Lost Mobile Tracking System : चोरी गेलेला मोबाईल कसा होईल ट्रॅक, असा करता येईल ब्लॉक

Lost Mobile Tracking System : हरवलेला मोबाईल तुम्हाला आता काही मिनिटांतच शोधता येणार आहे. त्याचे लोकेशन सापडणार आहे. पण ही प्रक्रिया पूर्ण तरी कशी करणार, जाणून घ्या एका क्लिकवर..

Lost Mobile Tracking System : चोरी गेलेला मोबाईल कसा होईल ट्रॅक, असा करता येईल ब्लॉक
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 7:43 PM

नवी दिल्ली : सध्या लाखमोलांचा झालेला मोबाईल हरवला (Lost Mobile) तर अनेकांना जेवण बेचव लागते, इतके आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत. मोबाईल ही आता गरज झाली आहे. मोबाईलच्या माध्यमातून जगच हाती आल्याने त्याचं महत्व वाढलं आहे. स्मार्टफोन हरवल्यानंतर अनेक जण तो मिळण्याची आशा सोडून देतात. तर काहीजण पाठपुरावा करुन तो मिळवितात. स्मार्टफोनमध्ये वैयक्तिक डाटा, नेट बँकिंग, युपीआय यासारख्या अनेक माहितींची नोंद असते. त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यावर, हरवल्यावर तो ब्लॉक करणे हिताचे असते. आता हरवलेला मोबाईल तुम्हाला आता काही मिनिटांतच शोधता (Lost Mobile Tracking System) येणार आहे. त्याचे लोकेशन सापडणार आहे. पण ही प्रक्रिया पूर्ण तरी कशी करणार, जाणून घ्या एका क्लिकवर..

संचार साथी पोर्टल संचार साथी पोर्टलच्या (Sanchar Saathi Portal) मदतीने चोरीला गेलेला मोबाईल सहज ट्रॅक करता येईल. तसेच तो ब्लॉक पण करत येईल. या पोर्टलवर तुम्हाला हरवलेल्या मोबाईलची तक्रार दाखल करता येईल. तसेच मोबाईल ट्रॅक करता येईल. चोरट्याला पकडता येईल. तसेच या पोर्टलच्या मदतीने एका आयडीवर किती सिमकार्ड देण्यात आले आहे, याची माहिती घेता येईल.

CEIR चा पुढाकार केंद्र सरकारने CEIRने Portal सुरु केले आहे. या पोर्टलवर हरवलेला, विसरलेला, चोरलेल्या स्मार्टफोनचे ट्रॅकिंग करता येईल. या यंत्रणेची चाचपणी सुरुवातीला काही राज्यात आजपासून करण्यात येत आहे. आता देशभरातील मोबाईलधारकांना त्याचा फायदा होईल. CEIR पोर्टलवर लॉगिन करुन तुम्हाला हरवलेला मोबाईल ब्लॉक करता येईल. पण त्यासाठी FIR ची कॉपी आणि मोबाईलचा तपशील लागेल.

हे सुद्धा वाचा

मोबाईल स्क्रॅप पॉलिसी Apple सारखे ब्रँडही देशात दाखल झाल्या आहेत. त्यांनी देशात iPhone तयार करण्यास सुरुवात केली आहे. देशातील 120 कोटी जनतेकडे कोणता ना कोणता मोबाईल आहे. त्यामुळेच इलेक्ट्रॉनिक वेस्ट (Electronic Waste) ही भारतासाठी मोठी समस्या ठरत आहे. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजच्या दाव्यानुसार, वाहन स्क्रॅप पॉलिसीच्या धरतीवर लवकरच देशात मोबाईलसाठी पण स्क्रॅप पॉलिसी (Mobile Scrap Policy ) येऊ शकते.

असा करा मोबाईल ब्लॉक

  1. मोबाईल चोरीला गेल्यावर या पोर्टलच्या मदतीने ब्लॉक करता येईल
  2. https://sancharsaathi.gov.in/ या वेबसाईटवर क्लिक करा
  3. या पोर्टलवर Citizen Centric Services हा पर्याय निवडा
  4. य सेक्शनमध्ये तुम्हाला Block Your Lost/Stolen Mobile हा पर्याय मिळेल
  5. पर्यायावर क्लिक करुन मोबाईल संबंधी माहिती नोंदवा
  6. आता मोबाईल क्रमांक, 15 अंकी IMEI क्रमांक नोंदवा
  7. मोबाईल डिव्हाईस मॉडेल आणि मोबाईलचे इनव्हॉईस अपलोड करा
  8. मोबाईल हरविल्याची तारीख, वेळ, जिल्हा आणि राज्य याची माहिती जमा करा
  9. FIR ची कॉपी,पोलीस स्टेशनचे लोकेशन, राज्य, जिल्हा यांचे नाव नोंदवा
  10. तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, ई-मेल ही माहिती जमा करा
  11. सर्वात शेवटी Disclaimer हा पर्याय निवडा आणि फॉर्म जमा करा
  12. हा फॉर्म जमा केल्यानंतर तुमचा मोबाईल ब्लॉक करण्यात येईल
  13. यामध्ये तुम्हाला मोबाईल ट्रॅक पण करता येईल

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.