EPFO | पीएफ सदस्याच्या मृत्यूनंतरही वारसदारांना भरभक्कम आर्थिक मदत, काय आहे योजना..
EPFO | भविष्य कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या सदस्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना आर्थिक मदत देण्यात येते. 1976 पासून ही योजना लागू आहे.
EPFO | भविष्य कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्याचा (Members) अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना(Heirs) आर्थिक मदत देण्यात येते. 1976 पासून ही योजना लागू आहे. त्यामुळे संकटाच्या काळात या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार मिळतो.
काय आहे योजना
EPFO सदस्यांना विम्याची सुरक्षा असते. एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम( EDLI Insurance Cover) अंतर्गत विमा मिळतो.
7 लाखांचे विमा कवच
या विमा योजनेत (Employees Deposit Linked Insurance) वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळते.
तर दाव्यासाठी अडचणी
विना वारसदार पीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास, दाव्याच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.
ऑनलाईन अर्ज
खातेधारकाने त्याची पत्नी, मुले, आई-वडिल यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ऑनलाईन पीएफ, निवृत्तीवेतन आणि विम्यासाठी ऑनलाईन नॉमिनेशन अर्ज भरणे अनिवार्य आहे.
दर महिन्याला योजनेत योगदान
1976 मध्ये EDLI ही विमा योजना सुरु करण्यात आली आहे. EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला योजनेतून आर्थिक मदत मिळते.
किती योगदान होते जमा
दरमहा कर्मचाऱ्याच्या वेतनातून पीएफ खात्यात रक्कम जमा होते. त्यातील 8.33 % हिस्सा EPS मध्ये, 3.67% EPF मध्ये तर 0.5% वाटा EDLI योजनेत जमा होते. साधारणपणे निवृत्ती योजनेविषयी माहिती असते. परंतु, EDLI योजनेविषयी माहिती नसते.
EDLI योजनेतील महत्वाचे मुद्दे
सदस्याच्या मृत्यूनंतर वारसदारांना जास्तीत जास्त 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
12 महिने नोकरी केलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना 2.5 लाख रुपयांचा लाभ मिळतो.
EPFO सदस्याला EDLI योजनेत नोकरीत असेपर्यंतच फायदा मिळतो.
सेवेत नसताना वारसदारांना विमा योजनेत दावा दाखल करता येत नाही.
विम्याची रक्कम वारसदाराच्या बँक खात्यात थेट हस्तांतरीत करण्यात येते.