Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax : या तारखेपूर्वीच भरा इनकम टॅक्स रिटर्न, नाही तर 10 लाखांचा भूर्दंड

Income Tax : आयटीआर भरण्याची तारीख आता जवळ आली आहे. इनकम टॅक्स रिटर्न भरताना या तारखेचा तुम्हाला विसर पडला तर मोठा आर्थिक फटका बसेल. 10 लाखांचा भूर्दंड पण भरावा लागू शकतो.

Income Tax : या तारखेपूर्वीच भरा इनकम टॅक्स रिटर्न, नाही तर 10 लाखांचा भूर्दंड
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 4:22 PM

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात 2023-24 साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख अगदी जवळ आली आहे. कर श्रेणीत येणाऱ्या सर्वांना 31 जुलैपूर्वी आयटीआर दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे. ही अंतिम मुदत वाढविण्याची कोणतीही शक्यता नाही. अंतिम मुदतीपूर्वी ITR फाईल न केल्यास तुमच्या दंडात्माक कारवाई होऊ शकते. काहीजण प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरताना उशीर करतात. 31 जुलैपर्यंत करदाते आर्थिक वर्ष 2022-23 चे रिटर्न भरू शकतात. कर भरणा करण्यास उशीर झाल्यास आयकर विभागाची नोटीस येईल. तुम्हाला कर तर भरावा लागतो, पण दंडाचा (Penalty) फटका पण बसतो. करदात्यांना 10 लाखांचा दंड भरावा लागतो.

परदेशातील मालमत्ता इनकम टॅक्स डिपार्टमेंटने सर्व करदात्यांना अलर्ट केले आहे. त्यासाठी एक ट्विट केले. त्यानुसार, ज्या करदात्यांना दुसऱ्या देशातील मालमत्ता, संपत्ती अथवा उत्पन्नाच्या स्त्रोतातून कमाई होते. त्यांनी याबाबतचा उल्लेख करावा. आयटीआर भरताना फॉरेन एसेट शेड्यूल भरणे आवश्यक आहे .

तर 10 लाख रुपयांचा दंड ITR फाईल करताना तुम्ही तुमच्या कमाईचे सर्व मार्ग सांगणे आवश्यक आहे. अनेक लोकांकडे नोकरी व्यतिरिक्त उत्पन्नाचे इतरही पर्याय असतात. तर काही लोक नोकरी वा व्यवसायातून पैसा कमवतात. प्राप्तिकर खात्याने अशा लोकांसाठी आयटीआर फाईल करणे आवश्यक सांगितले आहे. जर तुम्ही परदेशातून कोणत्याही पद्धतीने उत्पन्न मिळवत असाल तर आयटीआर फाईल करताना लपवू नका. प्राप्तिकर खाते तुमची चोरी पकडते. याप्रकरणात 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

परदेशी मालमत्तेचा तपशील द्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटने एक ट्विट करुन याविषयीची माहिती दिली. डिपार्टमेंटनुसार, इतर देशात करदात्यांचे खाते असेल, उत्पन्न होत असेल तर त्याची माहिती द्यावी लागेल. मूल्यांकन वर्ष 2023-24 वर्षासाठी ITR भरताना फॉरेन एसेट शेड्यूलअंतर्गत तपशील द्यावा लागेल. करदात्यांना याविषयीचा तपशील द्यावा लागेल.

असा वाचावा टॅक्स प्राप्तिकर नियमानुसार, जर कोणी व्यक्ती एका आर्थिक वर्षांत 182 दिवसांपर्यंत भारतात राहत असेल तर तो भारतीय निवासी मानण्यात येतो. त्यामुळे त्याची मालमत्ता, संपत्ती, उत्पन्न कराच्या परीघात येते. त्यामुळे ITR फाईल करताना परदेशातील पगार इनकम फ्रॉम सॅलरी हेडमध्ये दाखवावी लागते. परदेशी चलनात मिळणारा पगार भारतीय रुपयांत किती होतो, याचा तपशील द्यावा लागतो.

इतक्या प्रकारचे अर्ज

  1. आर्थिक वर्ष 2022-23 साठी 31 जुलैपर्यंत प्राप्तिकर रिटर्न (ITR) दाखल करता येईल.
  2. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (CBDT) एप्रिल महिन्यात ITR फॉर्म जारी करण्यात आले.
  3. नोकरदार वर्गासाठी कंपन्यांकडून फॉर्म-16 जारी देण्यात आले.
  4. आयटीआर फाईल करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.
  5. 31 जुलैपर्यंत प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरील ट्रॅफिक जाम होते.
  6. वेळेच्या आत आयटीआर फाईल करा.
  7. वैयक्तिक करदाता, व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी सात प्रकारचे ITR फॉर्म आहेत.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.