Government Scheme : व्हा सावध, नाहीतर गंडाल, आता या सरकारी योजनेच फुटले पेव..तुम्हाला खरंच मिळणार का 3400 रुपयांचा भत्ता?

Government Scheme : या योजनेपासून रहा सावध, होऊ नका सावज..

Government Scheme : व्हा सावध, नाहीतर गंडाल, आता या सरकारी योजनेच फुटले पेव..तुम्हाला खरंच मिळणार का 3400 रुपयांचा भत्ता?
तर बसेल फटकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 7:36 PM

नवी दिल्ली : तुम्हाला पुन्हा एकदा बेरोजगारी भत्त्याचा (Unemployment Allowance) अथवा आशा आशयाचा मॅसेज (Message) आला आहे का? तर सावध रहा. मोदी सरकार तरुणांना दरमहा 3400 रुपये देणार असल्याची नवी थाप या मॅसेजमध्ये मारण्यात आली आहे. एका क्लिकवर तुम्हाला अर्ज (Form Registration) भरुन या योजनेचा लाभ घेता येईल असा दावा करण्यात येतो आणि नेमकी येथेच तुमची चूक होते. त्याचा तुम्हाला मोठा फटका बसतो. तेव्हा रहा सावध, होऊ नका सावज..

PIB Fact Check मध्ये हा मॅसेज बोगस असल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधान ज्ञानवीर योजनेच्या नावाखाली हा गंडा घालण्यात येत आहे. तरुणांना 3400 रुपये देण्यात येत असल्याचा हा मॅसेज समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या मॅसेजला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

एवढेच नाही तर असे मॅसेज खात्री न करता पुढे न पाठविण्याचे आवाहन ही पत्र सूचना कार्यालयाने (PIB) केले आहे. या मॅसेजमध्ये तरुणांना दर महा केंद्र सरकार 3400 रुपये भत्ता देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पंतप्रधान ज्ञानवीर योजनेसाठी नोंदणी सुरु आहे. या योजनेतंर्गत युवकांना दरमहा 3400 रुपये भत्ता देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच नोंदणीसाठी शेअर लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र सरकार अनेक सरकारी योजना राबविते. त्याचा प्रसार आणि प्रचार ही करते. या सरकारी योजनांची माहिती संबंधित विभाग वा त्यांचे मंत्रालय विविध माध्यमातून देते. सरकारी कार्यालयांकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात येत असते.

बोगस मॅसेजवर करण्यात आलेल्या दाव्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डोळे झाकून अशा मॅसेजवर विश्वास ठेवू नका, कुठलाही वैयक्तिक तपशील, बँक खात्याचा तपशील शेअर न करण्याचे आवाहन पीआयबीने केले आहे.

तुम्ही खासगी तपशील सामायिक, शेअर केला तर त्याचा तुम्हाला नाहक मनस्ताप होऊ शकतो. कारण ही योजनाच बोगस आहे. पण तुमची माहिती ऑनलाईन फ्रॉर्ड करणाऱ्यांच्या हाती लागू शकते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.