EPFO Pension : कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळते का पत्नीला पेन्शन, जाणून घ्या नियम
EPFO Pension : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58-60 वर्षे आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीत 10 वर्षांपर्यंत नोकरी केली तर तुम्हाला पेन्शन मिळते. ही रक्कम निवृत्तीनंतर देण्यात येते.
नवी दिल्ली | 16 जुलै 2023 : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे (Age Of Retirement) वय 58-60 वर्षे या दरम्यान असते. एखाद्या कंपनीत 10 वर्षांपर्यंत काम केले तर ती व्यक्ती निवृत्ती वेतनास पात्र ठरते. ही पेन्शन कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर देण्यात येते. जर एखाद्या कर्मचाऱ्याला मृत्यूने लवकर गाठले तर त्याच्या निवृ्त्तीवर पत्नाला दावा सांगता येतो का? कर्मचाऱ्याच्या पत्नीला निवृत्ती रक्कम (Retirement Pension) देण्यात येते का? भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि इतर अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करते. कर्मचाऱ्यांना पेन्शनमधून काही रक्कम काढता येते. तर एक ठराविक रक्कम त्याच्या पेन्शन फंडात जमा होते. ती निवृत्तीनंतर त्याला मिळते.
पेन्शनचे फायदे काय
अनेकदा शारिरीक व्याधी वाढल्याने, असाध्य रोगाने कर्मचाऱ्याचा मृत्यू ओढावतो. त्यामुळे त्याच्या पश्चात कुटुंबियांना ईपीएफ रक्कमेतंर्गत रक्कम मिळते. हे आर्थिक सहाय गरजेचे ठरते. त्यांना मोठा फायदा मिळतो.
ईपीएफओ अंतर्गत पेन्शन
खासगी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याची जबाबदारी ईपीएफओची आहे. ईपीएफ हा एक प्रोव्हिडंड फंड आहे. कर्मचाऱ्यांना तो आर्थिकदृष्ट्या सक्षम करतो. कर्मचारी प्रत्येक महिन्याला त्याच्या वेतनातून एक ठराविक रक्कम ईपीएफ फंडात जमा करतो. ही रक्कम वेतनाच्या 12 टक्के असते. यामध्ये कर्मचारी आणि कंपनी पण योगदान देते. कंपनी दर महा काही रक्कम या खात्यात जमा करते. या फंडाचा उपयोग निवृत्तीनंतर होतो.
केव्हा मिळते पेन्शन
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. कर्मचारी त्यांचे योगदान पीएफ फंड आणि ईपीएसमध्ये जमा करतात. जेव्हा कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षांपेक्षा अधिक होते. तेव्हा तो या फंडातून रक्कम काढू शकतो. कर्मचारी एकदाच पीएफ खात्यातून रक्कम काढू शकतो. तर ईपीएस खात्यात जमा रक्कम कर्मचाऱ्याला पेन्शन रुपाने मिळते.
पत्नीला मिळते पेन्शन
कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाला. अथवा 58 वर्षानंतर, निवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला पेन्शनवर हक्क सांगता येतो. यामुळे वारसदाराला पूर्ण रक्कम मिळते. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला पेन्शनमधील एक वाटा देण्यात येतो. जर कर्मचाऱ्याचा सेवानिृवत्ती पूर्वी मृत्यू ओढावल्यास ही रक्कम त्याच्या पत्नीला देण्यात येते.
किती मिळते पेन्शन
कर्मचाऱ्याचा मृत्यू लवकर झाल्यास पेन्शनच्या रक्कमेवर त्याचा परिणाम दिसतो. पेन्शन कमी मिळते. कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास पत्नीला मिळणारी पेन्शनची रक्कम कमी असते. सेवानिवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन अधिक असते.