LIC Policy : गुंतवणूकदारांना मिळाली संधी, बंद पॉलिसी करा सुरु, ही आहे अंतिम मुदत

LIC Policy : एलआयसी पॉलिसी व्यपगत म्हणजे अचानक बंद झाली तर ती पुन्हा सुरु करता येईल. त्यासाठी अंतिम तारखेची घोषणा करण्यात आली आहे. काय आहे ही प्रक्रिया

LIC Policy : गुंतवणूकदारांना मिळाली संधी, बंद पॉलिसी करा सुरु, ही आहे अंतिम मुदत
विमाधारकांना दिलासा
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 7:04 PM

नवी दिल्ली : विमाधारकांना त्यांची विमा योजना (Insurance Policy) सुरु करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. एलआयसीने (LIC) बंद पॉलिसी सुरु करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार, तुम्हाला बंद पॉलिसी सुरु करता येणार आहे. पण त्यासाठी एक निश्चित कालावधी ठरविण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून व्यपगत, बंद पडलेली पॉलिसी सुरु करण्यासाठी एलआयसीने खास मोहिम आखली आहे. या मोहिमेतंर्गत 1 फेब्रुवारी ते 24 मार्च 2023 रोजी दरम्यान एलआयसीची बंद पॉलिसी सुरु करता येणार आहे. सर्व प्रकारच्या पॉलिसी या दरम्यान नुतनीकरण (Renew) करण्यात येईल. काही कारणास्तव पॉलिसी बऱ्याच दिवसांपासून बंद झाली असेल तर ती सुरु करता येईल. हप्ता न भरल्याने ही पॉलिसी बंद झाल्यास आता पुन्हा सुरु करता येणार आहे.

एलआयसीने याविषयीचे ट्विट केले आहे. त्यानुसार ,एखादी पॉलिसी व्यपगत (Lapsed) झाली असेल तर ती सुरु करता येईल. एलआयसीने त्यासाठी मोहिम सुरु केली आहे. 1 फेब्रवारी 2023 ते 24 मार्च 2023 या कालावधीत विलंब शुल्क भरुन ही पॉलिसी सुरु करता येते.

1 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर विलंब शुल्कावर 25 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. 3 लाख रुपयांच्या प्रीमियमवर 25 टक्क्यांची सूट मिळेल. तर 3 लाख आणि त्यापेक्षा अधिकच्या प्रीमियमवर 30 टक्के सूट मिळते. त्यानुसार दुहेरी फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

एलआयसी विम्याचे नुतनीकरण करण्यासाठी अट आणि नियमांचे पालन करावे लागेल. त्यानुसार अनपेड प्रीमियमची तारीख पाच वर्षांच्या आत नुतनीकरण करण्यात येईल. प्रीमियम भरताना आधुनिक तंत्राचा वापर केल्यास 5 रुपयांची विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे विलंब शुल्क भरताना त्याचा फायदा घेता येईल.

या सरकारी विमा कंपनीचा नुतनीकरणाची मोहिम सर्वच पॉलिसींसाठी लागू नाही. अधिक जोखिमयुक्त मुदत विमा, आरोग्य विमा, मल्टिपल रिस्क पॉलिसीजसाठी नुतनीकरणाची संधी देण्यात आलेली नाही. टर्म इन्शुरन्स पॉलिसीबाबत नियमात एक सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार अशा विमांच्या मुदत अद्याप संपलेली नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. वेळोवेळी एलआयसी प्रत्येक वर्गासाठी योजना आणते. या योजनेतून गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होतो. त्यामुळे एलआयसीच्या योजनेवर अजून गुंतवणूकदारांचा विश्वास आहे.

एलआयसी योजनाचा सर्वात चांगला फायदा म्हणजे, बचतीसह गुंतवणूकदाराला विम्याचे संरक्षणही मिळते. त्याला मॅच्युरिटी कालावधीनंतर सर्व फायदे तर मिळतातच, पण पुढे पाच ते दहा वर्ष विम्याचे संरक्षण सुरुच राहते.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.