FD Return : नका करु एफडी करण्याची घाई, या गोष्टी ठरतात नुकसानदायी

FD Return : गुंतवणूक म्हटलं की भारतीय, सर्वात अगोदर एफडीचा विचार करतो. तोटे जाणून न घेतातच भारतीय मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करतात.. काय होऊ शकते नुकसान, जाणून घ्या..

FD Return : नका करु एफडी करण्याची घाई, या गोष्टी ठरतात नुकसानदायी
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 7:36 PM

नवी दिल्ली : भारतात जेव्हा पण गुंतवणुकीचा विषय येतो. तेव्हा बँकेतील मुदत ठेव योजनेत (FD) डोळे झाकून गुंतवणूक करण्यात येते. एफडी ही गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. गुंतवणूकदारांचा एक मोठा वर्ग नियमितपणे एफडीत गुंतवणूक करतो. मे 2022 पासून वाढत्या व्याज दरांमुळे एफडीतील गुंतवणूक वाढली आहे. जोखीम मुक्त उत्पन्न असल्याने आणि एक ठराविक रक्कम गुंतविल्यानंतर निश्चित स्वरुपात परतावा मिळण्याची हमी असल्याने ही गुंतवणूक लोकप्रिय आहे. केवळ पगारदारच नाही तर ज्येष्ठ नागरिक, अनेक गुंतवणूकदारांचा (Investors) एफडीकडे अधिक ओढा आहे.

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, एक जोरदार गुंतवणूक योजना असताना पण एफडीतील गुंतवणूक फारशी फायदेशीर नाही. त्यातून आर्थिक नुकसान होण्याची भीती जास्त आहे. एफडीचे फायदे तर लोकांच्या तोंडपाठ आहे. पण नुकसान काय होते ते माहिती आहे का…

कमी परतावा मुदत ठेवीत गुंतवणुकीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे कमी व्याजदर. मुदत ठेवीवर एक निश्चित व्याजदर मिळते. पण सोने, चांदी, म्युच्युअल फंड यामध्ये अधिक परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

निश्चित व्याजदर फिक्स्ड डिपॉझिट स्क्रीममधील सर्वात मोठा दोष म्हणजे, तुम्ही एफडी उघडल्यावेळी जो व्याजदर लागू असतो, तोच शेवटच्या महिन्यापर्यंत मिळतो. त्यात कोणताही बदल होत नाही. व्याजदर वाढीचा कुठलाही फायदा होत नाही. तसेच व्याजदर पण फार जास्त नसल्याने त्याचा ही फटका बसतो.

मर्यादित कालावधी एकदा तुम्ही मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवला तर एका निश्चित कालावधीसाठी तुमची रक्कम अडकून पडते. त्या पैशांचा तुम्हाला दुसरा कोणताही उपयोग करता येत नाही. गरजेच्या वेळी रक्कम काढली तर दंडाचा फटका बसतो.

TDS एफडीतील गुंतवणुकीवर जे व्याज मिळते, ती रक्कम, उत्पन्न हे करपात्र असते. याचा अर्थ तुम्हाला प्राप्त व्याजावर पण कर चुकवावा लागतो. हे व्याज ‘Income from Other Sources’ या श्रेणीत मोडते.

महागाई करपात्र उत्पन्न असल्याचे लक्षात आल्यानंतर आता परताव्याचा विचार करुयात. महागाई दरापेक्षा व्याजदर अधिक असावा, असे अर्थशास्त्र सांगते. पण अनेकदा मुदत ठेवीचा व्याजदर महागाई दरापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे एफडी महागाईवर मात करण्यासाठी कमी पडते, हे समोर येते. जर महागाई दरापेक्षा एफडीचे व्याज कमी असेल तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य काळानुसार कमी होईल.

तरलता एफडीत तरलता, लिक्विडीटीची मोठी अडचण आहे. गरजेच्या वेळी मुदत ठेव तुमच्या कोणत्याच कामाची ठरत नाही. जर एफडी तोडली तर ती प्री-मॅच्युअर ठरते आणि त्यासाठी ग्राहकाला, ठेवीदाराला दंड द्यावा लागतो.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.