Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PVC Aadhaar Card : डिक्टो क्रेडिट कार्ड, पण आहे आधार कार्ड! अवघ्या 50 रुपयांत गाजवा रुबाब

PVC Aadhaar Card : क्रेडिट कार्डसारखं आधार कार्ड तयार करायचंय, तर अवघ्या 50 रुपयांत तुम्हाला एकदम जोरदार आधार कार्ड तयार करता येईल. त्यासाठी प्रक्रिया अत्यंत सोप्पी आहे...

PVC Aadhaar Card : डिक्टो क्रेडिट कार्ड, पण आहे आधार कार्ड! अवघ्या 50 रुपयांत गाजवा रुबाब
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 8:52 PM

नवी दिल्ली : जुने लॅमिलेटेड आधार कार्ड (Aadhaar Card) वापरुन वापरुन अथवा वॉलेट, पर्समध्ये पडून पडून खराब होते. त्याला घडी पडते अथवा ते मळकट दिसते. गरजेच्यावेळी झेरॉक्स करायला गेले की, मग त्याची नक्कल काही येत नाही. तुम्हाला पण याच अडचणीचा सामना करावा लागत असेल तर आता काळजीचं कारण नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक जोरदार पर्याय दिला आहे. हे आधार कार्ड हुबेहुब एखाद्या क्रेडिट कार्डसारखं दिसेल. हे आधार कार्ड तयार करण्याचा खर्च ही अवघा 50 रुपये आहे. हे कार्ड मिळविण्यासाठीची प्रक्रिया पण अत्यंत सोपी आहे.

एटीएमकार्ड सारखं मजबूत 12-अंकी ओळख क्रमांक असलेले आधारकार्ड आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे दस्तावेज आहे. आधार कार्डवर लिहिलेल्या 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांकामध्ये नागरिकांची सर्व आवश्यक माहिती असते. त्यात त्यांचे बायोमेट्रिक्स नोंदवले जातात. आधार खराब होऊ नये यासाठी युआयडीआयने PVC आधार कार्डची (PVC Aadhar Card) सुविधा दिली आहे. हे आधार कार्ड एटीएम कार्डसारखं मजबूत असतं.

50 रुपयांत PVC आधारकार्ड घरी PVC आधार कार्ड अवघ्या 50 रुपयांमध्ये तयार होते. हे कार्ड खराब होत नसल्याने त्याची प्रिंट पण चांगली येते. 50 रुपयांत करासह कुरिअर शुल्काचा समावेश असतो. पीव्हीसी आधार कार्ड तयार करण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी तुम्हाला आधारच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रक्रिया

  1. सर्वात अगोदर https:// uidai.gov.in या संकेतस्थळावर जा
  2. स्क्रॉल डाऊन करा. सर्वात खाली ऑर्डर आधार PVC कार्ड वर क्लिक करा
  3. My Aadhaar Section मध्ये Order Aadhaar PVC Card साठी क्लिक करा
  4. तुमच्या स्क्रीनवर आता एक नवीन पेज उघडेल
  5. याठिकाणी तुमचा 12 अंकी आधार क्रमांक 16 अंकी व्हर्च्युअल आयडी टाका
  6. आधार क्रमांक टाकल्यावर कॅप्चा भरा
  7. आता Send OTP वर क्लिक करा
  8. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर 6 अंकी OTP येईल
  9. हा OTP क्रमांक टाका, नियम आणि अटींवर क्लिक करा आणि सबमिट करा
  10. स्क्रीनवर नवीन पेज उघडेल. त्याठिकाणी तुमचे आधारचे तपशील असतील
  11. खालच्या बाजूस पेमेंट गेटवे असेल. मेक पेमेंट वर क्लिक करा
  12. याठिकाणी डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच नेट बँकिंग आणि UPI द्वारे पेमेंट करण्याचा पर्याय मिळेल.
  13. योग्य पर्याय निवडून पेमेंट करा, पावती डाऊनलोड करा
  14. PVC आधार कार्ड भारतीय पोस्टच्या स्पीड पोस्ट सेवेद्वारे घरपोच मिळेल

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.