क्रेडिट-डेबिट कार्डचा व्यवहार राखायचा सुरक्षित; उपयोगी पडेल SBI चा हा गुरुमंत्र

स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतीच ग्राहकांना डिजिटल सुरक्षेसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याचा उपयोग केला तर डिजिटल व्यवहारांदरम्यान तुमची फसवणूक टळेल.

क्रेडिट-डेबिट कार्डचा व्यवहार राखायचा सुरक्षित; उपयोगी पडेल SBI चा हा गुरुमंत्र
क्रेडिट-डेबिट कार्डचा व्यवहार राखायचा सुरक्षितImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 9:06 AM

डिजिटल व्यवहारांना (Digital Transaction) सुरक्षेची भक्कम भिंत असली तर सायबर भामटे या मजबूत भिंतीला छेद पाडण्याच्या तयारीत असतात. त्यात ग्राहकांची एखादी चूक त्यांच्या पथ्यावर पडते आणि मग तुमचे खाते साफ होऊन जाते. त्यामुळे सावधगिरी आणि सतर्कता (Alert) हेच या फसवणुकीपासून वाचण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर केल्यास तुमच्या खात्याला कोणी सुरुंग लावू शकत नाही. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) नुकतीच ग्राहकांना डिजिटल सुरक्षेसाठी (Digital Saftey) नवीन मार्गदर्शक तत्वे (New Guidelines) जाहीर केली आहेत. त्याचा उपयोग केला तर डिजिटल व्यवहारांदरम्यान तुमची फसवणूक (Fraud) टळेल. अगदी नगण्य वाटणा-या या टिप्सचा वापर केला तर तुमची लाखोंची कमाई सुरक्षित राहील. तुमचा एक गाफिलपणा तुम्हाला कंगाल करु शकतो, एवढं जरी लक्षात आले तरी तुम्ही तुमची कमाई वाचवली असाच आहे. एसबीआयने क्रेडिट आणी डेबिट कार्डसाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. त्याचा वापर केला तर ग्राहक सुरक्षित व्यवहार (Safe Transaction) करु शकतील आणि ते सायबर भामट्यांचे शिकार होणार नाहीत.

या टिप्स महत्वाच्या 1 सर्वात अगोदर एटीएम अथवा पीओएस व्यवहार करताना संशयास्पद वातावरण तर नाही ना याची खात्री करा 2 एटीएम पिन टाकत असताना की-पॅड पूर्णतः झाकेल याची काळजी घ्या 3 कोणता ही व्यवहार करताना ई-कॉमर्स संकेतस्थळाची पडताळा करा. त्याचा युआएल(URL) तपासा.कारण क्लोनिंग करून संकेतस्थळही हुबेहुब तयार करण्यात येते 4 ऑनलाईन बँकिंगद्वारे डेबिट कार्ड व्यवहार तपास आणि त्यावर लक्ष द्या 5 क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्डवर खर्च करण्याची मर्यादा घालून घ्या. त्यामुळे त्याचा गैरवापर झाला तरी तुम्हाला मोठा दणका बसणार नाही

ग्रामीण भागातही क्रेडिट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्रामीण भागातील जनतेला क्रेडिट आणि डेबिट कार्डची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्यानुसार, बँका ग्रामीण भागात क्रेडिट आणि डेबिट कार्डची सुविधा देऊ शकतात. त्यासाठी त्यांना दुस-या सहयोगी वित्तीय संस्थेची मदत घ्यावी लागणार आहे. यासंबंधीचे निर्देश नुकतेच बँकेने दिले आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.