Marathi News Utility news Central Government is Poviding a loan of 4.78 lakh rupees to all Aadhar card owners this claim is fake
Aadhar card : आधार कार्ड धारकांना मिळतंय 4,78,000 चं कर्ज ? PIBकडून Fact Check, काय समोर आलं? जाणून घ्या…
सध्या एक मॅसेज व्हायरल होतोय. हा मेसेज फेक असून अशी स्कीम सध्या सुरू नाही, असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलंय. सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोनं याची पडताळणी केली.
सरकारने केला मोठा खुलासाImage Credit source: social
नवी दिल्ली : सोशल मीडियावरून सध्या एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. सर्व आधार कार्ड धारकांना (Aadhar card) सरकार 4,78,000 रुपयांचे कर्ज (Loan of 4.78 lakh rupees)देत असल्याचा आशय हा मेसेज आहे. ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे, त्यांना सरकारतर्फे 4.78 लाख रुपये देण्यात येत आहे, असा हा मेसेज आहे. या मेसेजनुसार, ज्या लोकांना हे (पैसे) हवे आहे, त्यांना रजिस्ट्रेशन करावे लागेल. तसेच ही स्कीम अत्यंत कमी दिवसांसाठी असल्याने ज्यांना कर्जाऊ रक्कम हवी आहे, त्यांनी त्वरित अर्ज करावा, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. हा मेसेज सरकार आणि आधार कार्डशी संबंधित असल्याने सरकारतर्फेच याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आधार कार्ड धारकांना सरकारतर्फ कर्ज देण्यात येत असल्याचे हे वृत्त खोटं असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB – Press Information Bureau) या मेसेजेसची पडताळणी केली असून , व्हायरल झालेल्या या मेसेजचे सत्य सांगितले आहे.
PIBचं ट्विट
It is being claimed that the central government is providing a loan of ₹4,78,000 to all Aadhar card owners#PibFactCheck
सोशल मीडियावरुन फिरणारा हा मेसेज पीआयबीने पडताळला असून, त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असून, अशी कोणतीही स्कीम सुरू नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. सरकारतर्फे 4.78 लाख रुपयांचे कोणतेही कर्ज देण्यात येत नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. त्याचसोबत हा व्हायरल झालेला मेसेज कोणीही फॉरवर्ड करू नका, असा आग्रहही पीआयबीने सरकारच्या वतीने नागरिकांना केला आहे. तसेच अशा बनावट मेसेजच्या प्रलोभनांना कोणीही बळी पडू नये तसेच कर्जाच्या लालसेने कोणीही आपली खासगी अथवा आर्थिक मााहिती शेअर करू नये, असे आवाहनही पीआयबीने केले आहे.
सावध रहा!
खरं सांगायचं तर, अशा पद्धतीच्या मेसेजेसमधून लोकांना गंडा घालण्यात येतो. असे मेसेजेस व्हायरल करण्यात येतात. त्यामध्ये एक संदिग्ध लिंक देण्यात येते व त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते. अशा प्रकारच्या मेसेजेसमध्ये कर्जासाठी अर्ज करण्यासाठी ग्राहकांकडून त्यांची खासगी व वैयक्तिक माहिती मागवली जाते. त्यामध्ये आधार क्रमांक, बँक अकाऊंट नंबर यांचा समावेश असू शकतो. काही प्रकरणांत तर कार्ड नंबर आणि सीव्हीव्ही ची मागणी केली जाते. तसेच लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून ओटीपीही (One Time Password) मागितला जातो. आणि या सर्व माहितीच्या आधारे त्या नागरिकांच्या बँक अकाऊंटमधून रक्कम सहज गायब केली जाते.
लिंकवर चुकूनही क्लिक करू नका
तुम्हाला जर फसवणूकीपासून वाचायचे असेल तर अशा बनावट व खोट्या मेसेजेसपासून सावध रहा. असे मेसेजेस कधीही उघडू नका आणि त्यामध्ये दिलेल्या लिंकवर तर चुकूनही क्लिक करू नका. तसेच, असे बनावट मेसेजेस कोणालाही फॉरवर्ड करणे टाळावे, अन्यथा ज्यांच्या मोबाईलमध्ये हे मेसेज जातील, त्यांनाही धोका पोहोचू शकतो. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्याआधी त्याबद्दल पूर्ण माहिती घ्यावी, पडताळणी करावी, बनावट मेसेजेसना बळी पडू नका, असा सल्ला वेळोवेळी सरकार आणि बँकेतर्फे देण्यात येत असतो.