मुंबई : सध्या डिजिटलचा जमाना आहे. तुम्ही अवघ्या एका क्लिकवर एलपीजी गॅस सिलिंडरची (LPG gas cylinder) बुकिंग करू शकता. इंडेन गॅस (Indane Gas) एचपी गॅस (HP Gas) आणि भारत गॅस (Bharat Gas) अशा प्रमुख कंपन्यांनी तर मोबाईच्या अवघ्या एक मीस कॉलवर गॅस बुकिंग करून देण्याची सुविधा उपलब्ध करू दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याविना सहज गॅस बुक करता येतो. मात्र आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने देखील आपल्या ग्राहकांसाठी गॅस बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट पेमेंट्स बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली.
आयपीपीबीने ट्विट करत पोस्टाच्या या नव्या सुविधेबाबत माहिती दिली आहे. सोबतच एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. आता आमच्या ग्राहकांना आयपीपीबी अॅपच्या माध्यमातून गॅस सिलिंडरची बुकिंग करता येणार आहे, हे सांगताना आम्हाला आनंद होत असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. सोबत शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये हे अॅप डाऊनलोड कसे करायचे, खाते कसे ओपन करायचे इथपासून ते गॅस सिलिंडर कसे बूक करायचे इथपर्यंत सर्व माहिती देण्यात आली आहे.
सर्वप्रथम तुमच्या मोबाईवर आयपीपीबीचे अॅप डाऊनलोड करा.
त्यानंतर त्या अॅपमध्ये तुमचा रजिस्टर नंबर एंटर करा.
रजिस्टर नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल.
ओटीपी मिळाल्यानंतर तो एंटर करा.
ओटीपी टाकताच तुमचे अॅप ओपन होईल.
या अॅपमध्ये बिल असा एक पर्याय आहे.
ज्या मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या गॅसची बुकिंग करू शकता.
गॅसची बुकिंग केल्यानंतर तुम्हाला घरपोहोच गॅस उपलब्ध होईल.
@IPPBOnline makes booking of LPG gas cylinder easy and secure with its Mobile Banking app.
To view video on how to book LPG cylinder using IPPB Mobile Banking App click – https://t.co/OGXQvTXnzL
To download IPPB mobile Banking App and for more information (1/3) pic.twitter.com/ucNEpYqoYD— India Post Payments Bank (@IPPBOnline) December 8, 2021
Online Fraud : ऑनलाइन व्यवहार करताय? फॉलो करा ‘या’ टिप्स, नाहीतर सायबर ठग घेतील गैरफायदा
माझे रेशन अॅप लाँच; रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे झाली सोपी, जाणून घ्या काय आहेत फायदे
Gold Price Today: सोने पुन्हा एकदा महागले, चांदी स्वस्त, पटापट तपासा भाव