CNG And PNG Price Reduce | येत्या काही दिवसांत सीएनजी (CNG Price) आणि पीएनजीच्या किमती (PNG Price) कमी होण्याची शक्यता आहे. सरकारच्या नव्या आदेशानंतर सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट होण्याची शक्यतेला बळकटी मिळाली आहे. पेट्रोलियम उद्योगांना (Petroleum Industries) पुरवठा होणारा नैसर्गिक वायू (Natural Gas) शहर गॅस वितरक क्षेत्राला देण्याचा आदेश जारी केला आहे. सर्वसामान्यांना स्वस्त दरात सीएनजी आणि पीएनजी मिळावेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या सीएनजी आणि स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या पीएनजीच्या किमतीत 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आयात तेल आणि नैसर्गिक वायूंवरील अवलंबित्व अधिक वाढल्याने किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाला आहे.
तीन महिन्यांपूर्वी, सरकारने वाहनांमध्ये सीएनजी आणि घरांमध्ये पीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयात केल्या जाणाऱ्या एलएनजी च्या वापरास परवानगी दिली होती. आयात केलेला गॅस महाग असला तरी घरे व वाहनांचा पुरवठा भागवावा लागत असल्याने दुसरा पर्याय नव्हता. आता सरकारने 3 महिन्यांपूर्वीचा आदेश फिरवला आहे. शहरी गॅस ऑपरेटर्सना फक्त देशांतर्गत उत्पादित गॅसचा पुरवठा केला जाईल आणि हे ऑपरेटर आयात केलेला गॅस घेणार नाहीत, असा आदेश यापूर्वी सरकारने दिला होता. आता यामध्ये बदल झाल्याने किंमती झरझर कमी होण्याची आशा आहे. सध्या आयात केलेला एलएनजी महाग झाला आहे.
सरकारची भूमिका काय?
तेल मंत्रालयाच्या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईतील महानगर गॅस लिमिटेड या शहर गॅस ऑपरेटरचा पुरवठा पूर्वीच्या 17.5 दशलक्ष मानक घनमीटरवरून 20.78 एमएमएससीएमडी (MMSCMD) इतका वाढवण्यात आला आहे. 94% वाढीव पुरवठ्याचा वापर वाहनांमध्ये सीएनजी आणि घरांमध्ये पीएनजीसाठी करण्यात येईल. नैसर्गिक वायूचा हा वाटा देशात तयार होणाऱ्या गॅसमधून भागवला जाणार आहे. पूर्वी केवळ 83-84 टक्के गॅस देशातून येत होता, उर्वरित गॅस गेल कंपनी आयात करत होती. आता आयात गॅस व तेलावरचे अवलंबित्व कमी करून घरगुती क्षेत्राकडे सरकारने मोर्चा वळविला आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या किंमती कमी होतील आणि खर्च कमी होऊन सीएनजी-पीएनजीच्या किमती घसरतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नैसर्गिक वायू हा सीएनजी आणि पीएनजी बनवण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल आहे. हा नैसर्गिक वायू मुंबई हाय आणि अरबी समुद्रात असलेल्या खोऱ्यातून काढला जातो. त्यानंतर त्यापासून सीएनजी आणि पीएनजी बनवले जाते. देशात नैसर्गिक वायूचे उत्पादन पुरेसे नसल्याने सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा अखंडपणे सुरू ठेवता येईल. त्यामुळे सरकार परदेशातून जहाजांमध्ये एलएनजी आयात करते. त्यानंतर त्या एलएनजीपासून सीएजी आणि पीएनजी गेलसारख्या प्लांटमध्ये बनवले जातात आणि शहर गॅस वितरण क्षेत्राला पुरवले जातात. तिथून गॅस घरोघरी आणि सीएनजी फिलिंग स्टेशनवर पाठवला जातो.