मी घरात, डेबिट कार्ड कपाटात आणि दार्जिलिंगमधून 25 हजाराचा चुना! असं कसं काय घडलं?

डेबिट कार्ड तुमच्याकडे असूनही जर ते दुसरा कुणीतरी वापरुन तुमच्या नकळत पैसे काढत असेल, तर मग ग्राहकांनी यासाठी तक्रार कुठे करायची? दाद नेमकी कुणाकडे मागायची?

मी घरात, डेबिट कार्ड कपाटात आणि दार्जिलिंगमधून 25 हजाराचा चुना! असं कसं काय घडलं?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 1:32 PM

मुंबई : दिवस सोमवारचा. तारीख 28 फेब्रुवारी 2022. ऑफिसातून घरी पोहोचेपर्यंत आई कुठे काय करते (Aai Kuthe Kai Karate) लागलं होतं. आई बाबा त्यांच्या बेडरुममध्ये बसले होते. मी ही फ्रेश होऊन टीव्ही समोर जाऊन बसलो. बसण्यासाठी मोबाईल चार्जिंगला लावला. मुलासोबत खेळू लागलो. आठ-सव्वा आठच्या दरम्यान बाजारात गेलेली बायकोही घरी परतली. तोवर आई कुठे काय करते संपलं होतं आणि रंग माझा वेगळा सुरु झालं होतं. इतक्यात घरी पाणी आलं, म्हणून पाणी भरायला लागलो. वॉशिंग मशिन लावली आणि टंगळमंगळ करत होतो. माझ्या मोबाईलवर (Mobile) तीन टेक्स्ट एसएमएस आल्याचा मेसेज टोन वाजला. एकामागोमाग एक असे तीन मेसेज येऊन पडले होते. मेसेजला हल्ली फारसं महत्त्व राहिलेलं नाही. एकतर मेसेज हे तुम्ही पगार आलाय का बघायला पाहता. नाहीतर एटीएम किंवा कुठे शॉपिंगनंतर कार्ड स्वाईप केल्यावर पाहता. तेही बॅलन्स (Bank Balance) आता किती उरलाय, हे बघायला.

…आणि 25 हजाराचा चुना!

इतक्यात घरी इस्रीवाला कपडे घेऊन आला. त्याला पैसे देण्यासाठी माझ्याकडे कॅश नव्हती. विचार केला की गुगल पे करता येतील. त्याच इराद्यानं मोबाईल हातात घेतला आणि हादरलोच!

Transactions screenshots NEW

हेच ते मेसेज, ज्यामुळे कळलं की पैसे खात्यातून गेले!

8 वाजून 31 मिनिटांनी तीन मेसेज आले होते. दहा दहा हजारचे दोन आणि पाच हजारचा एक असे एकूण 25 हजार रुपये एका मिनिटांत काढण्यात आले होते. मेसेज पाहून मी घामाघूमच झालो होतो. ना कुठला ओटीपी मी कुणाला शेअर केला आणि ना कोणत्या लिंकवर मी क्लिक केलं! तरिही माझ्या अकाऊंटमधून पैसे कसे काय गेले? या प्रश्नानं अस्वस्थ झालो. मेसेज मध्ये असलेल्या हेल्पलाईन नंबरला डिसप्युट फाईल करण्यासाठी कॉल केला. कॉल सेंटर माझ्या सहनशक्तीचं अंत पाहत होतं. मराठीसाठी 1 दाबा, इंग्रजीसाठी दोन दाबा आणि मग त्यानंतर एक्झिकेटीव्हशी बोलण्यासाठी वेटिंगवर राहा, या सगळ्यात माझी 15-20 मिनिटं गेली. अखेर ज्या बँकेच्या खात्यातून पैसे उडाले होते, त्या बँकेच्या शाखेतच फोन केला.

प्रश्न, प्रश्न आणि फक्त प्रश्न!

सुदैवानं बँक उघडी होती. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मला तातडीनं कार्ड ब्लॉक करायला सांगितलं. ते केल्यानंतर माझं अकाऊंटही फ्रीज करण्याचाही त्यांनी सल्ला दिला. हे सगळं केल्यानंतर आता पैसे परत कसे मिळवायचे, असा प्रश्न पडला.

ज्या अभ्युदय बँकेचं कार्ड स्वाईप करुन पैसे काढल्याचा मेसेज मला आला होता, ते कार्ड माझ्यासोबत माझ्या घराच्या कपाटात होतं. मी घरातच होतो. मग पैसे कोण कसं-काय काढू शकतं? हा सगळा प्रकार संशयास्पद वाटला. मी राहत असलेल्या पनवेल शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. ती तक्रार घेऊन 2 फेब्रुवारीला बँकेत गेलो. बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही आम्हाला पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती न देणं, हे जास्त घातक होतं.

