कर्जाने झालात हैराण, कर्जबाजारी होण्यापूर्वी करा की हा उपाय
Debt Trap | अनेक वस्तू घेण्यासाठी, वारेमाप खर्चासाठी आपण अनेकदा कर्ज घेतो. कर्ज घेताना खिशाला झळ बसत नाही. कर्ज फेडताना मात्र दमछाक होते. अनेक ग्राहकांना वैयक्तिक कर्ज फेडताना आपण फसल्या अथवा फसवल्या गेल्याचे लक्षात येते. अशावेळी या कर्जाच्या विळख्यातून कसे बाहेर पडणार...

नवी दिल्ली | 6 जानेवारी 2024 : अनेकदा एखादी वस्तू खरेदीसाठी अथवा उधळा स्वभाव असेल तर वैयक्तिक कर्जाच्या जाळ्यात ती व्यक्ती अलगद अडकते. मग कर्ज फेडताना त्याची दमछाक होते. हळूहळू ती व्यक्ती कर्जाच्या जाळ्यात फसते. एकदा पठाणी वसूली सुरु झाली की त्या व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. सर्वच बाजूने त्याची दमकोंडी होते. त्यामुळे कर्जाच्या या जाळ्यात न अडकता त्यातून लवकर बाहेर पडणे आवश्यक असते. पर्सनल लोनसाठी सर्वाधिक व्याज मोजावे लागते. त्यामुळे अत्यंत निकड असेल आणि भविष्यात आर्थिक तरतूद असेल तर असे कर्ज घेणे योग्य ठरते.
वैयक्तिक कर्जाचा तिढा असा सोडवा
हे सुद्धा वाचा

Share Market | हिंडनबर्गचा असा पण धसका; SEBI ने बदलला हा नियम, काय होईल परिणाम

SIM Card | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत सुरु, 60 सेंकदात पडेल माहिती

Budget 2024 | खासगी क्षेत्रातील चाकरमान्यांना ‘गिफ्ट’, केंद्र सरकार कर सवलत देणार

Traffic Challan | घरबसल्या भरा ट्रॅफिक चलन , Paytm सह ऑनलाईन असा भरा दंड
- कर्जाचे हप्ते थकले असतील तर बँक, वित्तीय संस्थेकडून काही कालावधी मागून घ्या
- बँकेला ई-मेलवर विनंती करा अथवा लोन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला भेटा
- त्याला ईएमआय कमी करण्याची विनंती करा. ईएमआय भरण्यासाठी वेळ मागून घ्या
- बँलन्स ट्रान्सफरची विनंती करा. त्यात बँक नवीन कर्जाद्वारे जूने कर्ज फेडते
- रक्कम जास्त असेल. पर्याय नसेल तर लोन सेटलमेंट हा पर्याय आहे.
- लोन सेटलमेंटसाठी तुम्हाला खास कारण द्यावे लागेल
- घरातील किंमती आणि इतर काही वस्तूंची विक्री करुन कर्ज फेडा
- एकापेक्षा जास्त कर्ज असतील तर जास्त व्याजाचे कर्ज बंद करा
- कर्जाला घाबरु नका, ते फेडण्याचा विचार करा
- उधळपट्टीला आवर घाला. गरजेपुरताच पैसा खर्च करा
- जादा मेहनत करुन, इतर काही काम करुन रक्कम जमा करा
कर्जाच्या जाळ्यात अडकलात हे कसे ओळखाल?
- तुमचा खर्च कमाईपेक्षा अधिक असेल
- क्रेडिट कार्डवर जादा उधार खरेदी सुरु असेल
- क्रेडिट कार्डवर कर्ज फेडीसाठी अडचण येत असेल
- तुमची जास्तीत जास्त कमाई ईएमआयसाठी खर्ची पडत असेल तर
- ईएमआय वेळेवर भरु शकत नसाल अथवा बिल वेळेवर भरता येत नसेल तर
- एका कर्जाची परतफेड करण्यासाठी नवीन कर्ज घ्यावे लागत असेल तर
- महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्वच पैसा संपत असेल तर
- महिन्याच्या शेवटचा आठवडा अत्यंत हालाकीचा असेल तर