Atal Pension Yojana : योजनेत लवकरच मोठा बदल, जास्त मिळेल पेन्शन!
Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हा बदल झाल्यास निवृत्ती वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) मोठा बदल होण्याची शक्यता आहे. हा बदल झाल्यास निवृत्ती वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. निवृत्ती वेतन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) याविषयीचा प्रस्ताव ठेवला आहे. अटल पेन्शन योजनेतंर्गत मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. लवकरच इन्श्योर्ड रिटर्न पेन्शन योजनेवर विचार करण्यात येत असल्याचे पीएफआरडीएने स्पष्ट केले. त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात वाढ होऊ शकते. निवृत्ती काळात त्यांना या वाढीव रक्कमेचा मोठा फायदा होईल.
का करण्यात येत आहे बदल? या प्रकरणी पीएफआरडीएचे अध्यक्ष दीपक मोहंती यांनी CNBCTV18 ला माहिती दिली. अटल पेन्शन योजनेतंर्गत दर महा मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या या योजनेत दरमहा लाभार्थ्याला जास्तीत जास्त 5000 रुपयांची रक्कम पेन्शन रुपात मिळते. सरकारकडे हा बदल करण्याची विनंती करण्यात आली आहे.
आणखी एक योजना पीएफआरडीएनुसार, निवृतीधारकांसाठी आणखी एक योजना आणण्याची तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय निवृत्ती पद्धतीत (NPS) एश्योर्ड रिटर्न पेन्शन स्कीमची घोषणा करण्यात येऊ शकते. अर्थात यासाठी या योजनेतील लाभार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येईल. केंद्र सरकारकडे अटल पेन्शन योजनेतंर्गत अधिकत्तम पेन्शन मर्यादा वाढविण्याची विनंती करण्यात आली आहे, असे दीपक मोहंती यांनी स्पष्ट केले.
APY जनतेत लोकप्रिय 4 मार्चपर्यंत अटल पेंशन योजनेचे सदस्य वाढून 4.53 कोटी रुपये झाले आहेत. वार्षिक आधारावर या योजनेत सदस्य संख्या 28 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील सर्वच भागातून या योजनेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
असा होतो फायदा अटल पेन्शन योजना (APY), भारतीय नागरिकांसाठी, असंघटित क्षेत्रातील कामगार, कष्टकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना आहे. या योजनेतंर्गत 60 व्या वर्षी लाभार्थ्यांना 1,000 रुपये, 2,000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये वा 5000 रुपये प्रति महिना पेन्शन मिळण्याची हमी मिळते.
कुठे उघडाल खाते असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना केंद्र सरकारने यापूर्वी सुरू केली होती, मात्र त्यानंतर तिची लोकप्रियता वाढली आणि सरकारने 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंतच्या सर्व लोकांसाठी ही योजना खुली केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून खाते उघडू शकता.
करदात्याला नाही संधी नियमांनुसार, कोणताही नागरिक जो प्राप्तिकर कायद्यांतर्गत कर भरतो, अशा करदात्याला अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. एपीवाय(APY)साठी अर्ज करणारी व्यक्ती आयकराच्या कक्षेत आल्यास, त्याचा अर्ज आणि खाते ताबडतोब बंद करण्यात येईल, असे या नियमात स्पष्ट करण्यात आले. पेन्शनचे पैसे खात्यात जमा असतील तर ते अशा लाभार्थ्याला परत करण्यात येतील. या निर्णयाची राजपत्र अधिसूचना गेल्यावर्षी 10 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती.