EPFO : EPF आहे की मदतीला, आर्थिक अडचणीच्या काळात असा काढा पैसा

EPFO : आर्थिक अडचण असली की अनेक नोकरदारांना वैयक्तिक कर्ज घेण्याची गरज वाटते. पण त्यापेक्षा ईपीएफ कामाला येऊ शकते. ही रक्कम अडचणीच्या वेळी काढता येते. त्यासाठी अर्ज करता येतो.

EPFO : EPF आहे की मदतीला, आर्थिक अडचणीच्या काळात असा काढा पैसा
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 6:27 PM

नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कर्मचाऱ्यांसाठी फंड मॅनेजमेंट करते. आर्थिक अडचण असली की अनेक नोकरदारांना वैयक्तिक कर्ज घेण्याची गरज वाटते. पण त्यापेक्षा ईपीएफ कामाला येऊ शकते. निकडीच्यावेळी तुम्हाला आता रक्कम काढता येणार आहे. घरबसल्या केवळ मोबाईलच्या मदतीने रक्कम काढता येईल. उमंग ॲपच्या (Umang App) मदतीने तुम्हाला रक्कम काढता येईल. त्यासाठी ऑनलाईन काम करणाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्हाला मोबाईलच्या मदतीने पीएफ काढता येईल. पीएफ खातेदाराला निवृत्तीनंतरही ईपीएफओमधील संपूर्ण जमा रक्कम काढता येईल. तुम्हाला निवृत्तीपूर्वी रक्कम काढायची असेल तर ही पीएफची रक्कम काढता येते.

व्याजदर वाढला

नोकरदारांच्या पीएफ खात्यात यंदा व्याजाची जादा रक्कम येईल. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी ईपीएफ खात्यावर 8.15 टक्के व्याजदर निश्चीत केले. केंद्राने पीएफ खात्यात व्याजाची रक्कम हस्तांतरीत करणार आहे. तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, हे पासबुक (Passbook) आधारे असे तपासता येईल. तसेच काही खास कारणासाठी पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल.

हे सुद्धा वाचा

बेरोजगारी

बेरोजगार झाला असला तर ईपीएफमधून वेळेपूर्वी रक्कम काढता येते. ईपीएफ सदस्य एक महिना बेरोजगार असेल तर ईपीएफ फंडमधून 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येईल. दोन महिने बेरोजगार असेल तर सदस्याला उर्वरीत 25 टक्के रक्कम काढता येईल.

शिक्षण आणि लग्न

सात वर्षे योगदान दिल्यानंतर शिक्षणाचा खर्च, भाऊ-बहिण, मुलांच्या लग्नासाठी रक्कम काढता येईल. कर्मचारी 50 टक्के रक्कम काढता येते.

घराच्या खरेदीसाठी

नवीन घराच्या खरेदीसाठी अथवा त्याच्या दुरुस्तीसाठी रक्कम काढण्याची परवानगी ईपीएफओ देऊ शकते. पण खातेधारकांनी पाच वर्षांपर्यंत योगदान देणे आवश्यक आहे. भूखंड खरेदीसाठी 24 पट तर घराच्या निर्मितीसाठी 36 पट रक्कम मासिक वेतनाआधारे काढता येते.

गृहकर्जाची रक्कम भरण्यासाठी

ईपीएफ योजनेत तीन वर्षांच्या योगदानानंतर गृहकर्ज भरण्यासाठी आगाऊ रक्कम काढता येते. ईपीएफओ सदस्याला घर खरेदीसाठी डाऊन पेमेंट करण्यासाठी वा गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी जमा रक्कमेतून 90% पैसे काढता येते.

उपचारासाठी

उपचारासाठी सदस्याला रक्कम काढता येते. या रक्कमेतून सदस्याला उपचार करता येईल. मासिक वेतनाच्या सहा पट रक्कम काढता येते.

7 लाख रुपयांची मिळते सुविधा

EPFO सदस्यांना विम्याचे संरक्षण मिळते. एम्पलॉई डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम( EDLI Insurance Cover) अंतर्गत विमा कवच मिळते. या विमा योजनेत वारसदाराला 7 लाख रुपयांपर्यंतची विमा सुरक्षा मिळते.

Non Stop LIVE Update
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय
एका घरात किती महिलाना मिळणार 'लाडकी बहीण'चा लाभ? फडणवीसांची माहिती काय.
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा
पोर्टल अपडेट नाही,नोटिफिकेशन नाही, 'लाडकी बहीण योजने'चा ऑनलाईन बोजवारा.
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?
Ladki Bahin :आमच सरकार येताच महिलांना 8500 रूपये देणार, कोणाच वक्तव्य?.
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी
लाडकी बहीणचा लाभ मुस्लिम धर्मातील 'त्या' महिलाना देऊ नका; कुणाची मागणी.
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज
महिलांनो... आता या ॲपवरून घरबसल्या करता येणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज.
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.