Gold Hallmarking : सोन्याच्या हॉलमार्किंगबाबत मोठी अपडेट! आता या तारखेपर्यंत विक्री करा दागिने

Gold Hallmarking : आज, 1 एप्रिलपासून हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विक्री करता येणार नाही. पण आता सोन्याच्या विक्रीसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

Gold Hallmarking : सोन्याच्या हॉलमार्किंगबाबत मोठी अपडेट! आता या तारखेपर्यंत विक्री करा दागिने
शेवटची संधी
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 10:47 AM

नवी दिल्ली : हॉलमार्कचे सोने (Gold Hallmarking) विक्रीचा केंद्र सरकारचा नियम (Rules Change) आजपासून 1 एप्रिल 2023 पासून लागू झाला. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. आता देशातील सोन्या,चांदीचे दुकानदार, सराफा, पेढीवाले यांना 6 अंकी HUID Hallmarking चे दागिने, आभुषण विक्री करता येतील. दरम्यान याविषयीचे एक अपडेट येऊन धडकले आहे. सोन्याच्या आभुषण, दागिन्यांवरील सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक एचयूआईडी’ विषयी एक दिलासा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने दुकानदारांना एक सवलत जाहीर केली आहे. त्याचा ग्राहकांनाही फायदा होणार आहे.

काय आहे दिलासा

केंद्र सरकारने शुक्रवारी याविषयीचा दिलासा दिला. 1 एप्रिलपासून हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विक्री करता येणार नाही. पण आता सोन्याच्या विक्रीसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. देशातील जवळपास 16,000 सराफांना जूनपर्यंत दिलासा देण्यात आला आहे. ते जुने हॉलमार्क असलेले दागिने, आभुषणे विक्री करु शकतात. केंद्राने त्यांना तीन महिन्यांसाठी ही सवलत दिली.

हे सुद्धा वाचा

सवलतीचा काय होईल फायदा

सराफा व्यापारी आणि ग्राहक मंत्रालय यांच्यात काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली. त्यात व्यापार, व्यावसायिकांनी त्यांची अडचण मांडली. त्यांच्याकडे जुने हॉलमार्किंग असलेले दागिने, आभुषणे आहेत. त्याबाबत तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार, हॉलमार्किंग आदेश, 2020 दुरुस्ती करण्यात आली. जुने हॉलमार्क दागिने 30 जून, 2023 रोजीपर्यंत विक्रीची सवलत देण्यात आली. ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.

देशात इतके नोंदणीकृत व्यापारी

ग्राहक मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी माहिती दिली की, देशात 1.56 लाख नोंदणीकृत सराफा व्यापारी आहेत. त्यातील 16,243 व्यापाऱ्यांना 30 जून, 2023 रोजीपर्यंत जुने हॉलमार्क दागिने विक्रीची सवलत देण्यात आली आहे. त्यानंतर सवलतीत अतिरिक्त वाढ करण्यात येणार नाही. स्टॉक खाली करण्यासाठी त्यांना तीन महिन्यांची संधी देण्यात आली.

कोणाला मिळेल सवलत

दोन वर्षांपूर्वी जुलै 2021 पूर्वीच्या तयार दागिने, आभुषणांसाठी ही सवलत लागू असेल. ज्वैलर्ससाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशा ज्वैलर्सची संख्या 16,243 आहे. यामध्ये 6 डिजिट HUID Hallmarkingपासूनची सवलत मिळेल. इतर ज्वैलर्ससाठी आजपासून 6 डिजिट HUID Hallmarking अनिवार्य करण्यात आली आहे.

हॉलमार्क क्रमांक अनिवार्य

ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....