Pension | EPFO चा नवीन वर्षांत दिलासा, जादा पेन्शनसाठी वाढवली डेडलाईन

Pension | केंद्र सरकारने गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांसमोर जादा पेन्शनसाठीचा पर्याय ठेवला होता. त्याबाबत कर्मचाऱ्यांच्या मनात संभ्रम होता. सुरुवातीला त्याला विरोध झाला. नंतर अनेक कर्मचाऱ्यांनी हा पर्याय स्वीकारला. हा पर्याय निवडण्यासाठी आता ईपीएफओने अंतिम मुदत वाढवली आहे. ईपीएफओच्या लाखो सदस्यांना हा पर्याय निवडण्याची पुन्हा संधी मिळाली आहे.

Pension | EPFO चा नवीन वर्षांत दिलासा, जादा पेन्शनसाठी वाढवली डेडलाईन
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 9:36 AM

नवी दिल्ली | 4 जानेवारी 2024 : केंद्रीय कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) सदस्यांना नवीन वर्षांचे गिफ्ट दिले आहे. त्यांना आता जादा पेन्शन मिळण्यासाठी अजून एक संधी देण्यात आली आहे. हा पर्याय निवडण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. ईपीएफओने हा पर्याय निवडण्याची अंतिम मुदत आता 5 महिन्यांसाठी वाढवली आहे. आता जादा पेन्शन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना 31 मे, 2024 रोजीपर्यंत अर्ज करता येईल. ज्या कर्मचाऱ्यांना जादा पेन्शन करण्याची इच्चा होती, त्यांना आता ही संधी मिळाली आहे. मुदतवाढीमुळे त्यांना आता अर्ज करता येईल.

अनेकदा वाढविण्यात आली मुदत

सर्वोच्च न्यायालयाने याविषयीचा निकाल दिला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये एका आदेश दिला होता. कोर्टाच्या निकालानंतर ईपीएफओ सदस्य आणि निवृत्तीधारकांना हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा प्राप्त झाली होती. त्यानंतर वाढीव पेन्शनसाठी अनेकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 31 डिसेंबर, 2023 रोजी मुदत संपणार होती. त्याला मुदत वाढ देण्यात आली होती. आता पुन्हा पाच महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. या काळात कर्मचारी जादा पेन्शनसाठी अर्ज दाखल करु शकतात. त्यांची सविस्तर माहिती भरल्यानंतर ते वाढीव पेन्शनसाठी पात्र ठरतील. अर्ज करण्यसाठी त्यांना अधिक वेळ मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

17.49 लाख कर्मचाऱ्यांचा पुढाकार

इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, हायर पेन्शनचा पर्याय निवडीसाठी अनेक कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जुलै 2023 पर्यंत एकूण 17.49 लाख कर्मचारी आणि निवृत्तीधारकांनी जादा पेन्शन मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्यातील 3.6 लाख एकल वा संयुक्तपणे जादा पेन्शनचे अर्ज दाखल करण्यात आले आहे. हे अर्ज त्यांच्या कंपनीकडे आहे. नियोक्ता त्यावर प्रक्रिया करत आहे.  आता मुदत वाढ मिळाल्याने नियोक्त्यांना या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळाला आहे. पुढील पाच महिन्यांत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तर ज्यांना जादा पेन्शन हवी आहे. त्यांना पण अर्ज करण्यासाठी मुदत वाढ मिळाली आहे. ईपीएफओकडे देशातील लाखो सदस्य आहेत. त्यांना या मुदतवाढीचा आता फायदा होईल.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.