EPFO : नोकरदारांसाठी गुड न्यूज! या दिवशी मिळेल व्याजाची रक्कम

EPFO : नोकरदारांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रतिक्षा अखेर लवकरच फळाला येणार आहे. देशभरातील लाखो खातेदारांच्या खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा होणार आहे.

EPFO : नोकरदारांसाठी गुड न्यूज! या दिवशी मिळेल व्याजाची रक्कम
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 11:01 AM

नवी दिल्ली : देशातील नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीएफ खात्यात (PF Account) व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रतिक्षा अखेर लवकरच फळाला येणार आहे. देशभरातील लाखो खातेदारांच्या खात्यात लवकरच मोठी व्याजाची रक्कम जमा होणार आहे. केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष 2021-22 साठीचे व्याज (EPFO Interest 2021-22) कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केलेले नाही. त्यामुळे कर्मचारी चिंतेत होते. वास्तविक आर्थिक वर्षासाठी व्याज अगोदर मंजूर करण्यात आलेले आहे. पण ते कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही. केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफच्या सीबीटीने मार्च 2022 मध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याज मंजूर केले होते. गेल्या चार दशकातील हा सर्वात नीच्चांकी व्याजदर आहे. 2016-17 मध्ये व्याजदर 8.65 टक्के होता. 2017-18 मध्ये ईपीएफओवरील व्याजदर 8.55 टक्के, 2018-19 मध्ये व्याजदर 8.65 टक्के, 2019-20 मध्ये 8.5 तर 2020-21 मध्ये व्याजदर 8.5 टक्के होते.

EPFO ने डिसेंबर 2022 मध्ये 14.93 लाख नवीन सदस्य जोडले. गेल्या वर्षी याच कालावधीत जोडलेल्या नवीन सदस्य संख्येपेक्षा हा आकडा दोन टक्क्यांनी अधिक आहे. कामगार मंत्रालयाने याविषयीची माहिती दिली आहे. ईपीएफओतर्फे हे नवीन आकडे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, डिसेंबर 2022 मध्ये सदस्य संख्येत 14.93 लाखांची वाढ झाली आहे.

कामगार मंत्रालयानुसार, डिसेंबर 2021 पेक्षा डिसेंबर, 2022 मध्ये ईपीएफओ सदस्यांची संख्या 32,635 हून अधिक वाढली आहे. या तुलनेनुसार, देशात रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे सूचित होते. कामगार मंत्रालयानुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) आकड्यानुसार, डिसेंबर 2022 मध्ये ईएसआयसीसोबत नवीन 18.03 लाख कर्मचारी जोडल्या गेले आहेत.

हे सुद्धा वाचा

वार्षिक आधारावर 2021 च्या शेवटच्या महिन्यापेक्षा डिसेंबर 2022 मध्ये ईएसआयसी योजनेत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही संख्या 14.52 लाख अधिक आहे. EPFO द्वारे डिसेंबर, 2022 मध्ये 14.93 लाख नवीन सदस्यांपैकी 8.02 लाख सदस्य पहिल्यांदाच सामाजिक सुरक्षा योजनेतंर्गत जोडल्या गेले आहेत. नवीन सदस्यांमध्ये सर्वात जास्त 2.39 लाख सदस्य हे 18 ते 21 वयोगटातील आहे. 22 ते 25 वयोगटातील 2.08 लाख नवीन सदस्य जोडण्यात आले आहेत. एकूण नवीन सदस्यांपैकी 55.64 टक्के सदस्य 18 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत.

मनी9 च्या अहवालानुसार, जर तुम्ही आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर पीएफ वा ईपीएफमधून रक्कम काढताना अडचण येईल. तुम्ही पाच वर्षांपूर्वीच या खात्यातून रक्कम काढणार असाल तर तुम्हाला पीएफ विथड्रावलवर कर द्यावा लागेल.

जर पीएफ खाते, खातेदाराच्या पॅनकार्डशी जोडलेले असेल तर रक्कम काढताना कोणताही टीडीएस द्यावा लागणार नाही. जी रक्कम पीएफमधून काढण्यात आली ती वार्षिक नियोजनात गृहित धरण्यात येईल. पीएफ खातेदाराला त्यावर इनकम टॅक्स स्लॅबनुसार कर द्यावा लागेल.

तज्ज्ञांच्या मते, खातेदारांचे पॅन कार्ड पीएफ खात्याशी जोडलेले नसेल तर त्याच्या एकूण रक्कमेवर टीडीएस कापण्यात येतो. सध्या टीडीएस 30 टक्के आहे. त्यात घट होईल. 1 एप्रिल 2023 रोजी टीडीएस 20 टक्के कपात होईल. पीएफ रक्कम काढण्यासाठी हा नवीन नियम मार्चनंतर लागू होईल. मार्च महिन्यातच व्याजाची रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.