PPF Account : पीपीएफ खात्यावर मिळेल दुप्पट व्याज! ही युक्ती करेल काम खास

PPF Account : पीपीएफ गुंतवणुकीवर व्याज तर मिळतेच, पण कर सवलतीसाठी पण दावा करता येतो. केंद्र सरकार या गुंतवणुकीची हमी घेते.

PPF Account : पीपीएफ खात्यावर मिळेल दुप्पट व्याज! ही युक्ती करेल काम खास
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 11:02 AM

नवी दिल्ली : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ (PPF Account) हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. या योजनेत तुम्हाला जोरदार व्याज तर मिळतेच पण कर सवलतीचा फायदा पण होतो. अनेक गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणुकीसाठी अग्रेसर असतात. या योजनेतील गुंतवणुकीवर केंद्र सरकार (Central Government) हमी घेते. या योजनेतील गुंतवणूक E-E-E या श्रेणीत ठेवण्यात आली आहे. म्हणजे या योजनेतील गुंतवणूक, व्याज, म्यॅच्युरिटी रक्कम सर्वच करमुक्त (Tax Free) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना भलामोठा फायदा मिळतो. त्यांना चांगला परतावा तर मिळतोच पण कर सवलतीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष फायदा ही मिळविता येतो.

अशी मिळेत कर सवलत PPF मधील गुंतवणुकीवर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. तुम्ही गुंतवणूक दुप्पट करु शकता. जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या नावे, पत्नीच्या नावे पीपीएफ खाते उघडाल तर अधिक फायदा होईल. एका आर्थिक वर्षात गुंतवणूक दुप्पट होईल. त्यामुळे तुम्हाला पती-पत्नी या दोन्ही खात्यावर दुप्पट व्याज कमाविता येईल. तसेच पत्नी जर नोकरदार असेल तर कर सवलतीचा फायदा घेता येईल. म्हणजे एकाच योजनेवर परतावा आणि कर सवलतीचा फायदा मिळेल.

PPF गुंतवणुकीचे फायदे तज्ज्ञांच्या मते, पत्नीच्या नावे PPF खाते उघडल्यानंतर दुसऱ्या गुंतवणूक पर्यायासारखा याचा वापर करता येईल. तुमच्याकडे पीपीएफमधील गुंतवणुकीसाठी दोन पर्याय असतील. जर तुम्ही पत्नीच्या नावे 1.5 लाख रुपये तर तुमच्या नावे 1.5 लाख रुपये जमा कराल तर त्यावर वेगवेगळे व्याज मिळेल. तर एका कोणत्याही खात्यावर कर सवलतीचा फायदा मिळेल. तुम्ही खासगी व्यावसायिक असाल आणि पत्नी नोकरदार असेल तर कर सवलतीवर दावा करता येईल. तुमची वार्षिक गुंतवणूक 3 लाख रुपये होईल. या योजनेतील गुंतवणूक E-E-E या श्रेणीत असल्याने कर सवलतीचा मोठा फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

रक्कम व्याजमुक्त पत्नी, पतीच्या नावे पीपीएफ खाते उघडाल, तेव्हा दोन्ही खाते करमुक्त असतील. परंतु, प्राप्तिकर कायद्याच्या कलम 64 अंतर्गत पत्नीला दिलेली रक्कम अथवा भेट, उत्पन्न करपात्र ठरु शकते. पीपीएफमध्ये मात्र याविषयीची कुठलीही अडचण येत नाही. गुंतवणूकदारांना मोठा फायदा होतो. त्यांना या नियमाचा अडसर येत नाही.

PPF वरील व्याजदर पीपीएफ खात्यात जोडप्यांना मोठा फायदा मिळतो. जर पती-पत्नीने खाते उघडले तर दोन्ही खाते मिळून मोठी रक्कम जमा होते. सध्या एप्रिल ते जून या तिमाहीत पीपीएफवर 7.1 टक्का व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

PPF खाते कसे होईल सक्रीय जर तुमचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे, PPF चे खाते निष्क्रिय झाले तर बँक असो वा पोस्ट खाते, याठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यामध्ये मोठा आर्थिक फटका बसतो. तुम्हाला ज्या वर्षापासून हे खाते पुन्हा सक्रिय करायचे आहे, तेव्हापासून या खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागेल. तसेच दरवर्षी 50 रुपये दंड जमा करावा लागेल. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.