Bank Account : बँक खात्यातून 436 रुपये झाले गायब! का कापण्यात येत आहे रक्कम?

Bank Account : तुमच्या पण बँक खात्यातून 436 रुपये कपात झाले का? कारण तरी काय, कशामुळे झाली ही रक्कम गायब...

Bank Account : बँक खात्यातून 436 रुपये झाले गायब! का कापण्यात येत आहे रक्कम?
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 11:08 AM

नवी दिल्ली : देशातील अनेक खातेदारांच्या बँक खात्यातून (Saving Bank Account) रक्कम कपात झाली आहे. सकाळीच त्यांना धडाधड एसएमएस येऊन धडकल्याने अनेकांना ही बाब समोर आली. पण ही रक्कम कशासाठी कापली जात आहे, असा प्रश्न काही नागरिकांना पडला आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन खाते नाही त्यांची अवस्था तर अजून बिकट झाली आहे. त्यांना कामाच्या गरड्यामुळे याविषयीची माहिती घ्यायला पण सवड नाही. बँक खात्यातून 436 रुपये कपात (Amount Debit) का झाले, त्याचा कशासाठी उपयोग करण्यात येत आहे, कशामुळे ही रक्कम झाली गायब?

या योजनेचा हा परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सर्वसामान्य नागरिकांना विमा संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana-PMJJBY) सुरु केली होती. तसेच पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) सुरु केली होती. या योजनेच्या हप्त्यापोटी अनेक ग्राहकांच्या खात्यातून ही रक्कम वळती करण्यात आली आहे.

स्वयंचलित सहमती अनेकांनी बँकेत जाऊन या योजनेचा लाभ घेतला. योजना सुरु असताना अनेकांनी पुढील वर्षी रक्कम कपात करण्यासाठीची स्वयंचलित सहमती दिली आहे. त्याला ऑटो डेबिट असे म्हणतात. म्हणजे त्यांनी ही योजना सुरु ठेवण्यासाठी खात्यातून ऑटो डेबिटचा पर्याय निवडला. त्यामुळे अनेकांच्या बचत खात्यातून रक्कम कपात होत आहे. 18 ते 50 वर्ष वयाची व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.

हे सुद्धा वाचा

2 लाखांचे अर्थसहाय बँक खात्यांसाठी आधार कार्ड केवायसीचे काम करते. 1 जून ते 31 मे पर्यंत, या कालावधीत या दोन्ही विमा योजनांचे संरक्षण मिळते. ही योजना 12 महिन्यांसाठी वैध आहे. या काळात विमाधारकासोबत अघटित घडल्यास, त्याचा मृत्यू ओढावल्यास, त्याच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळते.

वार्षिक प्रीमिअमची कपात तुमच्या खात्यातून सध्या 436 रुपयांची कपात झाली आहे. या दोन्ही योजनांपैकी तुम्ही जी विमा योजना निवडली आहे, त्याच्या प्रीमियम, हप्त्यापोटी ही रक्कम कपात झाली आहे. ही योजना जीवन विमा कंपनी आणि इतर विमा कंपन्या देतात. बँकांमार्फत ही योजना चालविली जाते.

ऑटो डेबिट कसे रोखणार पंतप्रधान जीवन ज्योति बिमा योजना अथवा प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना यापैकी एखाद्या योजनेत रक्कम जमा करण्यास तुम्ही असमर्थ असाल, तर तुम्हाला ऑटो डेबिट रोखता येते. त्यासाठी ऑटो डेबिटिंगचा पर्याय रद्द करावा लागोत. त्यासाठी जवळच्या बँक शाखेत जावे लागेल आणि यासंबंधीचा अर्ज, विनंती करावी लागेल. ऑनलाईन खाते असल्यास, संबंधित योजनेत तुम्हाला ऑटो डेबिट कॅन्सलचा पर्याय दिसेल. तो सक्रिय करावा लागेल. त्यानंतर पुढील वेळी तुमच्या खात्यातून परस्पर रक्कम कपात होणार नाही.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.