2000 note exchange : 2000 रुपयांच्या नोटा जमा करताना सावधान, इनकम टॅक्सच्या रडारवर येणार

2000 note exchange : कोणाच्याही 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचा खटाटोप करु नका, नाहीतर तुम्ही इनकम टॅक्सच्या रडारवर आल्याशिवाय राहणार नाहीत.

2000 note exchange : 2000 रुपयांच्या नोटा जमा करताना सावधान, इनकम टॅक्सच्या रडारवर येणार
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 7:55 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या 2000 रुपयांच्या नोटांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा घातली नाही. कर तज्ज्ञांच्या मते, नोटा जमा करताना नागरिकांना आर्थिक देवाण-घेवाणीसंबंधीचा (SFT) निर्णय माहिती असणे आवश्यक आहे. तर या SFT नियमानुसार, जास्त रोखीतील वा रक्कमा खात्यात जमा केली तर बँका याविषयीची माहिती आयकर खात्याला देतात. हे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. रक्कम जमाकर्त्याला 26एएस आणि वार्षिक सूचना विवरणासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे कोणाच्याही 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचा खटाटोप करु नका, नाहीतर तुम्ही इनकम टॅक्सच्या (Income Tax) रडारवर आल्याशिवाय राहणार नाहीत.

काय सांगतो नियम एका आर्थिक वर्षात चालू खात्यात आणि इतर खात्यात ही मर्यादा 10 लाख रुपये आणि एका आर्थिक वर्षात एक अथवा इतर चालु खात्यासाठी ही मर्यादा 50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

ही काळजी अवश्य घ्या बँकेत नोटा जमा करताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार खातेदाराने त्याचा खाते क्रमांक, नाव आणि इतर आवश्यक तपशील अद्ययावत ठेवावा. बँकेत रक्कम जमा केल्याची पावती पण सांभाळणे फायदेशीर ठरते. बँक काऊंटरवर अथवा ऑलनाईन व्यवहारात बँक स्टेटमेंट उपयोगात येते.

हे सुद्धा वाचा

आयकर खात्याचा नियम आयकर खात्याच्या नियमानुसार, जर तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला पॅनकार्ड क्रमांक देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे बँकेत मोठी रक्कम जमा करताना पॅनकार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

तर इनकम टॅक्स नोटीस बँकेत पैसा जमा केल्यानंतर प्राप्तिकर खात्याची नोटीस मिळू शकते. तुम्हाला 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याची कोणतीच मर्यादा नाही. तुम्ही किती ही रक्कम जमा करु शकता. पण याचा दुसरा अर्थ असा पण आहे की, तुम्ही इनकम टॅक्स विभागाच्या रडारवर येऊ शकता. एका दिवशी नागरिकाला दोन हजारांच्या 10 नोटा म्हणजे एकूण 20,000 रुपये जमा करता येतील. पण तुम्ही किती रक्कम जमा करत आहात, आयकर विभागाच्या मर्यादेपक्षा ही रक्कम जास्त असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचे स्त्रोत काय याची विचारणा होऊ शकते.

महत्वपूर्ण बदल RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे एका मर्यादेपर्यंत या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज अथवा ओळखपत्र दाखविण्याची गरज नाही.

रोख आणा आणि रोख न्या आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.