PF Account : ‘या’ कारणामुळे तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये नॉमिनी असणं गरजेचं, काय आहेत फायदे?
पीएफ अकाऊंटमध्ये नॉमिनी असणं खूप गरजेचं आहे. दुर्दैवाने पीएफ अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला तर त्या पैशांचा कायदेशीरित्या हक्क नॉमिनीकडे असतो. इतकंच नाही तर नॉमिनीला पीएफ अकाऊंट होल्डरच्या मृत्यूनंतर पेन्शनही मिळते.
मुंबई : पीएफ अकाऊंट हे नोकरी करणाऱ्यांसाठी गुंतवणूक आणि सेव्हिंग अशा दोन्ही स्वरुपात असतं. पीएफ अकाऊंट तुमच्या रिटायरमेंटवेळी खूप उपयोगी ठरतं आणि तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळते. दरम्यान, पीएफ अकाऊंटमध्ये नॉमिनी असणं खूप गरजेचं आहे. दुर्दैवाने पीएफ अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला तर त्या पैशांचा कायदेशीरित्या हक्क नॉमिनीकडे असतो. इतकंच नाही तर नॉमिनीला पीएफ अकाऊंट होल्डरच्या मृत्यूनंतर पेन्शनही मिळते. (You need to have a nominee in your PF account, why?)
सध्याच्या काळात ईपीएफओही पेन्शन अकाऊंट होल्डर्सना आपल्या अकाऊंटला नॉमिनी जोडण्याचं सातत्याने आवाहन करत आहेत. नॉमिनी जोडल्यानंतर तुमचा पैसा तुम्ही दिलेल्या नॉमिनीला मिळतो. जर नॉमिनी जोडला नाही तर तो पैसा तुमच्या कुटुंबियांना मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, त्याचबरोबर मोठा त्रासही सहन करावा लागतो.
नॉमिनी जोडण्याचे फायदे काय?
ईपीएफओच्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाल्यानंतर नॉमिनीला आयुष्यभर पेन्शन मिळते. नॉमिनीला ईपीएस 95 नुसार अनेक सुविधाही मिळतात. त्यासह जर डेपेंडंट असलेल्या आई-वडिलांकडे उत्पन्नाचं अन्य कुठलंही साधन नसेल तर विडो पेन्शन त्यांना दिली जाते. त्यामुळे त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते.
ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईट लॉगईन केल्यानंतरही ईपीएफओकडून होमपेजवर एक अलर्ट दिसतो. यात सांगण्यात आलं आहे की लवकरात लवकर नॉमिनी जोडून घ्या, जेणेकरुन कुटुंबियांना कुठलाही त्रास होणार नाही.
नॉमिनी असा जोडाल
कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड जॉईन करताना प्रॉव्हिडंट फंडात नॉमिनेशन डिटेल्स द्यावे लागतात. त्यानंतर यात बदल करता येत नव्हता. दरम्यान, आता ईपीएफओने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. त्यानंतर आता तुम्ही ऑनलाईन माध्यमातून नॉमिनीचं नाव जोडू शकणार आहात. त्यासाठी सर्वात प्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाल त्यानंतर मॅनेज ऑप्शनवर जाऊन ई क्लिक करुन आपलं नॉमिनेशन भरु शकता. त्यानंतर नॉमिनेशन भरण्यासाठी पेज ओपन होईल, जिथे तुम्ही सर्व डिटेल्स भरु शकता. यात नॉमिनीचे नाव, फोटो, फंड टक्केवारी आदी गोष्टी देऊ शकता.
वेगवेगळ्या खात्यातील पैसे एका खात्यावर ट्रान्सफर कसे करायचे?
वेगवेगळ्या खात्यातील पैसे एका खात्यावर ट्रान्सफर करण्यासाठी खातेधारकाला सर्वात आधी मुख्य अकाऊंट सोडून इतर सर्व अकाऊंटमध्ये एक्झिट डेट अपडेट करावी लागेल. यामुळे ईपीएफओला तुम्ही ती नोकरी सोडल्याचं समजतं. ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर Manage ऑप्शनमध्ये जाऊन Mark Exit च्या ऑप्शनमध्ये वर्तमान कंपनी सोडून आधीच्या जुन्या सर्व कंपन्यांच्या पीएफ खात्यांमधून एक्झिट व्हा. यानंतर होम पेजमध्ये Online Services ऑप्शनमध्ये जाऊन One Member – One EPF Account (Transfer Request) वर क्लिक करा. यानंतर टप्प्या-टप्प्याने सूचनांचं पालन करत अकाऊंट ट्रान्सफर करा.
संबंधित बातम्या :
नोकरदारांची चिंता मिटली; EPFO ने आधारकार्ड UAN नंबरशी लिंक करण्याची मुदत 1 सप्टेंबरपर्यंत वाढवली
You need to have a nominee in your PF account, why?