Health Insurance : गंभीर आजारांशी करा दोन हात, माहिती आहे का क्रिटिकल इलनेस प्लॅन

Health Insurance : गंभीर आजारांशी दोन हात करण्यासाठी बाजारात अनेक विमा प्लॅन आहेत. पण त्यासाठी या गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक आहे. तरच फायदा होतो.

Health Insurance : गंभीर आजारांशी करा दोन हात, माहिती आहे का क्रिटिकल इलनेस प्लॅन
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 3:08 PM

नवी दिल्ली : सध्या रुग्णालयाचा, दुर्धर आजारावरील इलाजाचा, उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यासाठी जमापुंजी जरी खर्च केली तर उपचार पूर्ण होत नाही. आरोग्य विमा असेल तर काही प्रमाणात दिलासा मिळतो. पण गंभीर आजारांसाठी (Critical Illness Plan) साधारण आरोग्य विमा पुरेशा ठरत नाही. तसेच आरोग्य विम्यामध्ये काही कंपन्या रुग्णालयात भरती झाल्यानंतर ताबडतोब विमा संरक्षण देतात. तर काही कंपन्या अगोदर रुग्णालाच खर्च करायला लावून नंतर बिलाच्या आधारे रक्कम चुकती करतात. अत्यंत निकडीच्यावेळी तुम्ही योग्य आरोग्य विमा (Health Insurance) खरेदी केला नाही तर मनस्ताप होतो. गंभीर आजारांशी दोन हात करण्यासाठी बाजारात अनेक विमा प्लॅन आहेत. पण त्यासाठी या गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक आहे. तरच फायदा होतो.

1. आरोग्य विम्यात गंभीर आजारासंबंधीची तरतूद केव्हा साधारण आरोग्य विमा योजनेत गंभीर आजारांशी संबंधीची तरतूद नसते. अशावेळी ज्या कुटुंबांमध्ये गंभीर आजार आहेत, अथवा गंभीर आजाराची लक्षणं आहेत. प्राथमिक स्तरावर इलाज सुरु आहे, त्यांनी आरोग्य विम्यात क्रिटिकल इलनेस प्लॅन जोडणे केव्हा पण चांगले. पण हा प्लॅन घेताना ही काही छोट्या छोट्या चुका पुढे महागात पडतात. दुर्धर आजारांशी संबंधित आरोग्य विमा खरेदी करताना तुम्हाला देशातील मोठ्या आणि परदेशातील मोठं मोठ्या रुग्णालयातील उपचारांचा समावेश करता येतो. तसेच इतर खर्चाची तरतूदही या विम्यामध्ये करता येते.

2. इतक्या आजारांचा समावेश क्रिटिकल इलनेस प्लॅनमध्ये जवळपास 6 ते 50 विविध आरोग्य समस्या, आजारांचा समावेश आहे. यापैकी एक आजार झाला असेल अथवा होण्याचा धोका वाटत असेल तर हा प्लॅन खरेदी करणे आवश्यक आहे. जर विमाधारकाला भविष्यात एखादा गंभीर आजार झाला तर विमा कंपनी त्याच्या उपचारावरील खर्च देते. क्रिटिकल इलनेस प्लॅनमध्ये किडनी, हृदयरोग आणि अन्य दुर्धर आजारांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

3. भारतासह परदेशात उपचाराची सोय दुर्धर आजारावरील इलाज, उपचार करताना देशातील सर्व मोठ्या हॉस्पिटलची यादी एकदा तपासून पाहा. तसेच परदेशीतील रुग्णालयांमध्ये उपचाराचा खर्च विमा कंपनी देते की नाही ते तपासा. तसे नसेल तर मग असा आरोग्य विमा घेणे टाळा. काही दुर्धर आजारांसाठी परदेशात उपचार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अशावेळी विमान प्रवासासह इतर खर्चाची तरतूद आरोग्य विम्यात असणे आवश्यक आहे. तसेच या प्लॅनमध्ये देशातील नामांकित रुग्णालयाची माहिती असणे आवश्यक आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.