Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती मिळतो रिफंड, फर्स्ट एसीपासून ते जनरलपर्यंतचे चार्जेस पाहा

रेल्वेने प्रवास करताना कधी-कधी अचानक प्रवासाचा बेत रद्द झाल्याने आपल्या कन्फर्म तिकीट रद्द करावे लागते. त्यावेळी रेल्वे सर्वच्या सर्व रक्कम प्रवाशांना रिफंड देत नाही. तर कॅन्सलेशन चार्जेस कापून तिकीटांच्या किंमतीतील उर्वरित रक्कम प्रवाशांना रिफंड म्हणून परत मिळतो.

रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर किती मिळतो रिफंड, फर्स्ट एसीपासून ते जनरलपर्यंतचे चार्जेस पाहा
irctc Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 2:35 PM

मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : भारतीय रेल्वे लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर वाहतूकीचा पर्याय आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाला पहिली पसंती असते. मात्र कधी कधी तुम्ही रेल्वे प्रवासाचा बेत ऐकून तिकीट आरक्षित करता परंतू अचानक महत्वाचे इतर काम आल्याने तुमचा प्रवासाचा प्लान चौपट होतो. त्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीटे रद्द करावी लागतात. त्यामुळे कॅन्सल चार्ज देखील भरावा लागतो. हा कॅन्सलेशन चार्ज ट्रेन रवाना होण्यापूर्वी किती वेळा पूर्वी तुम्ही तिकीट रद्द करता त्यावर ठरतो. चला पाहूया किती वेळासाठी किती कॅन्सलेशन चार्ज कापला जातो.

रेल्वेमध्ये तिकीट कॅन्सल करताना दोन कॅटगरी असते. पहिला चार्ट तयार करण्यापूर्वी आणि दूसरा चार्ट बनल्यानंतर, यावरुन ठरते की तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना त्यातून चार्जेस कापून किती रिफंड मिळणार आहे.

48 तासांपूर्वी रेल्वे तिकीट रद्द केल्यावर किती चार्ज

एसी फर्स्ट क्लास/एक्झिक्युटिव्ह क्लास – 240 रु.

एसी 2 टियर/फर्स्ट क्लास – 200 रु.

AC 3 टियर/AC चेअर कार/AC3 इकॉनॉमी- 180 रु.

स्लीपर क्लास – 120 रु.

द्वितीय श्रेणी – ६० रु.

48 तासांनंतर ते 12 तासांआधी –

जर कन्फर्म तिकीट ट्रेन रवाना होण्याच्या 48 ते 12 तासांपर्यंत रद्द केले तर ट्रेन तिकीटांच्या एकूण किंमतीच्या 25 टक्के आणि किमान निश्चित केलेला फ्लॅट भाडे जे जास्त असतो तो कापला जातो. तर 12 तासांपेक्षा कमी वेळे चार्ट बनण्याआधी कन्फर्म तिकीट कॅन्सल केल्यानंतर 50 टक्क्यांपर्यंत रिफंड मिळतो.

चार्ट तयार झाल्यानंतरचा कॅन्सलेशन चार्ज –

जर चार्ट तयार झाला आहे तर कन्फर्म तिकीट रद्द करता येत नाही. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार अशा प्रवाशांना ऑनलाईन टीडीआर फाईल करवा लागतो. तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातून आपल्या रिफंड केसचा पाठपुरावा करावा लागतो. जर ट्रेन रवाना होण्याच्या चार तास आधी टीडीआर फाईल केला नाही तर कन्फर्म तिकीटावर कोणताच रिफंड मिळत नाही.

भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.