Dream Home | ही काही ऑनलाईन शॉपिंग नाही, नवीन घराचा मुहूर्त गाठण्यासाठी हे नियोजन महत्वाचे..

Dream Home | घर खरेदी काही दिवसांपासून तर काही महिन्यांपर्यंत लाबंण्याची शक्यता असते. त्यामुळे घाईघाईत घेतलेला निर्णय तुमचे नुकसान करु शकतो. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी नियोजन करणे महत्वाचे आहे.

Dream Home | ही काही ऑनलाईन शॉपिंग नाही, नवीन घराचा मुहूर्त गाठण्यासाठी हे नियोजन महत्वाचे..
घर खऱेदीपूर्वी या गोष्टींचा विचार कराImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 3:56 PM

Dream Home | या सणासुदीत तुम्ही ही घर खरेदीचा (Home buy) प्लॅन करत असाल तर त्यासाठी नियोजन (Planning) करा. घर खरेदी करणे आणि ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) करणे यात जमीन-आसमानचा फरक आहे. घाईघाईत घेतलेला निर्णय नुकसान करु शकतो. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी नियोजन करणे महत्वाचे आहे.

गेलो घर खरेदी करुन आलो असे होत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. काही दिवसांपासून तर काही महिन्यांपर्यंत घर खरेदीचे प्रकरण लांबू शकते. एखाद्या छोट्या कारणानेही घर खरेदी खरेदी लांबते.

अनेकदा कर्ज घेण्याची प्रक्रिया लांबते. ती वेळेत पूर्ण होत नाही. अशावेळी घर खरेदी करताना उशीर होतो. पैशांअभावी घर खरेदी योजना मार्गी लागत नाही.

हे सुद्धा वाचा

अशावेळी प्री-अप्रुव्ड कर्जासाठी तुम्ही बँकेकडे अर्ज करु शकता. मालमत्ता तुम्ही खरेदी केली नसली तरी तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करु शकता.

यामुळे ग्राहकाला कर्ज मर्यादेची माहिती होते. घर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला त्वरीत कर्ज रक्कम ही मिळते. व्याजदर, कर्ज कालावधी, डाऊन पेमेंट यांचाही अंदाज येतो.

जर तुम्ही एखाद्या बिल्डरकडून घर खरेदी करत असाल तर त्याचा प्रकल्प RERA अंतर्गत नोंदणी झालेला आहे का, याची माहिती करुन घ्या. कागदपत्रांआधारे त्याची खात्री करा.

रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्टनुसार, प्रकल्पाची नोंद असल्यास हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे बंधन विकासकावर येते. लवकर प्रकल्प पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असतो.

कर्ज घेताना अगोदरच 3 ते 6 EMI ची तयारी करुन ठेवा. तज्ज्ञांच्या मते खात्यात शिल्लक रक्कम असणे कधीही चांगले असते. नाहीतर क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.

नोकरी सुटल्यास, आर्थिक संकट आल्यास सहा महिन्यांच्या ईएमआयची रक्कम तयार ठेवणे फायदेशीर ठरते. जेवढ्याच फेड करु शकता, तेवढाच ईएमआय निवडण्याचा सल्ला देण्यात येतो.

आर्थिक संकट ओढावल्यास तुमच्याकडे ईएमआय भरण्यासाठी इमरजेंसी फंड तयार असणे आवश्यक आहे. तर वेळेत ईएमआय भरता येईल. त्यासाठी कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.

बँका वेतन बघून तुम्हाला मोठा ईएमआय भरण्यास प्रोत्साहन देतात. त्यात फायदाही असतो. कर्जाची परतफेड लवकर होते. व्याजाची रक्कम ही वाचते. पण आर्थिक क्षमता लक्ष्यात घेत हा निर्णय घ्या.

घर खरेदी करण्यापूर्वी आजुबाजूचा परिसर पाहून घ्या. शाळा, रुग्णालय, रेल्वे स्थानक, बसस्थानक, भाजी मार्केट, मॉल, मुख्य बाजारपेठ किती अंतरावर आहे, याचा विचार करा.

घर खरेदी पूर्वीच बिल्डर देत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती करुन घ्या. तसेच त्या पूर्ण केल्यात की नाही. त्याची माहिती घ्या. सर्वात म्हणजे घराचा ताबा, त्यासंबंधीचे सर्व कागदपत्रे, सोसायटी स्थापन्याची प्रक्रिया, बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आदींची माहिती घ्या.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.