1-4-3 फॉर्म्युल्याने मिळेल प्रेम, तर 8-4-3 ने चालत येईल पैसा, आता फैसला तुमचा

Crorepati Formula | गेल्या पाच वर्षांतील शेअर बाजाराच्या घौडदौडीचा परिणाम म्युच्युअल फंडवर पण दिसून आला. ज्या गुंतवणूकदारांनी SIP च्या माध्यमातून गुंतवणूक केली. त्यातील अनेकांना 15.3% परतावा मिळाला आहे. दीर्घकाळासाठी एसआयपीत गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा झाल्याचे दिसून येते. 10 वर्षे, 15 वर्षे आणि 20 वर्षांसाठी एसआयपीच्या माध्यमातून क्रमशः 13.5%, 13.2% आणि 13.39% परतावा मिळाला आहे.

1-4-3 फॉर्म्युल्याने मिळेल प्रेम, तर 8-4-3 ने चालत येईल पैसा, आता फैसला तुमचा
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 4:21 PM

नवी दिल्ली | 1 डिसेंबर 2023 : भरपूर पैसा कमविणे सोपे काम नाही. बँकेत बचत केली तरी एक ठराविक मर्यादीत रक्कम जमा होते. तुम्ही कधी विचार केला का की लखपती, कोट्याधीश होण्यासाठी किती कालावधी लागेल? अर्थात तुम्ही किती रक्कम दरमहा गुंतवतात त्यावर हे अवलंबून असेल. एवढेच नाही तर त्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो. त्यावर पण ही रक्कम किती वाढते हे अवलंबून असते. पण एक कोटी रुपये जमा करण्यास वेळ लागेल पण ही एकदमच अवघड गोष्ट नाही. आर्थिक शिस्त आणि कंपाऊंडिंगच्या शक्तीने दीर्घकाळातील गुंतवणूक तुम्हाला लखपती, कोट्याधीश करेल. तुमची बचत ही काही वर्षांतच दुप्पट वा तिप्पट होईल.

कंपाऊंडिंग कसे करते श्रीमंत

बँकेतील बचतीवर, आवर्ती ठेव योजना, मुदत ठेव योजनेत एका मर्यादेबाहेर तुम्हाला व्याज मिळत नाही. तुमची मुळ रक्कम दुप्पट होण्यासाठी इथं अधिक काळ लागतो. तसेच त्यावर चक्रव्याढ व्याजाचा मोठा लाभ होताना दिसत नाही. कंपाऊंडिंगमध्ये हाच चमत्कार होतो. व्याजाची रक्कम तुमच्या मुळ रक्कमेत जमा होते आणि त्यावर पुन्हा व्याज मिळते. म्हणजे व्याजावर व्याज मिळते. तुमच्या मुळ रक्कमेवर अधिक परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

हा 8-4-3 नियम आहे तरी काय

जर तुम्हाला कमी वेळेत 1 कोटी रुपये जमा करायचे असतील तर तुम्हाला कंपाऊंडिंगचा 8-4-3 हा नियम माहिती असणे आवश्यक आहे. हे एका उदाहरणावरुन समजूयात. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIP च्या माध्यमातून दरमहा 21,250 रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर दरमहा 12% व्याज मिळाले. वार्षिक चक्रवाढ व्याजाने तुमच्या म्युच्युअल फंड खात्यात आठच वर्षात 33.37 लाख रुपये जमा होतील.

कंमाऊंडिंगचा नियम

ही 8 वर्षांची गुंतवणूक तुम्ही केली. आता पुढील 33 लाख रुपये जमा होण्यासाठी 8 वर्षे लागणार नाहीत तर केवळ 4 वर्षे लागतील. तर त्यापुढील 33.33 लाख रुपये जमा होण्यासाठी केवळ 3 वर्षे लागतील. म्हणजे एकूण 15 वर्षांत 1 कोटी रुपये जमा होतील. आता तुम्हाला वाटत असेल की इथं पगारच कमी आहे. तिथे बचत किती करणार? तर या फॉर्म्युलामध्ये तुमची दोन हजार, तीन हजार, चार हजारांची बचत बसून पाहा. तुम्हाला लखपती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.