EPFO : ईपीएफओ मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत, कर्मचाऱ्यांना होणार असे फायदे

EPFO News : पीएफबाबत आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी अनेक निर्णय घेतले गेले आहेत, ज्यामुळे पीएफधारकांना चांगली सेवा मिळाली आहे. आता ईपीएफओ पर्यायाने केंद्र सरकार अनेक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

EPFO : ईपीएफओ मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत, कर्मचाऱ्यांना होणार असे फायदे
EPFO
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 11:35 PM

पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंड. दरमहिन्याला पीएफधारकांच्या पगारातून एक ठराविक रक्कमेचा काही भाग हा पीएफ खात्यात जमा केला जातो. तसेच कंपनीकडूनही काही भाग हा कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केला जातो. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी पीएफ खात्यातील रक्कम ही भविष्यातील कोणत्याही चांगल्या वाईट स्थितीचा सामना करण्यासाठी मोठा दिलासा देणारी असते. अनेकांनी आतापर्यंत पीएफमधील रक्कमेच्या मदतीने खूप काही केलंय. पीएफधारकांना वारंवार चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ईपीएफओ पर्यायाने केंद्र सरकार अनेक निर्णय घेत असते. आता ईपीएफओ असेच काही निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या निर्णयामुळे पीएफधारकांचं काम चुटकीसरशी होणार आहेत.

केंद्र सरकारने आयकर विभागासाठी पॅन 2.0 हा प्रकल्प मंजूर केला आहे. केंद्र सरकार त्याच पार्श्वभूमीवर EPFO 3.0 आणण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने EPFO 3.0 ही योजना आणल्यास पीएफधारकांची अनेक कामं सहज होतील, असं म्हटलं जात आहे. पीएफ संदर्भातील अनेक कामं ही सर्वसामांन्यांसाठी किचकट आहेत. मात्र केंद्र सरकारने पीएफबाबत नवी योजना लागू केल्यास ही कटकट संपेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

EPFO 3.0 योजनेची अंमलबजावणी झाल्यास प्रत्येक पीएफधारक कर्मचारी आपल्या पगारातून किती रक्कम कापली जावी, याचा निर्णय स्वत: घेऊ शकणार आहे. इतकंच नाही, तर पीएफ खात्यातील रक्कम एटीएमने काढता येईल.

काय बदल होणार?

दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनातील 12 टक्के रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. EPFO 3.0 योजनेच्या अंमलबजावनीनंतर, ही अट शिथिल केली जाऊ शकते. त्यामुळे पीएफधारक वाटेल तितकी रक्कम पेन्शन खात्यात जमा करु शकतील. तसेच पीएफ खात्यातील रक्कम एटीएमद्वारे काढता येईल. असं झाल्यास पीएफधारकांची कटकट संपेल. पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तसेच अर्ज केल्यानंतर ठराविक दिवसांनी रक्कम मिळण्याची प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे ही प्रतिक्षाही संपेल.

कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनाच्या 12 टक्के रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. कंपनीकडूनही कर्मचाऱ्याच्या खात्यात 12 टक्के रक्कम जमा केली जाते. या 12 पैकी 8.33 टक्के रक्कम EPS-95 मध्ये जमा केली जाते. तर उर्वरित 3.67 टक्के रक्कम ही पीएफ खात्यात टाकली जाते. सरकारकडून यातही मोठा बदल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्यासाठी सरकार लवकरच ईपीएस -95 मध्ये जास्त रक्कम जमा करण्याची मुभा देऊ शकते. त्यामुळे या निर्णयाकडेही कर्मचारी वर्गाचं लक्ष असणार आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.