Twitter : एलॉन मस्क यांनी टाकला पुन्हा बॉम्ब! ट्विटरबाबत घेतला हा निर्णय, लवकरच करणार घोषणा..

Twitter : एलॉन मस्क यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकला आहे..

Twitter : एलॉन मस्क यांनी टाकला पुन्हा बॉम्ब! ट्विटरबाबत घेतला हा निर्णय, लवकरच करणार घोषणा..
मस्क करणार हा बदलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 8:42 PM

नवी दिल्ली : ट्विटरचा (Twitter) ताबा घेतल्यापासून एलॉन मस्कचे (Elon Musk) अचाट आणि अफाट प्रयोग सुरु आहेत. या प्रयोगामुळे अर्थातच मस्क टिकेचा धनी ठरत आहे. पण नेटाने त्याच्या योजना तो राबवित आहे. ब्लू टिक (Blue Tick) असो वा कर्मचारी कपातीची घाई, दोन्ही विषय त्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. आता त्याने आणखी एक घोषणा केली आहे.

तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर यावर आपला विश्वास असून त्यासाठीच आणखी एक प्रयोग राबविण्यात येणार असल्याचे मस्क याने सांगितले. मस्क सध्या चोवीस तास ऑफिसमध्येच राहतो. ट्विटरच्या कार्यालयातच तो डेरे दाखल झाला आहे.

पण आपण काही दिवसच ट्विटरचं सीईओ पद सांभाळणार असल्याचे सांगत मस्कने पुन्हा एकदा खळबळ माजवून दिली. ट्विटरच्या सीईओ पदी आपण सतत राहणार नसल्याचा दावा त्याने केला. या पदी लवकरच पात्र व्यक्तीची नेमणूक करण्याची घोषणा त्याने केली.

हे सुद्धा वाचा

अमेरिकन कोर्टात टेस्लाच्या एका प्रकरणात त्याने जे उत्तर दाखल केले. त्यात त्याने हा दावा केला आहे. त्यामुळे ट्विटरची कमान जरी मस्कच्या हातात राहणार असली तरी सीईओ पदाचा चेहरा मात्र वेगळा राहणार आहे.

टेस्लाचा ऑटोपायलट प्रकल्प वादात अडकला आहे. या प्रणालीमुळे अनेक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागल्याचे हे प्रकरण अमेरिकन कोर्टात पोहचले आहे. सुरक्षा प्रणालीविषयी टेस्लाने भ्रामक आणि खोटे दावे केल्याप्रकरणात कंपनीला कोर्टात खेचण्यात आले आहे.

मस्कने दावा केला आहे की, ट्विटरच्या सीईओ पदी ते कायम राहू इच्छित नाहीत. ट्विटर कंपनीची धूरा नवीन माणसाच्या खाद्यांवर देण्यासाठी आपण इच्छूक असल्याचा दावा मस्कने केला आहे.

पण दुसरीकडे टेस्ला कंपनी बोर्डाचे पूर्व सदस्य जेम्स मडरेक यांच्या एका दाव्यानेही खळबळ उडवून दिली आहे. मस्क टेस्लाच्या सीईओपदी जास्त काळ राहणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.