EPFO : ईपीएफओचा हा बदल तुमच्या पथ्यावर, समजून घ्या फायद्याचे गणित..

EPFO : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने हा बदल केल्यानंतर तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे..

EPFO : ईपीएफओचा हा बदल तुमच्या पथ्यावर, समजून घ्या फायद्याचे गणित..
हा बदल देईल फायदाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 12:06 AM

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेबाबत (EPFO) मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्र सरकार EPFO चे किमान वेतन मर्यादेसंबंधी (Salary Limit) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. हा बदल झाल्यास जास्तीत जास्त वेतनदारांना ईपीएफओचा फायदा घेता येणार आहे. तर सध्याच्या संघटनेच्या सदस्यांना निवृत्तीवेळी जास्तीत जास्त निधी जमा करण्याची सोय होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार EPFO च्या पेन्शन स्कीम अंतर्गत वेतन मर्यादेत सुधारणा करण्याच्या विचारात आहेत. हा बदल कर्मचारी आणि नियोक्ता यांच्याकडून ईपीएफओमध्ये देण्यात येणाऱ्या अंशदानावर प्रभाव टाकणारा ठरेल.

याचा सरळ अर्थ तुम्हाला आणि कंपनीला, दोघांनाही EPFO मध्ये जादा रक्कम गुंतविता येईल. या वेतन मर्यादेत पुन्हा एकदा सुधारणा करत ती 21000 रुपये प्रति माह करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

हे सुद्धा वाचा

जर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर ईपीएफओमध्ये पेन्शनचा लाभ घेण्यासाठी किमान वेतन मर्यादेत वाढ होईल. त्यामुळे कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांचे अंशदानातील योगदान वाढेल. पण यामुळे हातात येणारे वेतन कमी होईल. या निर्णयाचा कर्मचाऱ्यांनाच एवढा फटका बसेल.

पण कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन आणि रक्कम दोन्ही वाढलेली असेल. तर या योजनेमुळे ईपीएफओसोबत अनेक कर्मचारी जोडल्या जाण्याचा दावा करण्यात येत आहे.

सध्या EPFO च्या नियमानुसार, किमान वेतन मर्यादा 15000 रुपये प्रति महा आहे. कोणत्याही कंपनीत 15000 रुपयांहून अधिक वेतन घेणारा कर्मचारी ईपीएफओचा सदस्य होतो. कंपन्यासाठी ही बाब अनिवार्य करण्यात आलेली आहे.

जर केंद्र सरकारने किमान वेतन मर्यादा सुधारीत करुन त्यामध्ये वाढ केल्यास कर्मचारी आणि नियोक्ता यांचे अंशदान वाढेल. निवृत्तीपर्यंत कर्मचाऱ्यांच्या गाठी मोठी रक्कम आणि त्यावरील व्याज जमा होणार आहे.

केंद्र सरकारने 2014 मध्ये EPFO मध्ये किमान वेतन मर्यादा वाढवली होती. 6500 रुपयांहून ही मर्यादा 15000 रुपये महिना करण्यात आली होती. सुरुवातीपासून म्हणजे 1952 पासून वेतन मर्यादेत 8 वेळा सुधारणा करण्यात आली आहे .

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...