शेअर बाजाराला युद्धाचे ग्रहण, बाजार कधी सावरणार? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धामुळे भारतीय शेअर बाजाराचा (stock market) चेहरामोहरा बदललाय आकाशात उंच झेपावू पाहणाऱ्या पक्षाची पंख छाटल्यानंतर जशी परिस्थिती होते तशीच परिस्थिती बाजारात आहे. फक्त 10 दिवसांत निफ्टी 6 टक्क्यांनी घसरलाय

शेअर बाजाराला युद्धाचे ग्रहण, बाजार कधी सावरणार? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 5:30 AM

Stock market update : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धामुळे भारतीय शेअर बाजाराचा (stock market) चेहरामोहरा बदललाय आकाशात उंच झेपावू पाहणाऱ्या पक्षाची पंख छाटल्यानंतर जशी परिस्थिती होते तशीच परिस्थिती बाजारात आहे. फक्त 10 दिवसांत निफ्टी 6 टक्क्यांनी घसरलाय. बाजारात गुंतवणूकदारांचे 21 लाख कोटी रुपये बुडालेत, मिडकॅप, स्मॉलकॅपचं सर्वात मोठं नुकसान झालंय. मिडकॅप इंडेक्स 8 टक्के आणि स्मालकॅप इंडेक्स 11 टक्क्यांनी घसरलाय. सगळ्यात जास्त फटका धातूंच्या शेअर्सला बसलाय. धातूचे शेअर्स 12 टक्क्यानी घसरलेत. रियल्टी इंडेक्स 11 टक्क्यांनी घसरलाय. ऑटो, इंफ्रास्ट्रक्चर, फार्मा,एनर्जी आणि FMCG सगळ्याच क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास उडालाय. इंडिया विक्समध्ये आलेली तेजी बाजारातील गोंधळलेली परिस्थिती दर्शवते. इंडिया विक्चा इंडेक्स रेकार्डब्रेक 71 टक्क्यांवर पोहचलाय.

अनेक कंपन्या एव्हरेज लाईनच्या खाली

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये टॉप 500 कंपन्यांपैकी 487 कंपन्या अशा आहेत ज्या 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेज लाईनच्या खाली गेल्या आहेत. यातील 454 कंपन्या 100 दिवसाच्या आणि 417 कंपन्या 200 दिवसांच्या मूव्हिंग एवरेजच्या खाली व्यवसाय करत आहेत. गेल्या आठवड्यात शुक्रवारी बाजारात थोडी तेजी दिसून येत होती. मात्र काल बुधवारी पुन्हा एकदा शेअर मार्केट कोसळले.

बाजारात सुधारणा कधी?

आकडेवारीनुसार युद्धासारख्या परिस्थितीत बाजार 8 ते 10 दिवसांत एकदम खालच्या स्तरावर पोहोचतो. आणि बाजाराला पुन्हा स्थिर स्थावर होण्यासाठी 37 दिवसांचा वेळ लागतो. उत्तर कोरियाच्या तणावाच्या वेळी 87 दिवसांनी बाजार स्थिरावला. अमेरिकेत झालेल्या 9/11 हल्ल्यानंतर 80 दिवसांनी बाजार स्थिरावला.ही आकडेवारी पाहून निश्चितपणे असे म्हणता येईल की, युद्धजन्य परिस्थितीमध्ये शेअर मार्केट सुधारण्यासाठी काही काळ हा जाऊ द्यावाच लागतो.

तज्ज्ञाचं मत काय?

याच आकडेवारीचा संदर्भ घेऊन बाजारातील तज्ज्ञ कंपनीची खातेवही पाहत आहेत. जियोजीत फायनानेंशियल सर्विसचे मुख्य गुंतवणूक तज्ज्ञ व्ही.के. विजयकुमार यांच्या मतानुसार निफ्टी तेजीच्या 12 टक्के, मिडकॅप 20 टक्के आणि स्मालकॅप 22 टक्के खाली आहेत. यामुळे बाजारात जास्त मूल्यांकनाचा मुद्दा निकाली निघालाय. अशावेळी मजबूत फंडामेंटल असलेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. अजून युद्ध सुरू आहे. रशियावर निर्बंध लादण्यात आलेत. सध्या 15800 निर्देशांकाचा मजबूत सपोर्ट आहे. यानंतर चिंता वाढू शकते. 16800 निर्देशांकाचाचा स्तर पार करणे अवघड आहे. असे, एंजेल वनचे मुख्य टेक्निकल एनालिस्ट समीर चव्हाण म्हणतात, बाजारात स्वस्ताई आहे युद्ध जास्त दिवस सुरू राहिल्यास बाजार आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे. कच्चे तेल आणि कमोडिटी महाग झाल्यानं बाजार 10 टक्क्यांनी पडू शकतो, असं मोतीलाल फायनानेंशिय सर्विसचे एमडी आणि सीईओ मोतीलाल ओसवाल म्हणतात.

संबंधित बातम्या

शेअर मार्केट कोसळले, सेन्सेंक्समध्ये 900 अंकाची घसरण; गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका

पतंजलीच्या ग्राहकांसाठी खुशखबर! बाबा रामदेव यांनी केले क्रेडिट कार्ड लाँच, प्रोडक्सवर मिळणार भरघोस सूट

जिद्द, चिकाटी आणि रागीट, कोण आहेत अशनीर ग्रोवर, ज्यांना स्वत:च्याच कंपनीतून निघावं लागलं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.