निव्वळ मनस्ताप

ज्या पनवेल पोलिस स्थानकात आम्ही तक्रार नोंदवली, त्या पोलिस स्थानकात अशी तक्रार घेऊन येणारा मी एकटाच नव्हतो, हे देखील नंतर लक्षात आलं. माझ्यासारखे असे अनेक जण आहेत. अनेकांच्या तक्रारी गेलेल्या आहेत. तुमचं कार्ड तुमच्याकडे असताना, जर कुणीतरी भलंतर तुमच्या अकाऊंटमधून पैसे काढून हातचलाखी करत असेल, तर हा सर्वस्वी बँकेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. या घटनेनें बँकेत पैसे ठेवणं सुरक्षित नाहीच, अशी खात्री आता मला पटली आहे. शिवाय यासाठी करावी लागणारी कागदपत्रांची करत आणि त्याचा मनस्ताप वेगळाच आहेत. आता सध्या याबाबत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली असून हे पैसे कधीपर्यंत मिळतील, शंभर टक्के मिळतीलच, याबाबतही पूर्ण संभ्रम आहे.

Complaint

अकाऊंटमधून पैसे गेल्यानंतर केलेल्या तक्रारी

बरोबर बँक हॉलिडे आधी…

दरम्यान, माझ्यासोबत जो प्रकार घडला, तो 28 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास. 1 मार्च हा बँकेला महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी होती. पण त्यामुळे मी बँकेकडे दाद मागायला जाण्याचा कोणताच पर्याय माझ्याकडे उपलब्ध राहिला नव्हता. त्यामुळे तो संपूर्ण दिवस मी पोलिस तक्रार करण्याशिवाय दुसरं काहीच करु शकत नव्हतो. ही बाबही गंभीर आहे. सुट्टीचा दिवस लक्षात घेऊन त्याच्या आदल्या दिवशी रात्री हे असेल प्रकार वाढत असल्याचं दिसून आलंय.

फिशींगचा प्रकार ‘जमताडा’ वेबसीरिजमुळे समोर आला. पण आता तुमचं डेबिट कार्ड तुमच्याकडेच असताना हे दुसऱ्या ठिकाणी वापरलं जात असल्याचा एका नवा आणि भलताच खळबळजनक प्रकार सर्रास सुरु आहे. हा प्रकार जमताडापेक्षाही भयंकर आहे. या प्रकारानं लोकांचा डेबिट कार्ड वापरण्यावरचा आणि पर्यायनं बँकांवरचा विश्वासच उडाला, तर नवल वाटायला नको! तेच व्हायरला सुरुवात झालेली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकारात बँकाही आपली चूक कबूल करुन जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. त्यांची यंत्रणाही हे प्रकार रोखायला कमी पडतेय, हे स्पष्ट आहे.

असं कसं शक्यय?

डेबिट कार्ड तुमच्याकडे असूनही जर ते दुसरा कुणीतरी वापरुन तुमच्या नकळत पैसे काढत असेल, तर मग ग्राहकांनी यासाठी तक्रार कुठे करायची? दाद नेमकी कुणाकडे मागायची? किती दिवसांत हे पैसे परत मिळणार? हा सगळ्यात वेळखाऊपणा एखाद्या गरजूला मोठ्या अडचणीत टाकणारा आहे. सामान्य माणसाला यात बँकेची लोकं कितपत गांभीर्यानं ऐकून घेतील, याबाबतही शंकाच आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकार वाढत असून ही गोष्ट तर जमताडा पेक्षाही मोठ्या स्कॅमची आहे. याची वेळीच दखल घेत आरबीआयनं सायबर क्राईम, सीबीआय, सीआयडी, पोलिस, यांसारख्या तपास यंत्रणांना लगेचच सतर्क करण्याची गरज आहे.

आम्हाला कळवा

दरम्यान, तुमच्यासोबतही जर असाच प्रकार घडला असेल, तर त्याबाबत आम्हाला कळवा. तुमच्यासोबतही असंच झालं असल्यात त्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्हाला पैसे परत मिळण्यासाठी काही अडचणी आल्या आहेत का? तुम्हाला पैसे परत मिळाले आहेत का? हा अनुभवही आम्हाला siddhesh.sawant@tv9.com या ई-मेल आयडीवर नक्की लिहा.

या गोष्टी करणं टाळा!

  1. आपलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, रुपे कार्ड कुणाच्याही हातात देऊ नका.
  2. आपल्या डेबिड कार्ड, क्रेडिट कार्ड, रुपे कार्डचा पिन नंबर कुणालाही देऊ नका.
  3. डेबिड कार्ड, क्रेडिट कार्ड, रुपे कार्ड कुठेही स्वाईप करायला दिल्यानंतर त्यावर नंबर टाकताना एका हाताने झाकून मगच आपला पिन नंबर टाका.
  4. ओटीपी नंबर कुणासोबतही शेअर करु नका.
  5. मेसेज, ई-मेल, व्हॉट्सवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर चुकूनही क्लिक करु नका.
  6. क्यूआर कोड स्कॅन करुन पैशांचा व्यवहार करण्याआधी सतर्कता बाळगा. बेजबाबदारपणे क्यूआर स्कॅन करु नका.

संबंधित बातम्या :

घराचे बजेट कोलमडले….आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, जाणून घ्या नेमक्या कोणत्या वस्तू महागल्या!

IPO मध्ये गुंतवणूक करायचीये? तर मग त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

RBI rules: फाटलेल्या नोट बदलण्यासाठी करावी लागणार नाही आता धावपळ, आरबीआयने केले नवीन नियम जाहीर !

पाहा व्हिडीओ :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.