Electric Railway : विजेवर तर पळते सुसाट, या लोखंडी रेल्वेत का लागत नसेल ‘शॉक’

Electric Railway : विजेवर धावणाऱ्या रेल्वेत का बरं बसत नसेल करंट, काय आहे यामागचे रिझन

Electric Railway : विजेवर तर पळते सुसाट, या लोखंडी रेल्वेत का लागत नसेल 'शॉक'
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 7:27 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) आता कात टाकत आहे. कोळशा, डिझेलचा ट्रॅक भारतीय रेल्वेने बदलला आहे. आता झपाट्याने भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण (Electrification) होत आहे. आपण अनेकदा रेल्वेतून प्रवास करतो. दररोज रेलेवेने प्रवास करणाऱ्यांची संख्या पण कमी नाही. मुंबई आणि इतर मेट्रो शहरात तर लोकल अव्याहत धावत असते. तिला रात्रीच अवघा काही तास आराम असतो. आता रेल्वे विद्युतीकरणाच्या सहायाने धावते. त्यासाठी ट्रेनच्या वर एक ओव्हरहेड वायर गेलेली असते. रेल्वे ट्रॅकच्या वरच्या बाजूला आपल्याला विद्युतीकरणाचे जाळे दिसून येते. या वायरमध्ये खूप जास्त वोल्टचा विद्युत प्रवाह प्रवाहित असतो. पण एक प्रश्न अनेकांना पडतो, की रेल्वे तर संपूर्णपणे स्टील आणि लोखंडाचा वापर करुन तयार होते. पण आतल्या प्रवाशांना का लागत नाही शॉक (Shock) , काय यामागचे कारण?

किती वोल्टचा करंट रेल्वेतून प्रवास करताना तुमच्या मनात कधी हा प्रश्न डोकावला का, की या इलेक्ट्रीक वायरमधून किती वॉल्टचा विद्युत प्रवाह वाहत आहे म्हणून. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, तर या इलेक्ट्रिक वायरमधून 2500 वोल्टपेक्षा अधिकचा विद्युत प्रवाह वाहतो. या वायरला चुकूनही धक्का लागला तर क्षणार्धात माणसाचा जीव जातो. त्यामुळेच इलेक्ट्रिक रेल्वेच्या टपावरुन प्रवासाला बंदी घालण्यात आलेली आहे. डिझेल आणि कोळशाच्या रेल्वेत पूर्वी काही लोक लोक कमी वेगाच्या रेल्वेच्या टपावरुन प्रवास करत.

शॉक न लागण्याचे कारण तर आता विद्युतीकरणाचे जाळे झपाट्याने विणण्यात येत आहे. रेल्वेत विद्युतीकरणाचे नवे युग दाखल झाले आहे. रेल्वेची बांधणी आता पूर्णपणे स्टीलची असते. चाक, कोच, इंजिन सर्व काही लोखंडाचं असतं. वरच्या बाजूला एवढ्या मोठ्या वोल्टजी विद्युत लाईन गेलेली असताना आतील माणसांना करंट का लागत नाही, हा प्रश्न पडण्यात वावगं असं काहीच नाही.

हे सुद्धा वाचा

पॅन्टोग्राफचा कारनामा रेल्वेच्या वरच्या बाजूला विद्युत लाईनचे जाळे असते. तर रेल्वेच्या वरती या तारेला स्पर्श करणारे एक उपकरण बसवलेले असते. त्याद्वारे हा उच्चदाबाचा विद्युत प्रवाह थेट रेल्वेच इंजिन धावण्यासाठी वापरतात. तर या उपकरणाला पॅन्टोग्राफ असे म्हणतात. त्याद्वारे विद्युत प्रवाह ट्रेनला मिळतो. हा पॅन्टोग्राफ नेहमी हाय व्होल्टेज लाईनच्या संपर्कात असतो. पॅन्टोग्राफमुळेच रेल्वेच्या इतर कोणत्याही भागाचा संपर्क थेट विद्युत वाहिनीशी येत नाही. पण हा विद्युत प्रवाह रेल्वेच्या इंजिनात उतरतो.

ही व्यवस्था असते खास आता तुम्ही म्हणाल, विद्युत प्रवाह थेट रेल्वेच्या इंजिनात येतो. पण त्यासाठी एक संयत्र असते आणि ही यंत्रणा विजेचे रुपांतरण ऊर्जेत करते. तर विजेचा शॉक लागू नये यासाठी जशी आर्थिंगची व्यवस्था करण्यात येते, तशीच काहीशी व्यवस्था या ठिकाणी केलेली असते. त्यामुळे रेल्वेचे इंजिन सेक्शनही विजेच्या संभाव्य धोक्यापासून वाचते.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.