Shopping: 67% लोक शॉपिंगपूर्वी करतात ऑनलाइन रिसर्च , समजून घ्या फेस्टिव्हल शॉपिंगचा ट्रेंड
लवकरच सणा-सुदीचे दिवस सुरू होतील. या दिवसात शॉपिंग फेस्टिव्हल्स सुरू होतात. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक डिस्काऊंट देण्यात येतात.
मुंबई, देशभरात लवकरच सणा-सुदीचे (Festivals) दिवस सुरु होतील. नवरात्र, दसरा , दिवाळी असे सण एकामागोमाग येत आहे. मात्र सणांना सुरुवात होण्यापूर्वीच देशभरात लोकांनी तयारी सुरु केली आहे. खरेदीलाही (shopping) सुरुवात झाली आहे. या दिवसात शॉपिंग फेस्टिव्हल्स (shopping trends) सुरू होतात. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक डिस्काऊंट (discounts) देण्यात येतात. 67 टक्के लोकांचं म्हणणं आहे की बाजारात जाऊन खरेदी करण्यापूर्वी ते ऑनलाइन रिसर्च (online research) करतात. देशातील खरेदीदारांचा कल काय आहे, कोणत्या गोष्टी जास्त विकल्या जातील, खरेदीबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे, हे जाणून घेऊया.
या सर्व्हेनुसार, 35 टक्के लोकांनी यंदा सणासाठी अधिक खर्च करण्याची योजना आखली आहे. तर 67 टक्के लोक हे ऑनलाइन रिसर्च केल्यानंतरच खरेदी करणार आहेत.
जेस्ट मनीने हा सर्व्हे केला असून त्यामध्ये असे आढळून आले आहे की 63 टक्के लोकांनी काय खरेदी करायचा, त्याचा प्लॅन आधीच केला आहे.
या सर्व्हे मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, शॉपिंगच्या नव्या ट्रेंडनुसार, केवळ 13 टक्के लोकांना दागिने खरेदी करायचे आहेत. तर सर्वात जास्त, म्हणजे 55 टक्के लोकांना मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट खरेदी करण्याची इच्छा आहे. 17 टक्के लोकांना फॅशन ॲक्सेसरीज आणि 2 टक्के लोकांना अन्य खरेदी करायची आहे.
भारतीय ग्राहकांमध्ये आता खरेदीपूर्वी वेगवेगळ्या ऑफर्स आणि डील्स चेक करण्याचा ट्रेंड वाढला आहे. 58 टक्के लोकांना असं वाटत की एखादी गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्यावर कोणत्या ऑफर्स आहेत, हे तपासणं गरजेचं आहे. तर 29 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की शॉपिंग करताना बजेटही लक्षात ठेवलं पाहिजे.
भारतातील 50 टक्के ग्राहक हे सणासुदीच्या दिवसात शॉपिंगसाठी 50 हजार ते 1 लाख रुपये खर्च करण्यास तयार आहेत.