Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Credit Score : क्रेडिट स्कोअर तर दमदार, तरीही कर्जासाठी का होते दमछाक

Credit Score : क्रेडिट स्कोअर दमदार असला तरी अनेकदा कर्ज मिळविण्यासाठी दमछाक होते. चांगला क्रेडिट स्कोअर म्हणजे कर्ज मिळण्याची हमी नसते. तर काही वेळा या चुकांमुळे तुमचे नुकसान होते. एकदा समजून घ्या का येत आहे अडचण..

Credit Score : क्रेडिट स्कोअर तर दमदार, तरीही कर्जासाठी का होते दमछाक
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 2:31 PM

नवी दिल्ली : सध्याच्या काळात क्रेडिट स्कोअर हीच तुमची कामगिरी आहे. ती जर जोरदार असेल तर व्यावासायिक आणि व्यापारी युगात तुम्ही राजाच असता. अनेक बँका तुमच्या दर महिन्याच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर क्रेडिट स्कोअरची माहिती देतात. क्रेडिटकर्मा सारख्या काही कंपन्या मोफत क्रेडिट स्कोर तपासण्याची संधी देतात. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या क्रेडिट स्कोअरची गणना कशी होते ते? Credit Score खराब झाला तर तो चांगल्या स्थितीत आणता येतो. अनेकांचा क्रेडिट स्कोअर जोरदार, दमदार असतानाही कर्ज घेताना अडचणी येतात. चांगला क्रेडिट स्कोअरचा अर्थ कर्जाची हमी असते, असे नाही. त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा..

कर्जाची हमी नाही तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे. तरीही कर्ज मिळत नाही, तर त्यामागे काही कारणं असतील. कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँका तुमचा क्रेडिट स्कोअर चेक करतात. बँकाचा स्कोअर कट ऑफ असतो. जर तुम्ही त्या कटऑफ अंकांच्या खाली असाल तर तुमची कर्जाची प्रक्रिया थांबविण्यात येते. अनेक बिझनेस वेबसाईटवर तुमचा क्रेडिट स्कोअर दमदार दिसतो. पण त्याचा अर्थ तो बँकेच्या नियमात बसतोच असे नाही. सोप्या भाषेत, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला दिसत असला तरी त्याआधारे कर्ज मंजुरी होईलच, याची शाश्वती नसते.

बेरोजगारी असू शकते कारण जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा बँका क्रेडिट स्कोअरच्या आधारे त्याची शहानिशा करतात. जर तुम्ही त्यांच्या कटऑफ अंकापेक्षा कमी गुण प्राप्त केले तर तुमचा अर्ज फेटाळण्यात येतो. कटऑफ ठरविण्यासाठी उत्पन्न आणि रोजगार महत्वाचा आहे. जर तुम्ही बेरोजगार असाल तर अनेक बँका तुम्हाला कर्ज देणार नाहीत. तसेच तुमचे उत्पन्न, कमाई कमी असेल तर तुम्हाला कर्ज देताना बँका चारवेळा विचार करतील.

हे सुद्धा वाचा

कर्जाचे ओझे बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्ही दरमहा क्रेडिट कार्डचे पेमेंट करतात की नाही याची शहानिशा करतात. कर्जाची वेळेत परतफेड केली नाही तर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतो. कर्ज देताना तुमचे क्रेडिट रिपोर्ट तयार होते. त्यात तुम्ही कर्जाची परतफेड, स्वयंचलित परतावा, क्रेडिट कार्ड पेमेंट आणि इतर खर्च वेळेवर करता की नाही, याची तपासणी होते. तुमच्या एकूण उत्पन्नाला या सर्व पेमेंट्सने भागाकार करण्यात येतो. सर्वसाधारणपणे हा आकडा 50 टक्क्यांपेक्षा जादा असेल तर तुम्हाला कर्ज देण्यात येणार नाही. कमी असेल तर कर्ज मिळण्याची शक्यता अधिक आहे.

जादा कर्जाचा बोझा जर तुमच्या डोक्यावर एकापेक्षा अधिक कर्जाचा बोझा असेल तर बँका क्रेडिट स्कोअर चांगला असताना कधी कधी उत्पन्न असतानाही कर्ज प्रकरणाकडे कानाडोळा करतात. त्याला अधिकत्तम असुरक्षित एक्सपोजर नियम म्हणतात. त्यातंर्गत बँका एका ठराविक रक्कमेपर्यंत उधारीचा नियम लावता. त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही.

क्रेडिट स्कोअरची कामगिरी जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750पेक्षा अधिक आहे, तर कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. तर क्रेडिट स्कोअर 600 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला बँका कर्ज मंजूर करत नाहीत.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.