सोशल मीडियावर व्हायरल होत आहे चक्क घटस्फोटाची पत्रिका! जयमाला विसर्जनासह होणार अनेक विधी
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पहिल्यांदाच 'घटस्फोट सोहळा' आयोजित केला जात आहे. भाई वेलफेअर सोसायटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत, त्या देखील लग्नाच्या आमंत्रण पत्रिकांप्रमाणेच!
आतापर्यंत तुम्ही लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झालेली पाहिली असेल. पण, आता जे कार्ड व्हायरल होत आहे, ते पाहून प्रत्येकाच्याच भुवया उंचावत आहे . लग्नानंतर घटस्फोटाची निमंत्रण पत्रिका (Divorce Invitation) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. थोडक्यात काय, तर घटस्फोट हा आता दुःखाचा किंवा न्यूनगंडाचा विषय राहिलेला नाही. घटस्फोटासारखी गोष्ट देखील आता साजरी केली जात आहे. हे घटस्फोट कार्ड सोशल मीडियावर (Viral on social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
घटस्फोट सोहळा
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पहिल्यांदाच ‘घटस्फोट सोहळा’ आयोजित केला जात आहे. भाई वेलफेअर सोसायटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी त्यांनी निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत, त्या देखील लग्नाच्या आमंत्रण पत्रिकांप्रमाणेच! आता हे कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 18 सप्टेंबरला होणारा हा घटस्फोट सोहळा आता लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. घटस्फोटाचा होणारा हा आनंद आगळावेगळा आहे.
लोकांना निमंत्रण पत्रिका पाठवून या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जात आहे. गमतीची गोष्ट म्हणजे लग्नादरम्यान ज्या प्रकारचे विधी होतात त्याप्रमाणे विधी घटस्फोट समारंभातही होणार आहे. जसे- संगीत, जयमाला विसर्जन, वरातील परत पाठवणे आणि बरेच काही. एवढेच नाही तर कार्यक्रमाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे, जो कार्डमध्येच छापलेला आहे.
या घटस्फोटाच्या निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहितीही देण्यात आली आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेतून गेलेले पुरुष आनंदाने नवीन आयुष्य सुरू करू शकतील आणि त्यांचे जुने आयुष्य विसरून जावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.