ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आता मेट्रोचे तिकीट रद्द करू शकता, फॉलो करा प्रोसेस
तुम्ही दिल्लीला गेलात आणि मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्ही जर ऑनलाइन तिकीट काढले असेल आणि काही कारणास्तव प्रवास करायचा नसेल तर चिंता करू नका. आता तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तिकिटही रद्द करू शकता. त्यासाठीची प्रक्रिया काय असेल? चला जाणून घेऊयात.
आपल्या रोजच्या धावपळीत कामावर जाताना रेल्वेचा तसेच मेट्रोचा प्रवास करावा लागतो. त्यातच संपूर्ण देशभरात तुम्हाला मेट्रो ट्रेन पाहायला मिळेल. यामध्ये दिल्ली मेट्रो ही भारतातील सर्वात मोठी मेट्रो रेल्वे सेवा आहे. दिल्ली मेट्रोतून दररोज १० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. दिल्ली मेट्रोची एकूण लांबी ३९१ किमी आहे. यात एकूण २२८ मेट्रो स्थानके आणि १२ स्वतंत्र मार्गिका आहेत. दिल्ली मेट्रोने २००२ मध्ये काम सुरू केले. २४ डिसेंबर २००२ रोजी देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते मेट्रो रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले होते.
दिल्ली मेट्रोतून प्रवास करण्यासाठी यापूर्वी लोकांना टोकन घ्यावे लागत होते. त्यामुळे अनेकजण रोजच्या मेट्रो प्रवासासाठी मेट्रो कार्डचा वापर करायचे. पण काही दिवसांनी आता लोकांना ऑनलाइन तिकिटांचीही सुविधा मिळणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जेव्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट काढता पण जर तुम्हाला मेट्रोचा प्रवास करायचा नसेल तर तुम्ही ऑनलाईन तिकिट देखील रद्द करू शकता. त्यासाठी ची प्रक्रिया काय असेल? चला जाणून घ्या.
दिल्ली मेट्रोचे तिकीट ऑनलाइन कसे रद्द कराल?
काही काळापूर्वी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) यांनी मेट्रोमध्ये ॲडव्हान्स बुकिंगसाठी संयुक्त करार केला होता. ज्या प्रकारे तुम्ही ट्रेनचे बाहेर जाण्यासाठी काही दिवस आधीच ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. अशा प्रकारे तुम्ही मेट्रोचे देखील काही दिवस आधी ॲडव्हान्स बुकिंगही करू शकता.
मेट्रोचे तिकीट ज्या तारखेसाठी तुम्ही बुक केले आहे. तर तुम्हाला दोन दिवस आधी आणि त्यानंतर 2 दिवसांसाठी मेट्रो तिकीट वैध असणार आहे. पण काही कारणास्तव तुमची ट्रिप रद्द झाल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जसे ट्रेनचे तिकीट रद्द करतात तसेच मेट्रोचे तिकीटही रद्द करू शकता. आता मेट्रोचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने कसे रद्द करायचे त्याची प्रोसेस जाणून घ्या.
ही प्रोसेस फॉलो करा
यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला कॅन्सल तिकिटाचा पर्याय निवडा. तुम्हाला स्क्रीनवर काउंटर तिकिटाचा पर्याय दिसेल तो निवडा. यामध्ये तुम्हाला पीएनआर नंबर, ट्रेन नंबर आणि कॅप्चा सारखी आवश्यक माहिती भरून घ्या. यानंतर कॅन्सलेशन प्रोसेस व्हेरिफाय करा आणि सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुमच्या ट्रेनच्या तिकिटासोबत मेट्रोचे तिकीटही रद्द केले जाईल.
असे केले जाते बूकिंग
आता दिल्ली मेट्रोच्या तिकिटांचे बुकिंग IRCTC च्या वेबसाइट किंवा ॲपद्वारे केले जाऊ शकते. जेव्हा तुम्ही प्रवासासाठी ट्रेन बुक करता. यामध्ये तुम्हाला मेट्रो बुकिंगचा पर्याय मिळतो. त्यानुसार ॲपद्वारे तुम्ही मेट्रोचे तिकीट बुक करू शकता. त्यात तुम्ही जर डीएमआरसीच्या ॲपद्वारे किंवा व्हॉट्सॲप किंवा इतर ॲप्सद्वारे दिल्ली मेट्रोचे तिकीट बुक केल्यास नंतर मेट्रोचे तिकीट रद्द केले जात नाही. त्यामुळे तुम्ही फक्त मेट्रोचे तिकीट ज्या ॲपद्वारे बुक आणि रद्द केले जाते त्या ॲपचा वापर करा.