Earthquake: अशा प्रकारे मोजली जाते भूकंपाची तीव्रता, किती रिक्टल स्केलचा भूकंप घडवू शकतो विध्वंस?
भूकंप आल्यानंतर रिश्टर स्केलचा उल्लेख हमखास होतो. हे रिश्टर स्केल नेमके कसे काम करते आणि त्यावरून तीव्रता कशी ओळखतात याबद्दल जाणून घेऊया.

मुंबई, मध्यरात्रीनंतर आलेल्या भूकंपामुळे (Earthquake) दिल्लीसह उत्तर भारत आणि नेपाळमध्ये भूकंप (Nepal Earthquake) आला. भूकंपामुळे नेपाळमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथील डोटी येथे घर कोसळले. या अपघातात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश आहे. भूकंपात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कर मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे.नेपाळमध्ये रात्री उशिरा चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, पृथ्वीचा थरकाप केवळ नेपाळपुरता मर्यादित नव्हता. दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह देशातील 8 राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (Richter scale) 6.3 इतकी होती. स्केलच्या श्रेणीनुसार, ते मध्यमपेक्षा जास्त मानले जाते.
जेव्हा भूकंप येतो तेव्हा रिश्टर स्केलचा उल्लेख हमखास होतो. हे रिश्टर स्केल नेमके काय आहे? ते कसे काम करते? आणि यावरून तीव्रतेचा अंदाज कसा बांधला जातो याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. यानिमित्त्याने रिश्टर स्केलचे गणित जाणून घेऊया.
काय आहे रिश्टर स्केलचे गणित?
भूकंपाची तीव्रता ही अवमुक्त झालेल्या उर्जेच्या आधारावर मोजली जाते आणि ती मोजण्याचं एकक आहे- रिश्टर स्केल. 1935 मध्ये चार्ल्स रिश्टर या भू-वैज्ञानिकाने भूकंपातून निर्माण होणाऱ्या तरंगाना मापण्यासाठी रिश्टर स्केलची निर्मिती केली. लघूरूपात याला लोकल मॅग्नीट्युड (ML) लिहीतात. कंपनाचे मापन करण्यासाठी भूकंपमापक यंत्र (seismograph) वापरलं जातं. हे यंत्र भूकंपाच्या लहरींचं कागदावर चित्रण करतं. भूकंपमापकावर चित्रित झालेल्या भूकंपलहरींच्या सर्वोच्च एककाचे लघुगणक एककात (Logarithmic scale) रूपांतर करून स्केलमधील तीव्रता काढली जाते.




रिश्टर स्केल हे एकक भूकंपाच्या तरंगाना अंकांमध्ये मापण्यासाठी वापरलं जातं. हे आपल्या मूळ किंमतीच्या 10 पट अधिक किंमतीत व्यक्त होतं. म्हणजे 1 रिस्टर स्केल हे वास्तविक 10 असतं, तर 2 रिश्टर स्केल हे 100 होईल. रिश्टर स्केल एका युनिटने वाढल्यास भूकंपाची तीव्रता 10 पटींनी वाढलेली असते आणि प्रत्येक वाढणाऱ्या युनिट मागे अवमुक्त होणारी उर्जा 31.6 पटींनी वाढलेली असते. सोप्या शब्दांत सांगायचं तर रिश्टर स्केल 0.2 एककांनी वाढला तर अवमुक्त होणारी उर्जा दुपटीने वाढते.
रिश्टर स्केलवर 0 ते 9 किंवा त्यापेक्षा जास्त आल्यावर काय घडते?
- 0-1.9- हे फक्त सिस्मोग्राफद्वारे शोधले जाऊ शकते. 2-2.9 च्या तीव्रतेमध्ये लोकांना लटकलेल्या गोष्टी हलताना दिसतात.
- 3-3.9- या दरम्यान हादरे जाणवू लागतात.
- 4-4.9- प्रत्येकाला भूकंपाचे धक्के जाणवतील. छोट्या छोट्या गोष्टी तुटण्याची शक्यता असते.
- 5-5.9- घर आणि कार्यालयातील फर्निचर त्याच्या जागेवरून हलू शकते. भिंतीला तडे जाण्याची शक्यता आहे.
- 6. 6.69- या तीव्रतेने इमारतींचे नुकसान होऊ शकते.
- 7-7.9- येथून विनाश सुरू होतो. रिश्टर स्केलवर हा आकडा 7 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर जीवितहानी होऊ शकते. इमारती कोसळू शकतात आणि जमिनीवर भेगा पडू शकतात.
- 8-8.9- मोठ्या प्रमाणावर विनाश होऊ शकतो. जीवित हानी होण्याची शक्यता असते.
- 9 किंवा त्याहून अधिक – 2011 मध्ये जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 9.1 होती. या दरम्यान जमिनीला मोठे हादरे बसून जामीन फाटण्याची शक्यता असते. त्सुनामी येण्याची शक्यता असते.