर आर्थिक अस्थिरतेचे ढग! सायकल ते तांदूळ आयातीवर निर्बंध

महागाईमुळे ‘या’ देशावर आली होती दहा लाखांची नोट छापण्याची वेळ, सध्या परिस्थिती नियंत्रणात

रिलायन्स कॅपिटलच्या ‘कर्ज निराकरण’ प्रक्रियेबाबत प्रशासन आणि कर्जदार यांच्यात मतभेद ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.